29-10-2025
प्रभात: मराठी मुरली
ओम
शान्ति
बापदादा
मधुबन
“गोड
मुलांनो - तुम्ही प्रत्येकाला परिस्तानी बनवायचे आहे, तुम्ही आहात सर्वांचे कल्याण
करणारे, तुमचे कर्तव्य आहे गरिबांना श्रीमंत बनविणे”
प्रश्न:-
बाबांचे असे
कोणते नाव भले साधारण आहे परंतु कर्तव्य खूप महान आहे?
उत्तर:-
बाबांना म्हटले जाते बागवान-खिवैया (माळी-नाविक). हे नाव किती साधारण आहे परंतु
बुडणाऱ्याला पार (पैलतीरी) घेऊन जाणे, हे किती महान कर्तव्य आहे. जसे पोहणारे
एकमेकांच्या हातामध्ये हात देऊन पार घेऊन जातात, तसे बाबांचा हात मिळाल्याने तुम्ही
स्वर्गवासी बनता. आता तुम्ही देखील मास्टर खिवैया (मास्टर नाविक) आहात. तुम्ही
एका-एकाच्या नावेला (जीवन रुपी नावेला) पार जाण्याचा मार्ग सांगता.
ओम शांती।
आठवणीमध्ये तर मुले बसली असणारच. स्वतःला आत्मा समजायचे आहे, देह देखील आहे. असे
नाही की देहाशिवाय बसला आहात. परंतु बाबा म्हणतात देह-अभिमान सोडून देही-अभिमानी
होऊन बसा. देही-अभिमान आहे - शुद्ध, देह-अभिमान आहे - अशुद्ध. तुम्ही जाणता
देही-अभिमानी बनल्याने आम्ही शुद्ध पवित्र बनत आहोत. देह-अभिमानी बनल्याने अशुद्ध,
अपवित्र बनलो होतो. बोलावतात देखील हे पतित-पावन या. पावन दुनिया होती. आता पतित आहे
पुन्हा पावन दुनिया जरूर होणार. सृष्टीचे चक्र फिरणार. जे या सृष्टी चक्राला जाणतात
त्यांना म्हटले जाते स्वदर्शन चक्रधारी. तुम्ही प्रत्येक जण एक स्वदर्शन चक्रधारी
आहात. स्व आत्म्याला सृष्टी चक्राचे ज्ञान मिळाले आहे. ज्ञान कोणी दिले? जरूर ते
देखील स्वदर्शन चक्रधारी असतील. बाबांशिवाय दुसरा कोणीही मनुष्य शिकवू शकणार नाही.
बाबा सुप्रीम आत्माच मुलांना शिकवतात. म्हणतात - ‘मुलांनो, तुम्ही देही-अभिमानी बना’.
सतयुगामध्ये हे ज्ञान अथवा शिकवण देण्याची गरज भासणार नाही. ना तिथे भक्ती आहे.
ज्ञानाद्वारे वारसा मिळतो. बाबा श्रीमत देतात - असे तुम्ही श्रेष्ठ बनाल. तुम्ही
जाणता आपण कब्रस्तानी होतो, आता बाबा श्रेष्ठ परिस्तानी बनवतात. ही जुनी दुनिया
कब्र-दाखल होणार आहे. मृत्युलोकला कब्रस्तानच म्हटले जाईल. परिस्तान नवीन दुनियेला
म्हटले जाते. ड्रामाचे रहस्य बाबा समजावून सांगतात. या साऱ्या सृष्टीला भंभोर (जुनी
दुनिया) म्हटले जाते.
बाबांनी समजावून
सांगितले आहे - साऱ्या सृष्टीवर यावेळी रावणाचे राज्य आहे. दसरा सुद्धा साजरा करतात,
किती आनंदित होतात. बाबा म्हणतात - सर्व मुलांना दुःखातून सोडविण्यासाठी मला देखील
जुन्या रावणाच्या दुनियेमध्ये यावे लागते. एक कथा सांगितली जाते. कोणी विचारले तुला
अगोदर सुख पाहिजे की दुःख? तर म्हणाला सुख हवे. सुखामध्ये जाल तर तिथे कोणी यमदूत
इत्यादी येऊ शकत नाहीत. ही देखील एक कथा आहे. बाबा म्हणतात - सुखधाम मध्ये कधीही
काळ येत नाही, अमरपुरी बनते. तुम्ही मृत्यूवर विजय प्राप्त करता. तुम्ही किती
सर्वशक्तीमान बनता. तिथे कधी असे म्हणणार नाही की अमका मेला, मृत्यूचे असे नाव
सुद्धा नसते. एक चोला (शरीर) बदलून दुसरा घेतला. साप आपली कात बदलतो ना. तुम्ही
देखील जुनी कातडी सोडून नवीन कातडी अर्थात शरीरामध्ये येणार. तिथे ५ तत्वे देखील
सतोप्रधान बनतात. सर्व वस्तू सतोप्रधान होतात. प्रत्येक वस्तू फळ इत्यादी दि बेस्ट
असतात. सतयुगाला म्हटलेच जाते - स्वर्ग. तिथे खूप श्रीमंत होते. यांच्यासारखा सुखी
विश्वाचा मालक कोणी असू शकत नाही. आता तुम्ही जाणता आम्हीच हे होतो, तर किती आनंद
झाला पाहिजे. प्रत्येकाला परिस्तानी बनवायचे आहे, अनेकांचे कल्याण करायचे आहे.
तुम्ही खूप श्रीमंत बनता. ते सगळे आहेत गरीब. जोपर्यंत तुमच्या हातामध्ये हात
मिळवणार नाहीत तोपर्यंत स्वर्गवासी बनू शकणार नाहीत. बाबांचा हात तर सर्वांनाच काही
मिळत नाही. बाबांचा हात मिळतो तुम्हाला. तुमचा हात मग मिळतो इतरांना. इतरांचा मग
मिळणार बाकी इतरांना. जसे कोणी पोहणारे असतात तर एका-एकाला पार घेऊन जातात. तुम्ही
देखील मास्टर खिवैया (मास्टर नाविक) आहात. अनेक नाविक बनत आहेत. तुमचा धंदाच हा आहे.
आम्ही प्रत्येकाची नाव पार नेण्याचा मार्ग सांगतो. नाविकाची मुले नाविक बनतात. नाव
किती साधारण आहे - बागवान, खिवैया (माळी, नाविक). आता प्रॅक्टिकल तुम्ही बघत आहात.
तुम्ही परिस्तानची स्थापना करत आहात. तुमचे यादगार (स्मारक) समोर उभे आहे. खाली
राजयोगाची तपस्या, वरती राजाई उभी आहे. नाव देखील ‘दिलवाडा’ खूप छान आहे. बाबा
सर्वांचे दिल (हृदय) घेतात. सर्वांची सद्गती करतात. दिल घेणारा कोण आहे. हे थोडेच
कोणाला माहित आहे. ब्रह्माचे देखील पिता शिवबाबा आहेत. सर्वांचे दिल घेणारे बेहदचे
बाबाच असणार. तत्वे इत्यादी सर्वांचे कल्याण करतात, हे देखील मुलांना समजावून
सांगितले आहे इतर धर्मवाल्यांची धर्मग्रंथ, शास्त्रे इत्यादी कायम आहेत. तुम्हाला
ज्ञान मिळतेच संगमावर, नंतर मग विनाश होतो त्यामुळे कोणतेही शास्त्र राहत नाही.
शास्त्र आहे भक्ती मार्गाची निशाणी. हे आहे ज्ञान. फरक पाहिला ना. भक्ती अथाह आहे,
देवी इत्यादींच्या पूजेमध्ये किती खर्च करतात. बाबा म्हणतात यामधून अल्पकाळाचे सुख
मिळते. जशी-जशी भावना ठेवतात ती पूर्ण होते. देवींना सजवता-सजवता कोणाला
साक्षात्कार झाला की बस्स एकदम हर्षित होतात. फायदा काहीच नाही. मीराचे नाव देखील
गायले गेले आहे. भक्त-माळा आहे ना. फिमेल मध्ये मीरा, मेल मध्ये नारद शिरोमणी भक्त
मानले जातात. तुम्हा मुलांमध्ये देखील नंबरवार आहेत. माळेचे मणी तर अनेक आहेत. वरती
बाबा आहेत फूल, मग आहे युगल मेरू. फुलाला सर्वजण नमस्कार करतात. एका-एका मण्याला
नमस्कार करतात. रुद्र यज्ञ रचतात तर त्यामध्ये देखील जास्ती पूजा शिवाची करतात.
शाळीग्रामांची इतकी करत नाहीत. संपूर्ण लक्ष शिवाकडे असते कारण शिवबाबांद्वारेच
शाळीग्राम असे हुशार बनले आहेत, जसे आता तुम्ही पावन बनत आहात. पतित-पावन बाबांची
मुले तुम्ही देखील मास्टर पतित-पावन आहात. जर कोणाला मार्ग सांगत नसाल तर पाई-पैशाचे
पद मिळेल. तरी पण बाबांना तर भेटलात ना. ते देखील काही कमी थोडेच आहे. सर्वांचे
फादर ते एक आहेत. श्रीकृष्णासाठी असे थोडेच म्हटले जाईल. श्रीकृष्ण कोणाचा फादर
बनेल? श्रीकृष्णाला फादर म्हणता येणार नाही. मुलाला फादर थोडेच म्हणू शकतो. फादर
तेव्हा म्हटले जाते जेव्हा युगल बनेल, मुलगा जन्माला येईल. मग तो मुलगा फादर म्हणेल.
दुसरे कोणी म्हणू शकत नाही. बाकी तर कोणाही वयस्कर व्यक्तीला बापूजी म्हणतात. हे (शिवबाबा)
तर सर्वांचे पिता आहेत. गातात देखील ब्रदरहूड (बंधुत्व). ईश्वराला सर्वव्यापी
म्हटल्याने फादरहूड (पितृत्व) होते.
तुम्हा मुलांना
मोठ-मोठ्या सभांमध्ये समजावून सांगावे लागेल. नेहमी कुठेही भाषण करायला जाल तर ज्या
टॉपिकवर भाषण करायचे आहे, त्यावर विचार सागर मंथन करून लिहून काढले पाहिजे. बाबांना
काही विचार सागर मंथन करायचे नाहीये. कल्पापूर्वी जे ऐकवले होते ते ऐकवून जातील.
तुम्हाला तर टॉपिकवर समजावून सांगायचे आहे. अगोदर लिहून काढून मग वाचायला हवे. भाषण
केल्यानंतर मग लक्षात येते - हे-हे पॉईंट्स सांगितले नाही. हे पॉईंट्स सांगितले असते
तर चांगले झाले असते. असे होते, कोणता ना कोणता पॉईंट विसरायला होतो. सुरुवातीला तर
बोलले पाहिजे - बंधू आणि भगिनींनो आत्म-अभिमानी होऊन बसा. हे तर कधी विसरता कामा नये.
असा कोणी समाचार लिहीत नाहीत. सर्वप्रथम सर्वांना सांगायचे आहे - आत्म-अभिमानी होऊन
बसा. तुम्ही आत्मा अविनाशी आहात. आता बाबा येऊन ज्ञान देत आहेत. बाबा म्हणतात माझी
आठवण केल्याने विकर्म विनाश होतील. कोणत्याही देहधारीची आठवण करू नका. स्वतःला आत्मा
समजा, आपण तिथले राहणारे आहोत. आमचे बाबा कल्याणकारी शिव आहेत, आपण आत्मे त्यांची
संतान आहोत. बाबा म्हणतात - आत्म-अभिमानी बना. मी आत्मा आहे. बाबांच्या आठवणीने
विकर्म विनाश होतील. गंगा स्नान इत्यादीने विकर्म विनाश होणार नाहीत. बाबांचे
डायरेक्शन आहे - तुम्ही माझी आठवण करा. ते लोक गीता वाचतात - ‘यदा यदाही धर्मस्य…’
म्हणतात परंतु अर्थ काही जाणत नाहीत. तर बाबा सेवा करण्याचा सल्ला देतात - शिवबाबा
म्हणतात - स्वतःला आत्मा समजून शिवबाबांची आठवण करा. ते समजतात हे श्रीकृष्णाने
म्हटले, तुम्ही म्हणाल शिवबाबा आम्हा मुलांना सांगतात की, माझी आठवण करा. जितकी माझी
आठवण कराल तितके सतोप्रधान बनून उच्च पद प्राप्त कराल. एम ऑब्जेक्ट समोर आहे.
पुरुषार्थाने उच्च पद प्राप्त करायचे आहे. त्या बाजूचे आपल्या धर्मामध्ये उच्च पद
प्राप्त करतील, आपण दुसऱ्या धर्मामध्ये जात नाही. ते तर येतातच मागाहून. ते देखील
जाणतात आमच्या पूर्वी स्वर्ग होता. भारत सर्वात प्राचीन आहे. परंतु कधी होता, ते
कोणीही जाणत नाही. त्यांना भगवान-भगवती सुद्धा म्हणतात परंतु बाबा म्हणतात
भगवान-भगवती म्हणू शकत नाही. भगवान तर मी एकच आहे. आपण ब्राह्मण आहोत. बाबांना काही
ब्राह्मण म्हणणार नाही. ते आहेत उच्च ते उच्च भगवान, त्यांच्या शरीराचे नाव नाहीये.
तुम्हा सर्वांच्या शरीराला नावे पडतात. आत्मा तर आत्माच आहे. ती देखील परम आत्मा आहे.
त्या आत्म्याचे नाव शिव आहे, ते आहेत निराकार. ना सूक्ष्म शरीर आहे, ना स्थूल शरीर
आहे. असे नाही की त्यांना आकारच नाही आहे. ज्याचे नाव आहे, त्याचा आकार देखील जरूर
आहे. नावा-रूपाशिवाय कोणतीही गोष्टच नाही. परमात्मा पित्याला नावा-रूपापासून न्यारे
म्हणणे किती मोठे अज्ञान आहे. बाबा देखील नावा-रूपापासून न्यारे, मुले देखील
नावा-रूपापासून न्यारे मग तर कोणती सृष्टीची निर्मितीच झाली नसती. तुम्ही आता
चांगल्या रीतीने समजावून सांगू शकता. गुरु लोक शेवटी समजतील. आता त्यांचे राज्य आहे.
तुम्ही आता डबल
अहिंसक बनता. अहिंसा परमो देवी-देवता धर्म अहिंसक गायला गेला आहे. कोणाला मारणे,
दुःख देणे ती देखील हिंसा झाली. बाबा दररोज समजावून सांगतात - मनसा-वाचा-कर्मणा
कोणाला दुःख द्यायचे नाही. मनामध्ये जरूर येईल. सतयुगामध्ये मनसामध्ये देखील येत
नाही. इथे तर मनसा-वाचा-कर्मणा येते. हे शब्द तुम्ही तिथे ऐकणार देखील नाही. ना तिथे
कोणते सत्संग इत्यादी असतात. सत्संग असतोच सत्य द्वारा, सत्य बनण्याकरिता. सत्य एक
बाबाच आहेत. बाबा बसून नरापासून नारायण बनण्याची कथा ऐकवतात, ज्याद्वारे तुम्ही
नारायण बनता. आणि मग भक्ती मार्गामध्ये सत्यनारायणाची कथा अतिशय प्रेमाने ऐकता.
तुमचे यादगार दिलवाडा मंदिर पहा किती सुंदर आहे. जरूर संगमयुगावर दिल घेतले असणार.
आदि देव आणि देवी, मुले बसली आहेत. हे आहे खरे यादगार. त्यांची हिस्ट्री-जॉग्रॉफी
तुमच्या शिवाय कोणीही जाणत नाही. तुमचेच यादगार आहे. हे देखील आश्चर्य आहे.
लक्ष्मी-नारायणाच्या मंदिरामध्ये जाल तर तुम्ही म्हणाल आम्ही हे असे बनत आहोत.
क्राईस्ट देखील इथे आहे. अनेकजण म्हणतात क्राईस्ट गरीबाच्या रूपामध्ये आहे.
तमोप्रधान अर्थात गरीब झाला ना. पुनर्जन्म तर जरूर घेणार ना. श्रीकृष्ण प्रिन्स सो
आता गरीब आहे. गोरा आणि सावळा. तुम्ही देखील जाणता - भारत काय होता आणि आता काय आहे.
बाबा तर आहेतच गरीब निवाज. मनुष्य दान-पुण्य देखील गरिबांना करतात ईश्वर अर्थ.
अनेकांना धान्य मिळत नाही. पुढे जाऊन तुम्ही बघाल मोठ्या-मोठ्या सावकारांना देखील
धान्य मिळणार नाही. गावागावांमध्ये देखील सावकार राहतात ना, ज्यांना मग डाकू लोक
लुटतात. पदामध्ये फरक तर असतोच ना. बाबा म्हणतात - पुरुषार्थ असा करा जेणेकरून
नंबरवन मधे जाल. टिचरचे काम आहे सावध करणे. पास विद् ऑनर व्हायचे आहे. ही बेहदची
पाठशाळा आहे. इथे आहेच राजाई स्थापन करण्यासाठी राजयोग. तरीही जुन्या दुनियेचा
विनाश होणार आहे. नाहीतर राज्य कुठे कराल. ही तर आहेच पतित धरणी.
मनुष्य म्हणतात - गंगा
पतित-पावनी आहे. बाबा म्हणतात यावेळी ५ तत्त्व सगळी तमोप्रधान पतित आहेत. सर्व कचरा,
घाण इत्यादी तिच्यामध्ये जाऊन पडतो. मासे इत्यादी देखील त्यामध्ये राहतात. पाण्याची
देखील जणू एक दुनिया आहे. पाण्यामध्ये किती जीव राहतात. मोठ-मोठ्या सागरातून सुद्धा
किती खायला मिळते. तर गाव झाले ना. गावाला मग पतित-पावन कसे म्हणता येईल? बाबा
म्हणतात - ‘गोड-गोड मुलांनो, पतित-पावन एक बाबाच आहेत. तुमची आत्मा आणि शरीर पतित
झाले आहे, आता माझी आठवण करा तर पावन बनाल’. तुम्ही विश्वाचे मालक, सुंदर बनता. तिथे
दुसरा कोणता खंड असत नाही. भारताचाच ऑलराऊंड पार्ट आहे. तुम्ही सर्व ऑलराऊंडर आहात.
नाटकामध्ये ॲक्टर्स नंबरप्रमाणे येत-जात असतात. हे देखील असेच आहे. बाबा म्हणतात -
तुम्ही लक्षात घ्या आपल्याला स्वयं भगवान शिकवत आहेत. आम्ही पतित-पावन गॉड फादरली
स्टुडंट (ईश्वरीय पित्याचे विद्यार्थी) आहोत, यामध्ये सर्व काही आले. पतित-पावन
देखील झाले, गुरू, टीचर सुद्धा झाले. बाबा सुद्धा झाले. ते देखील निराकार आहेत. ही
आहे इनकारपोरियल गॉड फादरली वर्ल्ड युनिव्हर्सिटी (निराकार ईश्वरीय पित्याचे विश्व
विद्यापीठ). किती सुंदर नाव आहे. ईश्वराची किती महिमा करतात. जेंव्हा बिंदू आहे असे
ऐकतात तेव्हा आश्चर्य वाटते. ईश्वराची इतकी महिमा करतात, आणि चीज आहे तरी काय! बिंदू!
तिच्यामध्ये पार्ट किती भरलेला आहे. आता बाबा म्हणतात - देह असताना देखील, गृहस्थ
व्यवहारामध्ये राहत असून मामेकम् (मज एकाची) आठवण करा. भक्तीमार्गामध्ये जी नौधा
भक्ती (नऊ प्रकारे भक्ती) करतात, तिला म्हटले जाते - सतोप्रधान नवधा भक्ती. किती
तीव्र भक्ती असते. आता पुन्हा आठवणीची तीव्र गति पाहिजे. तीव्रतेने आठवण
करणाऱ्यांचेच नाव मोठे होईल. विजयी माळेचे मणी बनतील. अच्छा.
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) नरापासून
नारायण बनण्यासाठी रोज सत्य बाबांकडून ऐकायचे आहे. सत्संग करायचा आहे. कधी कोणाला
मनसा-वाचा-कर्मणा दुःख द्यायचे नाही.
२) विजयी माळेचा मणी
बनण्यासाठी अथवा पास विथ ऑनर होण्यासाठी आठवणीचा वेग वाढवायचा आहे. मास्टर
पतित-पावन बनून सर्वांना पावन बनविण्याची सेवा करायची आहे.
वरदान:-
परमात्म
आठवणीच्या कुशीत सामावून जाणारे संगम-युगी श्रेष्ठ भाग्यवान आत्मा भव
संगमयुग हे सतयुगी
स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ आहे कारण आत्ताचे गायन आहे - ‘अप्राप्त नहीं कोई वस्तु
ब्राह्मणों के संसार में’. एक बाबा मिळाले तर सर्व काही मिळाले. आता तुम्ही मुले कधी
अतींद्रिय सुखाच्या झोपाळ्यावर झोके घेता, कधी खुशीच्या, कधी शांतीच्या, कधी
ज्ञानाच्या, कधी आनंदाच्या आणि कधी परमात्म-कुशीच्या झोपाळ्यामध्ये झुलता.
परमात्म-कुशी आहे - आठवणीची लवलीन अवस्था. ही कुशी सेकंदामध्ये अनेक जन्मांचे दुःख,
वेदना विसरायला लावते. तर या श्रेष्ठ संस्काराला स्मृतीमध्ये ठेवून भाग्यवान आत्मा
बना.
बोधवाक्य:-
असे सपूत बना
की बाबा तुमची गाणी गातील आणि तुम्ही बाबांची गाणी गाल.
अव्यक्त इशारे:- स्वयं
प्रति आणि सर्वांप्रती मनसा द्वारे योगाच्या शक्तींचा प्रयोग करा.
अगोदर स्वतःवर योगाचे
प्रयोग करून बघा. प्रत्येक महिन्याला किंवा प्रत्येक १५ दिवसांसाठी कोणत्या ना
कोणत्या विशेष गुणाचा किंवा कोणत्या ना कोणत्या विशेष शक्तीचा प्रयोग स्वतःवर करून
बघा कारण संघटनमध्ये किंवा संबंध-संपर्कामध्ये पेपर तर येतातच, तर अगोदर स्वतःवर
प्रयोग करून तपासून बघा, कोणताही पेपर आला तर कोणत्या गुणाचा अथवा शक्तीचा प्रयोग
केल्यावर किती वेळात सफलता मिळाली? जेव्हा स्वतःसाठी सफल व्हाल, तेव्हा इतरांसाठी
देखील प्रयोग करण्याचा उमंग-उत्साह आपोआपच वाढत जाईल.