29-10-2026
प्रभात: मराठी मुरली
ओम
शान्ति
बापदादा
मधुबन
“गोड मुलांनो, बेहदचे
बाबा आले आहेत तुम्हा मुलांना आपल्यासोबत घेऊन जाण्यासाठी, म्हणून आता बाबांचे बनून
त्यांच्या श्रीमतावर चाला”
प्रश्न:-
बाबा आपल्या
मुलांचे भाग्य श्रेष्ठ बनविण्यासाठी कोणते श्रेष्ठ मत देतात?
उत्तर:-
गोड मुलांनो,
मृत्यूच्या अगोदर शक्य होईल तितके आठवणीमध्ये राहण्याचा पुरुषार्थ करा, यामध्येच
तुमची कमाई आहे. माझे मूल बनून मग कधी चुकूनही कोणते पाप कर्म करू नका. भले मायेची
कितीही वादळे येतील परंतु पतित तर कधीच बनायचे नाही.
ओम शांती।
शिव भगवानुवाच.
तुम्ही मुले तर समजाल की शिवबाबा आम्हाला समजावून सांगत आहेत. तुम्ही आहात संगमयुगी.
शिवबाबांच्या सन्मुख बसला आहात. ते कलियुगी मनुष्य शिवबाबांच्या जड मंदिरामध्ये
जाऊन बसतात. फरक समजता ना. बुद्धीचे कुलूप थोडे उघडा तरी. तुम्ही समजता आपण चैतन्य
शिवबाबांच्या जवळ बसलो आहोत. बाबा आमच्याशी समोरासमोर बातचीत करत आहेत. शिवबाबा
ब्रह्माद्वारे राजयोग शिकवत आहेत आणि दुसरीकडे पहा मनुष्य शिवबाबांची पूजा करत आहेत.
अमरनाथला, काशीला शोधण्यासाठी जात आहेत. मग तुम्ही हे वारंवार विसरून का जाता की,
आपण शिवबाबांच्या जवळ बसलो आहोत, ज्यांना परमपिता परमात्मा म्हटले जाते. त्यांची
किती महिमा आहे. त्यांना तुम्ही ‘बाबा-बाबा’ असे म्हणता. जाणता आम्ही शिवबाबांच्या
मतावर चालून विश्वाचे मालक बनण्याचा वारसा घेत आहोत. ते (दुनियावाले) मंदिरे,
तीर्थ-स्थाने इत्यादीं वर जाऊन धक्केच खात राहतात आणि तुम्ही वारसा घेत आहात. फरक
पाहा किती आहे. तुमच्या तुलनेमध्ये ते किती बुद्धू आहेत. शिवबाबा म्हणतात - मी तुमचा
ओबीडियंट सर्व्हंट आहे. मी तुम्हाला वारसा देण्यासाठी आलो आहे. ते गॉडफादरला बोलावत
राहतात. इथे तर तुम्ही गॉडफादरच्या सन्मुख बसला आहात. इथे बुद्धीमध्ये राहते आणि मग
घरी गेल्यावर विसरून का जाता! इथे तुमच्यासाठी दिवस आहे, तिथे त्यांच्यासाठी रात्र
आहे. ते ओरडत राहतात, तुम्ही सन्मुख बसून म्हणता - ‘तुम्हीं से बैठूँ, तुम्हीं से
सुनूँ’. परंतु घरी गेल्यावर विसरून जाता. माया खूप प्रबळ आहे. शिवबाबांची मुले बनून
पुजारी पासून पूज्य बनण्याचा पुरुषार्थ देखील करतात, आणि मग बाहेर जाऊन पुजारी
बनतात. शिवबाबांच्या जड मंदिरामध्ये जात राहतात.
इथे तर बाबा समजावून
सांगतात - मुलांनो, श्रीमतावर चालल्यानेच तुम्ही श्रेष्ठ बनाल. मुख्य आहेच मुळी
पवित्रता. तिथे जड चित्रांसमोर जाऊन काशी-कलवट खातात (आत्मघात करतात). इथे तर
चैतन्यमध्ये बसले आहेत. इथे काशी-कलवट खाण्याचा प्रश्नच नाही. हे आहे जिवंतपणी मरणे.
बाबा म्हणतात - श्रीमतावर चाला. इथून बाहेर जाताच बाबांना विसरून जातात. कधी पत्र
इत्यादी सुद्धा लिहित नाहीत. काही तर असे आहेत ज्यांनी बाबांना कधी पाहिले देखील
नाहीये. ते तळमळत-तळमळत पत्रे लिहित असतात; आणि जे सन्मुख भेटून जातात ते मग
पूर्णपणे विसरून जातात. तुम्हाला तर शिवबाबांवर बलिहार जायचे आहे ना.
भक्तिमार्गामध्ये शिवबाबांना भेटण्यासाठी काशी-कलवट खात होता; परंतु ते मिळू शकत
नाहीत. आता बाबा चैतन्यमध्ये येऊन म्हणतात - ‘मुलांनो, माझे बना’. मी आलो आहे घेऊन
जाण्यासाठी. तुम्ही पवित्र बनल्याशिवाय येऊ शकणार नाही. तुम्हाला पवित्र
बनविण्याकरिता मलाच यावे लागते. सर्वांचे सद्गती दाता बाबा तुमच्याजवळ बसले आहेत.
तुम्हाला राजयोग शिकवत आहेत, जो गीतेच्या भगवंताने शिकवला होता. त्यांनी
श्रीकृष्णाला भगवान म्हटले आहे. तुम्ही जाणता गीतेचे भगवान शिवबाबा आहेत. तुम्ही
पत्र देखील असेच लिहिता - ‘शिवबाबा केअर ऑफ ब्रह्मा’. तुम्हाला सन्मुख बसून बाबा
समजावून सांगत आहेत. तरी देखील नशा चढत नाही. ओहो! शिवबाबाने आम्हाला दत्तक घेतले
आहे. धर्माचे मूल बनवले आहे. परंतु सगळ्यांनाच काही इथे ठेवणार नाहीत ना. हजारो मुले
आहेत. सर्वांना इथे कसे ठेवणार, एवढी जागा कुठे आहे! बाबा म्हणतात - - तुम्हाला
राहायचे तर आपल्या घरीच आहे. बाबांची आठवण करायची आहे. सर्वात गोड जे बेहदचे बाबा
आहेत, त्यांची तुम्ही संतान बनला आहात.
बाबा समजावून सांगत
आहेत - मुलांनो, तुम्ही काम-चितेवर बसून जळून भस्म झाला आहात. आता तुम्ही
ज्ञान-चितेवर बसून देवता बना. देवतांची पूजा सुद्धा करतात, परंतु समजत काहीच नाहीत.
याला देखील ड्रामाची भावी म्हणणार. आता तुम्ही चैतन्य शिवबाबांजवळ बसला आहात. गायले
देखील जाते - शिवबाबा ब्रह्मा द्वारे विष्णुपुरीची स्थापना करतात. बाबा समजावून
सांगतात मुलांनो, कोणतेही पाप कर्म करू नका. देह-अभिमानामध्ये येऊ नका. तुम्हाला तर
चालता-फिरता ‘साजन’ची आठवण करायची आहे. ज्यांची तुम्ही अर्ध्याकल्पापासून आठवण करत
होता, ते आता तुमच्या सेवेमध्ये उपस्थित आहेत. रुहानी सोशल वर्कर आहेत. तुम्हाला
रुहानी सेवा शिकवतात. सोशल वर्कचे हेड्स देखील असतात ना. हे आहेत रुहानी. ते असतात
मनुष्य सोसायटीची भौतिक सेवा करणारे. आता पाहा ते म्हणतात गायीची हत्या करणे बंद करा.
तुम्ही लिहू शकता की, एकमेकांवर काम-कटारी चालवणे - ही तर सर्वात मोठी हिंसा आहे,
पहिले तर हे बंद करा. ज्यासाठीच भगवंताने म्हटले आहे - ‘काम महाशत्रू आदि-मध्य-अंत
दुःख देणारा आहे’. तुम्ही गीतेच्या भगवंताला विसरून गेला आहात. बाबांना तर आश्चर्य
वाटते. एक तर अमरनाथवर, पर्वतांवर खस्ता खात राहतात; समजतात की तिथे पार्वतीला
अमरकथा ऐकवली. आता एका पार्वतीला ऐकवण्याने काय होणार! बाबा समजावून सांगतात, या
सर्व पार्वती आहेत. सर्वांना अमरकथा ऐकवत आहेत. बाबा म्हणतात - मुलांनो, ८४ जन्म
घेता-घेता आता मृत्युलोकमध्ये येऊन पोहोचला आहात. अच्छा, लक्ष्मी-नारायण कुठे गेले,
परत गेले की काय की ज्योत, ज्योती मध्ये विलीन झाली? सूर्यवंशी राजा-राणी, प्रजा ते
सगळे गेले कुठे? जरूर सतोप्रधानापासून ८४ जन्म घेत-घेत तमोप्रधान बनले असतील. समजता
ना! हे सर्व ब्रह्मा द्वारे शिवबाबा बसून समजावून सांगत आहेत. मुलांनो, आता मी तुमचे
भाग्य बनविण्याकरिता आलो आहे, मग तुम्ही भाग्यावर का रेघ मारता! थोडे तरी समजून घ्या.
मी तुम्हाला स्वर्गाचा मालक बनवण्यासाठी आलो आहे. तुम्ही माझ्या मतावर चालणार नाही
काय! घरी गेल्यावर आठवण विसरून का जाता! बाबा वारंवार समजावून सांगतात - ‘मुलांनो,
आता तुम्ही संगमयुगी आहात. ते कलियुगी आहेत. तुम्ही पूज्य, ते पुजारी. तुमचे भटकणे
आता बंद झाले आहे. भले ते लोक तुम्हाला नास्तिक समजतात, तुम्ही त्यांना नास्तिक
म्हणता. ते म्हणतात - तुम्ही भक्ती करत नाही म्हणून नास्तिक आहात. तुम्ही म्हणता -
तुम्ही बाबांना जाणत नाही म्हणून नास्तिक आहात. तुम्ही म्हणता - आम्ही आस्तिक आहोत.
बाबांना ओळखून वारसा घेत आहोत. तुम्ही जाणत नाही म्हणून धक्के खात राहता.
कुंभमेळ्याला देखील कित्येक माणसे जातात, मग दान-पुण्य करतात. आता बाबा म्हणतात -
या सर्व गोष्टी आता सोडा. तुम्हाला ज्ञानाचा सागर मिळाला आहे मग अजून कुठे जाणार?
या ज्ञान-नद्या आहेत. ज्ञान-सागराकडे ज्ञान-स्नान करण्यासाठी तुम्हाला घेऊन येतात.
किती चांगली-चांगली मुले बाबांकडे येऊन मग जाऊन पुन्हा खराब काम करतात. काहीजण तर
बाबांच्या मतावर चालतात. विचारतात बाबा विनाशी धन कसे सफल करावे? तर मग त्यांना
सांगितले जाते - ‘बुडणाऱ्या नावेतून जितके पण निघेल ते चांगले आहे’. भारताच्या
सेवेमध्ये लावून ते सफल करून टाका, एखादे सेंटर उघडा. ही चित्रे देखील किती बनत
राहतात. बाबांकडे अशी मुले आहेत, जी म्हणतात - जेव्हा गरज पडेल तेव्हा बाबा मला आठवा,
आम्ही मदत करायला हजर आहोत. यज्ञाच्या चांगल्या-चांगल्या कामासाठी गरज असेल तर मला
आठवा. बाबा म्हणतात - मी कोणाची आठवण करत नाही, जे सफल करायचे आहे ते तुमचे तुम्ही
करा. मी तर दाता आहे. मी तर आलोच आहे भारताला स्वर्ग बनविण्यासाठी, तुम्ही देखील
स्वर्गामध्ये जाल. जितके कराल तितके मिळवाल. परंतु जन्म-जन्मांतरीच्या पापांचे ओझे
डोक्यावर आहे, ते उतरवायचे आहे. नाहीतर त्याची खूप सजा आहे. स्वर्गामध्ये तर जाल
परंतु सजा बाकी राहिली असेल तर पद मिळवू शकणार नाही. हे तर गायन आहे सांवलशाह की
हुंडी सकारी (विशाल बुद्धीने देणाऱ्याची हुंडी आपोआप भरेल). यांना कसलीही चिंता नाही.
बाबा म्हणतात हुंडी आपोआप भरेल.
तुम्हा मुलांना
श्रीमतावर चालायचे आहे, यातच कल्याण आहे. अकल्याण कधी समजू नका. समजा दिल्लीला
जाताना वाटेत पाय मोडतो, त्यातही कल्याण आहे असे समजा. आत्मा तर मोडली नाही ना, पाय
मोडला, काही हरकत नाही. मी तर तुमच्या आत्म्याशी बोलतो. बाबा म्हणतात - हे रावण
राज्य आहे म्हणून तर जाळतात. आपण काय होतो, बाबांनी आपल्याला कोणापासून कोण बनवले
आहे! दुनियेची परिस्थिती पाहा काय आहे! आता बाबा तुम्हांला स्वर्गाचा मालक बनवत
आहेत तर त्यांच्या मतावर चालले पाहिजे. कोणतेही पाप-कर्म करता कामा नये. गृहस्थ
व्यवहारामध्ये राहून पवित्र बना. बस्स, ही सत्यनारायणाची कथा ऐकत राहा. ही कथा किती
मोठी आहे. संपूर्ण सागराला शाई बनवा तरी देखील अंत होऊ शकत नाही. तर बाबांच्या
मतावर चालले पाहिजे ना. तुम्ही जाणता आपण भगवंताच्या श्रीमतावर राजाई प्राप्त करतो,
मनुष्यापासून देवता बनतो. मृत्यू तर समोर उभा आहे. अचानक हार्ट फेल होत राहतात,
अपघातामध्ये मृत्युमुखी पडतात. बाबा म्हणतात - मृत्यूच्या अगोदर भरपूर पुरुषार्थ करा.
बाबांची आठवण करत-करत आपली कमाई करा. बेहदच्या बाबांचे बनून मग पाप केले तर एकाचे
शंभर पट होईल. मग लाजही वाटेल की लोकं काय म्हणतील? शिवबाबा म्हणतात - मी
धर्मराजाकडून खूप कडक शिक्षा द्यायला लावतो. मग त्यावेळी असे थोडेच म्हणतील की हा
माझा मुलगा आहे. याबाबतीत खूप कडक कायदे आहेत. न्यायाधीशाचा मुलगा पाप करेल, तर
न्यायाधीश थोडेच काही करू शकतील. शिक्षा भोगावीच लागेल. तर बाबा दररोज समजावून
सांगतात, मुलांनो अजिबात पाप-कर्म करू नका. सर्वात मोठे विकाराचे पाप आहे. भले
तुफान खूप येतील, बाहेरील जगात खूप विकृती भरलेली आहे की काही विचारू नका. हे आहेच
वेश्यालय. समजा एखाद्या मोठ्या व्यक्तीला तुम्ही हे ज्ञान समजावून सांगितले आणि तो
स्टुडंट बनला, तर म्हणतील ब्रह्माकुमारींची याच्यावर जादू झाली आहे. मोठ-मोठ्या
हस्ती येऊन लिहितात देखील - ‘खरोखर, तुम्ही सत्य सांगत आहात. गीतेचा भगवान बरोबर
शिव आहेत, ना की श्रीकृष्ण’. अच्छा, मग आपल्या घरी गेले की संपले. खूप मेहनत करावी
लागते.
बाबा समजावून सांगत
आहेत - गोड-गोड मुलांनो विसरू नका. माया खूप प्रबळ आहे. बाबांची आठवण पाऱ्यासारखी
आहे, पटकन विसरायला होते. बाबा म्हणतात - भले गृहस्थ-व्यवहारामध्ये राहा, फक्त
पवित्र बना. पुरुषार्थ तर करायचाच आहे ना. बाबा तर प्रत्येक मुलाला अतिशय प्रेमाने
सांगतात - ‘आता माझी संतान बनून मग कोणतेही पाप-कर्म करू नका’. बाबांना तर जाणले आहे
ना. सृष्टीचक्राचे रहस्य देखील बुद्धीमध्ये आहे. विद्वान, पंडित, आचार्य तर स्वतःला
‘शिवोऽहम्’ असे म्हणून बसून स्वतःची पूजा करून घेतात. बहुतांश संन्यासी लोक
हरिद्वारमध्ये जाऊन राहतात. दिवसभर म्हणत राहतात - ‘शिव काशी विश्वनाथ गंगा’. बाबा
किती चांगल्या रीतीने बसून समजावून सांगत आहेत. गातात देखील अकालमूर्त. अकाल तख्त
म्हणजे काही संदल नसते. अकाल मूर्त बाबांचा हा रथ तख्त आहे. जसा तुमचा हा रथ आहे.
बाबा देखील म्हणतात - ‘मी हा रथ घेतला आहे. भृकुटीमध्ये, एकीकडे चेला, एकीकडे गुरु
बसला आहे. जरूर यांच्या बाजूलाच येऊन बसेन ना. मी सुद्धा बिंदू आहे. काही इतका मोठा
नाही आहे’.
गोड-गोड मुलांनो,
आठवणीची ही तुमची खरी-खरी चैतन्य यात्रा आहे. बापदादा दोघेही एकत्र आहेत. बाप-दादा
याचा अर्थ कोणीही समजू शकत नाही. टेलिग्रामवर स्वाक्षरी करतात - ‘बापदादा’. याचा
अर्थ कोणीही समजू शकत नाही. अरे शिवबाबा तुमचे पिता आहेत. प्रजापिता ब्रह्मा दादा
आहेत ना. तर ‘बापदादा’ झाले ना. आता बाबा म्हणतात मी आलो आहे - यांच्याद्वारे
तुम्हाला वारसा देण्याकरिता. शिवबाबा तुमचे देखील पिता आहेत. प्रजापिता ब्रह्मा
देखील सर्वांचे पिता झाले. वारसा शिवबाबांकडून मिळतो. तर सही अशीच करणार ना! ‘बापदादा’,
म्हटले जाते. शिवबाबा म्हणतात - मामेकम (मज एकाची) आठवण करा तरी सुद्धा बुद्धीमध्ये
जात नाही. प्रदर्शनीमध्ये हजारो येतात. त्यांच्यामधून केवळ ८-१० लोक समजून
घेण्यासाठी सेंटरवर येतात. त्यांच्यातूनही हळूहळू शेवटी जाऊन एक-दोनच उरतात.
कोटींमध्ये कोणी गायले गेले आहे. तर प्रदर्शनीचे किती प्रोग्राम करावे लागतील,
ज्यातून कोटींमध्ये कोणी निघतील. बरेचजण तर ४-५ वर्षे येऊन देखील नंतर गायब होतात.
बाबांना सोडचिठ्ठी देतात. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) शिवबाबांवर
पूर्णपणे बलिहार जायचे आहे अर्थात जिवंतपणी मरायचे आहे. श्रीमतावर चालायचे आहे.
२) शिवबाबांची संतान
बनला आहात तर कोणतेही पाप-कर्म करायचे नाही. पवित्र बनून स्वतःचे कल्याण करायचे आहे.
वरदान:-
ज्ञानाच्या
गूढ गोष्टी ऐकून त्यांना स्वरूपामध्ये आणणारे ज्ञानी तू आत्मा भव
‘ज्ञानी तू आत्मे’
प्रत्येक गोष्टीच्या ‘स्वरूपा’चा अनुभव करतात. जसे तुम्हाला या गोष्टी ऐकायला
आवडतात आणि त्या सखोल वाटतात, परंतु त्या ऐकण्यासोबतच सामावून घेणे अर्थात स्वरूप
बनणे - याचाही अभ्यास असणे आवश्यक आहे. ‘मी आत्मा निराकार आहे’ - हे वारंवार ऐकता
परंतु निराकार स्थितीचे अनुभवी बनून ऐका. जसा पॉईंट तसा अनुभव. यामुळे शुद्ध
संकल्पांचा खजिना जमा होत जाईल आणि बुद्धी यातच बिझी राहिली तर व्यर्थ
संकल्पांपासून सहजपणे दूर राहू शकाल.
बोधवाक्य:-
नॉलेज तथा
अनुभवाची डबल ऑथॉरिटी असणारेच मस्त फकीर रमता योगी (निश्चिंत फकीर चालता फिरता योगी)
आहेत.
हे अव्यक्त इशारे -
परोपकाराच्या भावनेने संपन्न बनून अपकारीवर देखील उपकार करा.
कोणतीही गोष्ट फिल
करणे (मनाला लावून घेणे) ही फेल होण्याची निशाणी आहे. कितीही कोणी अपकारी असो परंतु
तुमची दृष्टी आणि वृत्ती उपकारी असावी. जितके अधिकारी तितके निरहंकारी. ज्ञानामध्ये
चालल्यानंतर जो स्व-अभिमान येतो, त्याचा देखील त्याग. जेव्हा इतकी त्यागाची वृत्ती
आणि दृष्टी असेल तेव्हाच बापदादा स्मृतीमध्ये राहतील आणि मुखातही हेच शब्द राहतील.