29-12-2025      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - आता घरी जायचे आहे त्यामुळे देहा सहित देहाच्या सर्व नात्यांना विसरून मामेकम् (मज एकाची) आठवण करा आणि पावन बना”

प्रश्न:-
आत्म्याच्या संबंधित कोणती एक महीन गोष्ट महीन-बुद्धिवालेच समजू शकतात?

उत्तर:-
१) आत्म्यावर सुई प्रमाणे हळू-हळू गंज चढत गेली आहे. ती आठवणीमध्ये राहिल्याने उतरत जाईल. जेव्हा गंज उतरेल अर्थात आत्मा तमोप्रधानापासून सतोप्रधान बनेल तेव्हा बाबांकडे आकर्षित होईल आणि ती बाबांसोबत परत जाऊ शकेल. २) जितकी गंज उतरत जाईल तितके ते इतरांना ज्ञान सांगते वेळी आकर्षित करतील. या अतिशय महीन गोष्टी आहेत, ज्या जड-बुद्धीवाले समजू शकत नाहीत.

ओम शांती।
भगवानुवाच. आता बुद्धीमध्ये कोण आले? त्या ज्या पाठशाला इत्यादी आहेत त्यांना तर भगवानुवाच म्हटल्याने श्रीकृष्णच बुद्धीमध्ये येईल. इथे तुम्हा मुलांना तर उच्च ते उच्च बाबा आठवतील. यावेळी हे आहे पुरुषोत्तम बनण्याचे संगमयुग. बाबा मुलांना बसून समजावून सांगत आहेत की, देहा सहीत देहाची सर्व नाती तोडून स्वतःला आत्मा समजा. ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे, जी या संगमयुगावर बाबा सांगत आहेत. आत्माच पतित बनली आहे. मग आत्म्याला पावन बनून घरी जायचे आहे. पतित-पावनची आठवण करत आले आहेत, परंतु जाणत मात्र काहीच नाहीत. भारतवासी अगदीच घोर अंधारामध्ये आहेत. भक्ती आहे - रात्र, ज्ञान आहे - दिवस. रात्रीचा अंधार असतो, दिवसा प्रकाश असतो. दिवस आहे - सतयुग, रात्र आहे - कलियुग. आता तुम्ही कलियुगामध्ये आहात, सतयुगामध्ये जायचे आहे. पावन दुनियेमध्ये पतितांचा प्रश्नच नाही. जेव्हा पतित असतात तेव्हा पावन बनण्याचा प्रश्न निर्माण होतो. जेव्हा पावन असतात तेव्हा तर पतित दुनियेची आठवण सुद्धा नसते. आता पतित दुनिया आहे तर पावन दुनियेची आठवण येते. पतित दुनिया हा शेवटचा भाग आहे, पावन दुनिया हा पहिला भाग आहे. तिथे कोणीही पतित असू शकत नाही. जे पावन होते ते मग पतित बनले आहेत. ८४ जन्म देखील त्यांचेच सांगितले जातात. या खूप गूढ गोष्टी समजून घेण्यासारख्या आहेत. अर्धाकल्प भक्ती केली आहे, ती इतक्या लवकर सुटू शकत नाही. मनुष्य एकदमच घोर अंधारामध्ये आहेत, कोटीं मधून कोणीच निघतात, मुश्किलीने कोणाच्या बुद्धीमध्ये बसेल. मुख्य गोष्ट तर बाबा म्हणतात देहाच्या सर्व नात्यांना विसरून मामेकम् (मज एकाची) आठवण करा. आत्माच पतित बनली आहे, तिला पवित्र बनायचे आहे. हे स्पष्टीकरण देखील बाबाच देतात कारण हे बाबा प्रिन्सिपल, सोनार, डॉक्टर, बॅरिस्टर सर्व काही आहेत. ही नावे तिथे राहणार नाहीत. तिथे हे शिक्षण सुद्धा राहणार नाही. इथे शिकतात नोकरी करण्यासाठी. पूर्वी स्त्रिया इतके शिकत नव्हत्या. हे सर्व नंतर शिकल्या आहेत. पतीचा मृत्यू झाला तर सांभाळणार कोण? म्हणून स्त्रिया देखील सर्व काही शिकत राहतात. सतयुगामध्ये तर अशा गोष्टी असत नाहीत ज्याचे चिंतन करावे लागेल. इथे मनुष्य धन इत्यादी गोळा करतात अशा वेळेकरिता. तिथे तर असे विचारच नाहीत ज्यामुळे चिंता करावी लागेल. बाबा तुम्हा मुलांना किती धनवान बनवतात. स्वर्गामध्ये पुष्कळ खजिना असतो. सर्व हिरे-माणकांच्या खाणी भरपूर होतात. इथे जमीन नापीक होते तर ती ताकद राहत नाही. तिथल्या फुलांमध्ये आणि इथल्या फुलांमध्ये रात्रं-दिवसाचा फरक आहे. इथे तर सर्व वस्तूंमधून ताकदच निघून गेली आहे. भले कितीही अमेरिका इत्यादी ठिकाणाहून बीज घेऊन येतात परंतु ताकद कमी होत जाते. धरणीच अशी आहे, ज्यामध्ये जास्त मेहनत करावी लागते. तिथे तर प्रत्येक वस्तू सतोप्रधान असते. प्रकृती देखील सतोप्रधान तर सर्व काही सतोप्रधान असते. इथे तर सर्व गोष्टी तमोप्रधान आहेत. कोणत्याच वस्तूमध्ये ताकद राहिलेली नाहीये. हा फरक देखील तुम्हीच समजता. जेव्हा सतोप्रधान वस्तू पाहता, ते तर ध्यानामध्येच बघता. तिथली फुले इत्यादी किती सुंदर असतात. असे होऊ शकते - तिथले धान्य इत्यादी सर्व तुम्हाला पाहण्यात येईल. बुद्धीने समजू शकता. तिथल्या प्रत्येक वस्तूमध्ये किती ताकद असते. नवीन दुनिया कोणाच्या बुद्धीमध्ये येतच नाही. या जुन्या दुनियेची तर गोष्टच विचारू नका. थापा देखील खूप भल्या मोठ्या मारतात, तर मनुष्य एकदम अंधारामध्ये झोपी गेले आहेत. तुम्ही सांगता - थोडा वेळ बाकी आहे तर तुमच्यावर कोणी हसायला देखील लागतात. खऱ्या अर्थाने तर तेच समजतात जे स्वतःला ब्राह्मण समजतात. ही नवीन भाषा, रूहानी शिक्षण आहे ना. जोपर्यंत स्पिरिच्युअल फादर येत नाहीत, तोपर्यंत कोणीही समजू शकत नाही. स्पिरिच्युअल फादरला तुम्ही मुले जाणता. ते (साधू-संन्यासी) लोक जाऊन योग इत्यादी शिकवतात, परंतु त्यांना शिकवले कोणी? असे तर म्हणणार नाहीत की, स्पिरिच्युअल फादरने शिकवले. बाबा तर शिकवतात रूहानी मुलांना. तुम्ही संगमयुगी ब्राह्मणच समजता. ब्राह्मण बनतील देखील तेच जे आदि सनातन देवी-देवता धर्माचे असतील. तुम्ही ब्राह्मण किती थोडे आहात. दुनियेमध्ये तर वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक जाती आहेत. एक पुस्तक जरूर असेल ज्यावरून समजेल की, दुनियेमध्ये किती धर्म आहेत, किती भाषा आहेत. तुम्ही जाणता हे सर्व राहणार नाहीत. सतयुगामध्ये तर एक धर्म, एक भाषाच होती. सृष्टी चक्राला तुम्ही जाणले आहे. तर भाषांना देखील जाणू शकता की या सर्व राहणार नाहीत. इतके सर्व शांतीधामला निघून जातील. हे सृष्टीचे ज्ञान आता तुम्हा मुलांना मिळाले आहे. तुम्ही लोकांना समजावून सांगता तरी देखील समजतात थोडेच. कोणी मोठ्या व्यक्तींकडून ओपनिंग देखील यासाठी करतात कारण नामीग्रामी आहेत. आवाज पसरेल - वाह! प्रेसिडेंट, प्राईम मिनिस्टरने ओपनिंग केले. हे बाबा गेले तर लोक थोडेच समजतील परमपिता परमात्म्याने ओपनिंग केले, मानणारच नाहीत. कोणी मोठी व्यक्ती कमिशनर इत्यादी येईल तर त्याच्या मागे सर्व धावत येतील. यांच्या मागे तर कोणीही धावत येणार नाही. आता तुम्ही ब्राह्मण मुले तर खूप कमी आहात. जेव्हा बहुसंख्य व्हाल तेव्हा समजतील. आता जर समजले तर बाबांकडे पळत येतील. एकाने कन्येला विचारले होते की, “ज्याने तुम्हाला हे शिकवले त्यांच्याकडे आम्ही डायरेक्ट का जाऊ नये.” परंतु सुईवर गंज चढलेली आहे तर चुंबकाचे आकर्षण कसे वाटेल? गंज जेव्हा पूर्णपणे निघेल तेव्हाच चुंबकाला पकडू शकेल. सुईचा एक कोपरा जरी गंज चढलेला असेल तर तितकीशी खेचणार नाही (आकर्षून घेणार नाही). संपूर्ण गंज उतरेल ते तर शेवटी जेव्हा असे बनाल तेव्हा तर मग बाबांसोबत परत घरी जाल. आता तर चिंता आहे की आम्ही तमोप्रधान आहोत, गंज चढलेली आहे. जितकी आठवण कराल तितकी कट स्वच्छ होत जाईल. हळू-हळू गंज निघत जाईल. गंज चढली देखील हळू-हळू आहे ना, मग उतरेल देखील अशीच. जशी गंज चढली आहे, तशीच साफ देखील होणार आहे तर त्यासाठी बाबांची आठवण देखील करायची आहे. आठवणीने कोणाची जास्त गंज उतरली आहे, कोणाची कमी. जितकी जास्त कट उतरलेली असेल, तितके ते इतरांना ज्ञान समजावून सांगताना आकर्षित करतील. या खूप महीन गोष्टी आहेत. जड-बुद्धीवाले समजू शकणार नाहीत. तुम्ही जाणता राजाई स्थापन होत आहे. समजावून सांगण्याकरिता देखील दिवसेंदिवस युक्त्या निघत राहतात. पूर्वी थोडेच माहीत होते की प्रदर्शनी, म्युजियम इत्यादी तयार होतील. पुढे चालून होऊ शकते अजूनही काही निघेल (ज्ञान देण्याची साधने निघतील). आता अजूनही वेळ आहे, स्थापना होणार आहे. निराश देखील व्हायचे नाहीये. कर्मेंद्रियांना वश करू शकत नाहीत तर कोसळतात (अधोगती होते). विकारामध्ये गेले तर मग सुईवर जास्तच गंज चढेल. विकारामुळे जास्त गंज चढते. सतयुग-त्रेतामध्ये अगदी थोडी मग अर्ध्या कल्पामध्ये जास्त वेगाने गंज चढते. खाली कोसळतात म्हणून निर्विकारी आणि विकारी गायले जाते. व्हाइसलेस देवतांची निशाणी आहे ना. बाबा म्हणतात - देवी-देवता धर्म प्राय: लोप झाला आहे. खाणाखुणा तर आहेत ना. सर्वात उत्तम खूण म्हणजे हे चित्र आहे. तुम्ही हे लक्ष्मी-नारायणाचे चित्र घेऊन परिक्रमा करू शकता कारण तुम्ही असे बनता ना. रावण राज्याचा विनाश, राम राज्याची स्थापना होत आहे. हे राम राज्य, हे रावण राज्य, हा आहे संगम. अनेकानेक पॉईंट्स आहेत. डॉक्टर लोकांच्या बुद्धीमध्ये किती औषधे लक्षात राहतात. बॅरिस्टरच्या बुद्धीमध्ये देखील अनेक प्रकारचे पॉईंट्स आहेत. अनेक टॉपिक्सचे तर खूप चांगले पुस्तक बनू शकते. मग जेव्हा भाषण करण्यासाठी जाल तर पॉईंट्स वरून नजर फिरवा. शुरुड-बुद्धी (तीक्ष्ण-बुद्धी) असणारे लगेच बघतील. पहिले तर लिहिले पाहिजे की, आम्ही अशा प्रकारे समजावून सांगणार आहोत. भाषण केल्यानंतर देखील आठवते ना. असे सांगितले असते तर चांगले झाले असते. हे पॉईंट्स सर्वांना सांगितल्याने बुद्धीमध्ये बसतील. टॉपिकची लिस्ट बनवलेली असावी. मग एक टॉपिक घेऊन मनातल्या मनात भाषण केले पाहिजे किंवा लिहिले पाहिजे. आणि मग बघितले पाहिजे सर्व पॉईंट्स लिहिले आहेत? जितका विचार कराल तितके चांगले आहे. बाबा तर समजतात ना हे चांगले सर्जन आहेत, याच्या बुद्धीमध्ये पुष्कळ पॉईंट्स आहेत. संपन्न होतील तेव्हा सेवा केल्या शिवाय मजा येणार नाही.

तुम्ही प्रदर्शनी करता कुठून २-४, कुठून ६-८ निघतात. कुठे तर एकही निघत नाही. हजारो लोकांनी पाहिले, आणि निघाले किती थोडे; म्हणून आता मोठ-मोठी चित्रे देखील तयार करत राहतात. तुम्ही हुशार बनत जाता. मोठ-मोठ्या व्यक्तींची काय अवस्था आहे, ते देखील तुम्ही बघत आहात. बाबांनी सांगितले आहे तपासणी करायची आहे की, कोणाला हे नॉलेज दिले पाहिजे. रग (आवड) बघितली पाहिजे जे माझे भक्त असतील. गीता ऐकविणार्‍यांना मुख्य एकच गोष्ट समजावून सांगा - भगवान उच्च ते उच्च असणाऱ्यालाच म्हटले जाते. ते आहेत निराकार. कोणत्याही देहधारी मनुष्यांना भगवान म्हणू शकत नाही. तुम्हा मुलांना आता सर्व काही समजलेले आहे. संन्याशी देखील घराचा संन्यास करून पळून जातात. कोणी ब्रह्मचारी असतानाच निघून जातात. मग दुसऱ्या जन्मामध्ये देखील असेच होते. जन्म तर जरूर मातेच्या गर्भातूनच घेतात. जोपर्यंत विवाह करत नाहीत तोपर्यंत बंधनमुक्त आहेत, इतके कोणी नातलग इत्यादी आठवणार नाहीत. विवाह केला की नंतर मग सर्व नाती आठवतील. वेळ लागतो, लवकर बंधन-मुक्त होत नाहीत. आपली जीवन कथा तर सर्वांनाच ठाऊक असते. संन्याशी समजत असतील - अगोदर मी गृहस्थी होतो नंतर मग संन्यास घेतला. तुमचा आहे मोठा संन्यास म्हणून मेहनत लागते. ते संन्यासी विभूती लावतात, केस काढतात, वेश बदलतात. तुम्हाला तर असे करण्याची गरज नाही. इथे तर ड्रेस बदलण्याची देखील गोष्ट नाही. तुम्ही पांढरी साडी नाही घातली तरी देखील काही हरकत नाही. हे तर बुद्धीचे ज्ञान आहे. आपण आत्मा आहोत, बाबांची आठवण करायची आहे यानेच गंज उतरेल आणि आपण सतोप्रधान बनू. परत तर सर्वांना जायचेच आहे. कोणी योगबलाद्वारे पावन बनतील, कोणी सजा खाऊन जातील. तुम्हा मुलांना गंज उतरवण्यासाठी मेहनत करावी लागते, म्हणून याला योग-अग्नी देखील म्हणतात. अग्नीद्वारे पाप भस्म होतात. तुम्ही पवित्र बनाल. काम चितेला देखील अग्नी म्हटले जाते. काम-अग्नीमध्ये जळून काळे बनले आहेत. आता बाबा म्हणतात गोरे बना. या गोष्टी तुम्हा ब्राह्मणांव्यतिरिक्त इतर कोणाच्याही बुद्धीमध्ये येऊ शकत नाहीत. या गोष्टीच वेगळ्या आहेत. तुम्हाला म्हणतात - ‘हे तर शास्त्रांना देखील मानत नाहीत. नास्तिक बनले आहेत’. तुम्ही बोला, ‘शास्त्र तर आम्ही वाचत होतो मग बाबांनी ज्ञान दिले. ज्ञानाद्वारेच सद्गती होते’. भगवानुवाच, ‘वेद-उपनिषद इत्यादी वाचून, दान-पुण्य इत्यादी केल्याने कोणीही मला प्राप्त करत नाहीत. माझ्या द्वारेच माझी प्राप्ती करू शकतात’. बाबाच येऊन लायक बनवतात. आत्म्यावर गंज चढते तेव्हा बाबांना बोलावतात की येऊन पावन बनवा. आत्मा जी तमोप्रधान बनली आहे तिला सतोप्रधान बनायचे आहे; तमोप्रधानापासून तमो, रजो, सतो आणि मग सतोप्रधान बनायचे आहे. जर मध्येच गडबड झाली तर पुन्हा गंज चढेल.

बाबा आपल्याला इतके उच्च बनवतात तर तो आनंद झाला पाहिजे ना. परदेशामध्ये शिकण्यासाठी आनंदाने जातात ना. आता तुम्ही किती हुशार बनता. कलियुगामध्ये किती तमोप्रधान निर्बुद्ध बनता. जितके प्रेम कराल तितका जास्तच सामना करतात (विरोध करतात). तुम्ही मुले समजता की आपली राजधानी स्थापन होत आहे. जे चांगल्या रीतीने शिकतील, आठवणीमध्ये राहतील ते चांगले पद प्राप्त करतील. सैंपलिंग (कलम) भारतामधूनच लागते. दिवसेंदिवस वर्तमानपत्रे इत्यादी द्वारे तुमचे नाव प्रसिद्ध होत जाईल. वर्तमानपत्रे तर सर्वत्र जातात. तोच वार्ताहर कधी चांगले छापेल, कधी खराब कारण ते देखील ऐकीव गोष्टीवर चालतात ना. ज्याने जे सांगितले ते लिहितील. ऐकीव गोष्टींवर खूप चालतात, त्याला परमत म्हटले जाते. परमत आसुरी मत आहे. बाबांचे आहे - श्रीमत. कोणी उलटी गोष्ट सांगितली तर बस्स, येणेच सोडून देतात. तर जे सेवेवर असतात, त्यांना सर्व माहीत असते. इथे तुम्ही जी पण सेवा करता, ही आहे तुमची नंबरवन सेवा. इथे तुम्ही सेवा करता, तिथे फळ मिळते. कर्तव्य तर इथे बाबांसोबत करत आहात ना. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) आत्मारुपी सुईवर गंज चढली आहे, त्याला योगबलाने काढून टाकून सतोप्रधान बनण्याची मेहनत करायची आहे. कधीही ऐकीव गोष्टींवर जाऊन शिक्षण सोडायचे नाही.

२) बुद्धीला ज्ञानाच्या पॉईंट्सने संपन्न करून सेवा करायची आहे. रग पाहून (आवड पाहून) ज्ञान द्यायचे आहे. अतिशय शुरुड-बुद्धी (तीक्ष्ण-बुद्धी) बनायचे आहे.

वरदान:-
कलियुगी दुनियेचे दुःख, अशांतीचे दृश्य बघत असतानाही सदा साक्षी आणि बेहदचे वैरागी भव

या कलियुगी दुनियेमध्ये काहीही घडत आहे परंतु तुमची नेहमी चढती कला आहे. दुनियेसाठी हाहाकार आहे आणि तुमच्या साठी जयजयकार आहे. तुम्ही कोणत्याही परिस्थितीला घाबरत नाही कारण तुम्ही अगोदर पासूनच तयार आहात. साक्षी होऊन हरतऱ्हेचे खेळ बघत आहात. कोणी रडत आहे, ओरडत आहेत, साक्षी होऊन बघण्यामध्ये मजा येते. जे कलियुगी दुनियेचे दुःख अशांतीचे दृश्य साक्षी होऊन बघतात ते सहजच बेहदचे वैरागी बनतात.

बोधवाक्य:-
कोणतीही धरणी तयार करायची असेल तर वाणी सोबत वृत्तीने सेवा करा.

अव्यक्त इशारे:- आता संपन्न अथवा कर्मातीत बनण्याचा ध्यास धरा. जसे एखाद्या मशिनला सेट केले जाते तर एकदा सेट केल्यावर मग ती ऑटोमॅटिकली चालत राहते. अशाच प्रकारे आपली संपूर्ण स्टेज किंवा बाप समान बनण्याची स्टेज किंवा कर्मातीत स्थितीची स्टेज या स्थितीच्या स्टेजच्या सेटला असे सेट करा जेणेकरून संकल्प, शब्द किंवा कर्म त्याच सेटिंग प्रमाणे ऑटोमॅटिक चालत राहतील.