29-08-2026
प्रभात: मराठी मुरली
ओम
शान्ति
बापदादा
मधुबन
“गोड मुलांनो, सर्व
गोष्टींमध्ये सहनशील बना, निंदा-स्तुती, जय-पराजय सर्वांमध्ये समान राहा, ऐकीव
गोष्टींवर विश्वास ठेवू नका”
प्रश्न:-
आत्मा सदैव
चढत्या कलेमध्ये पुढे जात राहण्याची सोपी युक्ती सांगा.
उत्तर:-
एका
बाबांकडूनच ऐका, दुसऱ्याकडून नाही. फालतू परचिंतन करण्यामध्ये, वाह्यात गोष्टींमध्ये
आपला वेळ वाया घालवला नाहीत, तर आत्मा सदैव चढत्या कलेमध्ये राहील. उलट्या-सुलट्या
गोष्टी ऐकल्यामुळे, त्यांच्यावर विश्वास ठेवल्यामुळे चांगली मुले देखील कोसळून
पडतात, त्यामुळे खूप काळजी घ्यायची आहे.
ओम शांती।
गोड-गोड
मुलांना आता स्मृती आली आहे की खरोखर अर्धाकल्प, जेव्हापासून रावण राज्य सुरू झाले
आहे तेव्हापासून आम्ही बाबांची आठवण केली आहे. असे देखील नाही की पूर्ण अर्धाकल्प
आठवण केली आहे, नाही. जेव्हा-जेव्हा दुःख जास्ती आले, तेव्हा-तेव्हा आठवण केली आहे.
आता तुम्हाला माहिती झाले आहे की भक्तिमार्गामुळे आपण उतरत आलो आहोत. ड्रामाचे
रहस्य बुद्धीमध्ये आहे. तोंडाने काही म्हणायचे देखील नाहीये, आम्ही त्यांचे बनलो
आहोत म्हणून जास्ती ज्ञानाची आवश्यकता नाही. बाबांचे बनल्यावर बाबांच्या संपत्तीचे
मालक झालो. कर्मेंद्रियांद्वारे काही करायचे नसते. भक्तिमार्गामध्ये भगवंताला
भेटण्यासाठी किती यज्ञ-तप, दान-पुण्य करतात. जिथेपण जाल तिथे सर्व ठिकाणी तीर्थे,
मंदिरे अगणित आहेत. असा कोणी मनुष्य नाही जो पूर्ण भारतातली सर्व तीर्थं आणि अगणित
मंदिरे इत्यादी ठिकाणी फिरू शकेल. आणि फिरले जरी तरी मिळत काहीच नाही, तिथे घणा-घणा
घंटा वाजवणे इत्यादी किती गोंगाट असतो. इथे तर गोंगाट करण्याचा प्रश्नच नाही. ना
गाणी म्हणण्याची, ना टाळ्या वाजवण्याची गोष्ट आहे. मनुष्य तर काय-काय करत असतात,
भरपूर कर्मकांडं आहेत. इथे तर तुम्हा मुलांना फक्त आठवण करायची आहे अजून काहीच
करायचे नाहीये. घरामध्ये राहून सर्व काही करत असताना फक्त बाबांची आठवण करायची आहे.
तुम्ही जाणता आता आपण देवता बनत आहोत. इथेच दैवी गुण धारण करायचे आहेत. खाणे-पिणे
देखील शुद्ध असले पाहिजे. ३६ प्रकारचे भोजन तर तिथे मिळेल, इथे साधे रहायचे आहे. ना
खूप भपकेबाज, ना अती साधे. सर्व गोष्टींमध्ये सहनशीलता पाहिजे निंदा-स्तुती,
जय-पराजय, थंडी-गर्मी हे सर्व काही सहन करावे लागते. वेळच अशी आहे. पाणी मिळणार नाही,
अमुक मिळणार नाही, सूर्य देखील आपली प्रखर उष्णता दाखवेल. प्रत्येक गोष्ट तमोप्रधान
बनते. ही सृष्टीच तमोप्रधान आहे. तत्त्व देखील तमोप्रधान आहेत. त्यामुळे ती दुःख
देतात. निंदा-स्तुती मध्ये देखील जायचे नाही. असे बरेच आहेत जे पटकन चिडतात. कोणी
उलटे-सुलटे काही कोणाला सांगितले कारण आज-काल बनावट गोष्टी तर भरपूर आहेत ना. कोणी
काही म्हटले - तुमच्यासाठी बाबा असे म्हणतात की, यांना देह-अभिमान आहे, बाहेरचा शो
खूप आहे, असे कोणी सांगितले, की बस्स तापच चढतो. झोप देखील उडून जाईल.
अर्ध्याकल्पाचे मनुष्य असे आहेत, कोणालाही पटकन ताप आणू शकतात, लगेच पिवळे होतील.
तर बाबा म्हणतात - कोणत्याही अशा वाह्यात गोष्टी ऐकू नका. बाबा कधीही कोणाची निंदा
करत नाहीत. बाबा तर समजावण्यासाठीच सांगतात. उलट्या-सुलट्या गोष्टी एकमेकांना
सांगितल्यामुळे चांगली-चांगली मुले देखील चिडतात. आणि मग ट्रेटर बनून (विद्रोही
बनून) वाह्यात गोष्टी एकमेकांना जाऊन सांगतील. भक्तिमार्गामध्ये देखील कसल्या-कसल्या
कहाण्या बनवल्या आहेत. आता तुम्हाला ज्ञान मिळाले आहे त्यामुळे तुम्ही कधीही ‘हे
राम’ किंवा ‘हाय भगवान’ असे म्हणू देखील शकत नाही, हे शब्द देखील भक्तिमार्गाचे
आहेत. तुमच्या तोंडून असे शब्द निघता कामा नयेत.
बाबा फक्त एवढेच
म्हणतात - ‘गोड लाडक्या मुलांनो, आत्म-अभिमानी बना’. किती प्रेमाने समजावून सांगतात.
कोणाकडूनही आता ऐकू नका, फालतू परचिंतन करू नका. एक गोष्ट पक्की करा - ‘मी आत्मा आहे’.
आत्मा अविनाशी आहे, शरीर विनाशी आहे. आत्माच संस्कार धारण करते. आता तुम्हा मुलांना
आत्म-अभिमानी बनायचे आहे. द्वापर पासून तुम्ही रावण राज्यामध्ये देह-अभिमानी बनता;
म्हणून आता देही-अभिमानी बनण्यासाठी मेहनत करावी लागते. बुद्धीमध्ये सतत हे आले
पाहिजे की आम्हाला बेहदचे बाबा मिळाले आहेत. कल्प-कल्प बाबा वारसा देतात. आता
त्यांच्या मताप्रमाणे चालायचे आहे. त्यांच्यासाठीच गायन आहे - ‘तुम मात-पिता…’ ते
सर्व नात्यांचे सुख देणारे आहेत,
त्यांच्यामध्ये सर्व
गोडवा आहे. बाकी इतर मित्र-नातलग इत्यादी दुःखच देणारे आहेत. हे एकच बाबा आहेत जे
सर्वांना सुख देणारे आहेत. मार्ग देखील एकदम सोपा सांगतात की, ‘स्वतःला आत्मा समजून
मज पित्याची आठवण करा’. बाबा म्हणतात ही काही नवीन गोष्ट नाहीये. तुम्ही जाणता की,
दर ५ हजार वर्षांनंतर आम्ही असे बाबांकडे येतो, हे काही कोणी साधू-संत नाहीत. तुम्ही
कोणत्या साधू-संत इत्यादीकडे राहत नाही आहात, बाकी होय, बाबा म्हणतात - प्रवृत्ती
मार्गातील नात्यांसोबत तोड निभावायची आहे, नाही तर जास्तच खीट-खीट होते, युक्तीने
चाला. प्रत्येकाला प्रेमाने समजावून सांगायचे आहे की, बघा आता विनाशाची वेळ जवळ आली
आहे, ही आसुरी दुनिया नष्ट होणार आहे. आता देवता बनायचे आहे, दैवी गुण इथेच धारण
करायचे आहेत. प्रेमाने समजावून सांगितले पाहिजे. देवता देखील कांदा-लसूण इत्यादी
काहीच खात नाहीत. आम्ही देखील मनुष्यापासून देवता बनत आहोत तर मग आपण हे कसे बरे
खाऊ शकतो! तुम्हाला देखील सल्ला देतात - हे सोडून द्या. अशा गोष्टी आपण खात नाही.
आता तुम्हाला बेहदचे बाबा दैवी गुण शिकविणारे मिळाले आहेत तर, सर्व गुणसंपन्न… इथेच
बनायचे आहे. इथे बनाल तेव्हाच मग भविष्यातील नवीन दुनिया येईल. हे असेच असते, जसे
रात्री नंतर पुन्हा दिवस येतो. आता रात्रीच्या शेवटीच दैवी गुण धारण करायचे आहेत
तेव्हा मग सकाळ होईल. स्वतःची परीक्षा प्रत्येकाने आपणच घ्यायची आहे. असे नाही की
बाबा तर सर्व काही जाणतात. तुम्ही स्वतःला बघा ना. स्टुडंट असे कधी म्हणणार नाहीत
की टीचर तर सर्व काही जाणतात. परीक्षेचे दिवस जवळ आल्यावर मुले स्वतः समजतात की आपण
कितपत पास होऊ, कोणत्या विषयांमध्ये आपण कच्चे आहोत. काही विषयात कमी मार्क्स
मिळतात तरीही मग सर्व मार्क्स मिळून पास होतात. हे समजत असेल तर यामध्ये देखील
स्वतःची तपासणी करायची आहे. माझ्यामध्ये अजून कोणती कमतरता आहे? मी खूप गोड बनलो आहे
का? सर्वांना प्रेमाने समजावून सांगायचे आहे - आम्हा आत्म्यांचे पिता परमपिता
परमात्मा आहेत. मनुष्याची गोष्ट नाहीये. आपण निराकारला भगवान म्हणतो, रचयिता भगवान
एकच आहेत, बाकी सर्व रचना आहे. रचनेकडून कोणाला वारसा मिळू शकत नाही, तसा नियमच नाही.
सर्व रचनेचे सद्गती दाता एकच रचयिता बाबा आहेत, त्यामध्ये साधू-संत सर्व आले आहेत.
आहेत तर सर्व आत्मेच ना. हां, मनुष्य चांगले-वाईट तर असतातच, पद श्रेष्ठ-कनिष्ठ असते.
संन्याशांमध्ये देखील नंबरवार आहेत. कोणी तर बघा भीक मागत असतात, कोणाच्या तर बघा
सर्व जण पाया पडत असतात. तुम्हा मुलांना देखील श्रेष्ठ बनायचे आहे, खूप गोड बना.
कधीही चिडून रागाने बोलता कामा नये. जितके शक्य होईल तितके प्रेमाने काम करा.
म्हणतात - मुले फार त्रास देतात; ती तर आजकालची मुले आहेतच अशी. त्यांना प्रेमाने
समजवा. दाखवतात की, कृष्ण खोड्या करत असे तेव्हा त्याला दोराने बांधत होते. जितके
शक्य होईल प्रेमाने समजावून सांगायचे आहे किंवा छोटीशी शिक्षा करा. बिचारी निष्पाप
(भोळी) आहेत. काळ देखील असा आहे. बाहेरचा संग-दोष खूप हानिकारक आहे.
आता बेहदचे बाबा
म्हणतात - तुम्हाला मूर्ती इत्यादी ठेवण्याची काहीही गरज नाही. काहीही मेहनत
करण्याची गरज नाही. शिवाचे चित्र तरी का ठेवायचे! ते तर तुमचे पिता आहेत ना. मुले
घरात वडिलांचे चित्र का ठेवतील? बाबा तर हाजिरा-हजूर आहेत ना. बाबा म्हणतात - मी आता
हाजिर नाजिर आहे ना (उपस्थित आहे आणि साऱ्या घटना पाहत देखील आहे). मग तर चित्रांची
गरजच नाही. मी मुलांना बसून समजावून सांगतो. म्हणतात - बापदादांना बघावे. आता बाबा
तर आहेत निराकार, त्यांना बघू शकत नाही. बुद्धीने समजू शकतो. बाबा म्हणतात - मी
यांच्यामध्ये प्रवेश करून तुम्हाला नॉलेज देतो. नाहीतर कसा येऊ. श्रीकृष्णाच्या
तनामध्ये कसे काय येतील. संन्याशांच्या तनामध्ये देखील येऊ शकत नाही.
मी येतोच
त्याच्यामध्ये जो पहिल्या नंबर मध्ये होता. तेच आता लास्ट नंबरमध्ये आहेत. तुम्हाला
देखील आता शिकून मग पहिल्या नंबरमध्ये जायचे आहे. शिकवणारे तर एकच आहेत, ज्यांना
ज्ञानाचा सागर म्हटले जाते. तुम्हाला खूप चांगले ज्ञान मिळत आहे. तुम्ही जाणता -
शांतीधाम आमचे घर आहे, सुखधाम आमचे राज्य आहे. दुःख धाम रावणाचे राज्य आहे. आता बाबा
म्हणतात - गोड-गोड मुलांनो, आपले घर शांतीधामची आठवण करा, सुखधामची आठवण करा.
दुःखधामची बंधने विसरत जा. असे दुसरे कोणीही सांगू शकणार नाही आणि ना ते जाऊ शकतात.
असे ड्रामाच्या मधूनच कोणीही परत जाऊ शकत नाही. हे जे म्हणतात अमुक ज्योती-ज्योत
विलीन झाला अथवा पार-निर्वाण गेला, एकही कोणी असा जात नाही. सर्वांचा पिता अथवा
मालक एकच परमपिता परमात्मा आहेत. ते सर्व आशिकांचे एकच माशुक आहेत. ते जिस्मानी
आशिक-माशुक एकमेकांची आठवण करतात. बुद्धीमध्ये त्याची छबी येते. आणि मग एकमेकांची
आठवण करत राहतात. जेवण जेवत राहतील, आठवण करत राहतील. ते तर आहेत एका जन्मासाठी
आशिक-माशुक. तुम्ही जन्म-जन्मांतरीचे आशिक आहात एका माशुकचे. तुम्हाला बाकी काही
करायचे नाहीये, फक्त एका बाबांची आठवण करायची आहे. त्या (या दुनियेतील)
आशिक-माशुकच्या समोर चेहरा येतो, बस्स त्यांना बघता-बघता काम देखील थांबून जाते, मग
त्यांचा चेहरा नाहीसा होतो आणि काम करू लागतात. यामध्ये तर असे नाहीये. आत्मा देखील
बिंदू, परमात्मा देखील बिंदू आहे. स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करायची आहे,
यामध्येच मेहनत आहे, परंतु कोणीही अशी प्रॅक्टिस करत नाहीत. आत्म्याचे ज्ञान मिळाले
अर्थात आत्म्याची जाणीव झाली. बाकी राहिला परमात्मा, तर त्यांच्या विषयी देखील
तुम्ही जाणता. बाबा येऊन इथे भृकुटीमध्ये बसतात. यांची (ब्रह्मा बाबांची) जागा
देखील इथेच आहे. आत्मा कुठूनही निघून जाते, समजून येत नाही. तिचे मुख्य स्थान भृकुटी
आहे. बाबा म्हणतात - मी देखील बिंदू आहे, यांच्यामध्ये येऊन बसलो आहे, तुम्हाला कळत
देखील नाही. बाबा बसून तुम्हा मुलांना ऐकवतात, तुम्हाला जे ऐकवतात ते मी देखील ऐकतो
(ब्रह्मा बाबा देखील ऐकतात). स्पष्टीकरण तर एकदम बरोबर आहे. दैवी धर्माचे जे असतील
ते पटकन समजतील - हे राज्य स्थापन होत आहे. अगोदर स्थापना आणि नंतर विनाश देखील
होईल. इतर कोणी धर्मस्थापक असे करत नाहीत. ते फक्त आपला स्वतःचा धर्म स्थापन करतात
आणि नंतर मग वृद्धी होते. इथे तर जे जितका-जितका पुरुषार्थ करतात, तितके
भविष्यामध्ये उच्च पद प्राप्त करतात. तुम्ही भविष्य २१ जन्मांसाठी प्रारब्ध बनवत
आहात तर किती पुरुषार्थ केला पाहिजे आणि आहे देखील खूप सोपे, योग देखील सोपा आहे,
ज्याच्यामुळे तुमची विकर्मे विनाश होतात.
बाबा म्हणतात - मी हमी
देतो, कल्प-कल्प मीच येऊन तुम्हा मुलांना पावन बनवतो. तिथे एकही कोणी पतित असत नाही.
ज्ञान देखील किती सोपे आहे, ८४ जन्मांचे चक्र कसे फिरतो, ते देखील नॉलेज बुद्धीमध्ये
आहे. आम्ही ८४ चे चक्र पूर्ण केले आहे, हा निश्चय ठेवायचा आहे. निश्चयामध्येच विजय
आहे. असे नाही की, माहीत नाही आम्ही ८४ जन्म घेतो की काही कमी. जेव्हाकी तुम्ही
ब्राह्मण आहात तर तुम्हाला निश्चय असायला पाहिजे की, खरोखर आम्ही ८४ चे चक्र पूर्ण
उपभोगले आहे. हे तर खूप सोपे स्पष्टीकरण आहे. मुलांना समजावून सांगितले आहे ही
चित्रे सर्व दिव्य दृष्टीद्वारे बाबांनी बनवून घेतली आहेत. दुरुस्त देखील करून घेतली
आहेत. सुरुवातीला जेव्हा बाबा बनारसमध्ये एकांतामध्ये राहत होते तेव्हा असे बसून
भिंतींवर चक्र काढत होते. काहीच लक्षात येत नव्हते की हे काय आहे. आनंद होत असे.
साक्षात्कार झाल्यावर जणू उडून जात होते. हे काय होत आहे, समजत नव्हते. तुम्ही जाणता
जी चित्रे सुरुवातीला बनवली होती ती मग बदलून नवीन-नवीन बनवत गेले. आता नवीन-नवीन
चित्रे कल्पापूर्वी सारखीच बनवली जात आहेत. शिडीचे चित्र बघा किती छान आहे. यावरून
समजावून सांगणे सोपे आहे. उशिरा आलेल्यांना अजूनच सोप्या पद्धतीने स्पष्टीकरण मिळते.
आता नवीन-नवीन जे येतात, ७ दिवसात सर्व नॉलेज समजून घेतात. जुन्यांपेक्षा देखील पुढे
जात आहेत. कोणी म्हणतात आधी आलो असतो तर चांगले झाले असते. अरे ही देखील काळजी करू
नका. पूर्वी आला असतात आणि पळून गेला असता तर? उशिरा आलेल्यांना तर तख्त (सिंहासन)
सहज मिळते. सुरुवातीला जे होते ते बघा आता नाहीयेत. नाहीसे झाले. शेवटी रिझल्ट
माहिती होतो - कोण पास झाले. नवे-नवे निघतात आणि लगेचच सेवेला लागतात? जुने इतके
सेवेला लागत नाहीत. नव्या-नव्या मुली सेवेमुळे हृदयावर चढून बसत आहेत. जुने तर किती
नाहीसे झाले म्हणून बाबा म्हणतात - ज्यांना सर्वोत्तम ब्राह्मण कुलभूषण म्हटले जाते,
त्यांच्यामधील सुद्धा कोणी आश्चर्यवत् सुनन्ती, भागन्ती होतात. ज्याचे गायन आहे ते
आता प्रत्यक्षात होत आहे. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) स्वतःची
तपासणी स्वतःच करायची आहे. बघायचे आहे की, मी खूप-खूप गोड बनलो आहे का? माझ्यामध्ये
काय-काय कमतरता आहेत? सर्व दैवी गुण धारण झाले आहेत? स्वतःची वर्तणूक देवतांसारखी
बनवायची आहे. आसुरी खाण्या-पिण्याचा त्याग करायचा आहे.
२) कोणत्याही वाह्यात
गोष्टी ना ऐकायच्या आहेत आणि ना बोलायच्या आहेत. सहनशील बनायचे आहे.
वरदान:-
आपल्या स्मृती,
वृत्ती आणि दृष्टीला अलौकिक बनविणारे सर्व आकर्षणांपासून मुक्त भव
म्हटले जाते “जसे
संकल्प तशी सृष्टी”. जे नव्या सृष्टीच्या रचनेसाठी निमित्त विशेष आत्मे आहेत त्यांचा
एक-एक संकल्प श्रेष्ठ अर्थात अलौकिक असला पाहिजे. जेव्हा स्मृती, वृत्ती आणि दृष्टी
सर्व अलौकिक होते; तेव्हा या लोकातली कोणतीही व्यक्ती अथवा कोणतीही वस्तू स्वतःकडे
आकर्षित करू शकत नाही. जर आकर्षित करत असेल तर नक्की अलौकिकतेमध्ये कमी आहे. अलौकिक
आत्मे सर्व आकर्षणांपासून मुक्त असतात.
बोधवाक्य:-
हृदयामध्ये
परमात्म प्रेम आणि शक्ती सामावलेल्या असाव्यात म्हणजे मग मनामध्ये गोंधळ उत्पन्न
होऊ शकत नाही.
हे अव्यक्त इशारे -
अपवित्रतेच्या बीजाला देखील नष्ट करून संपूर्ण स्वच्छ (पवित्र) बना.
संपूर्ण सत्यता ही
देखील पवित्रतेच्या आधारावरच असते. पवित्रता नसेल तर सदैव सत्यता राहू शकत नाही.
केवळ काम विकार म्हणजेच अपवित्रता नाही, परंतु त्याचे अजूनही साथीदार आहेत! तर महान
पवित्र अर्थात अपवित्रतेचे नामो-निशाण देखील नसावे.