30-03-2026
प्रभात: मराठी मुरली
ओम
शान्ति
बापदादा
मधुबन
प्रश्न:-
या रुद्र
यज्ञाचा रिस्पेक्ट (आदर) कोणत्या मुलांना वाटतो?
उत्तर:-
जे याच्या विशेषतांना जाणतात. तुम्हाला माहित आहे की या रुद्र यज्ञाद्वारे आपण कवडी
पासून हिऱ्यासमान बनतो, यामध्ये सारी जुनी दुनिया स्वाहा होते, या जुन्या शरीराला
देखील स्वाहा करायचे आहे. कोणतेही असे बेकायदा कर्म (अवैध कृत्य) केले जाऊ नये,
ज्यामुळे यज्ञामध्ये विघ्न पडेल. जेव्हा याचे भान राहील तेव्हाच रिस्पेक्ट ठेवू
शकतील.
गीत:-
माता ओ माता…
ओम शांती।
मुलांनी गाणे ऐकले. ज्यांनी बनवले आहे ते तर बिचारे मातांना जाणतच नाहीत. नाव ऐकले
आहे - जगत अंबा. परंतु ती कोण होती, काय कार्य करून गेली, हे तुम्हा मुलांच्या
व्यतिरिक्त इतर कोणालाच ठाऊक नाहीये. जगत अंबा आहे तर जरूर पिता देखील आहे. मुली
देखील आहेत आणि मुलगे देखील आहेत. जे जगत अंबाकडे जातात, त्यांच्या बुद्धीमध्ये ही
समज नाही आहे, केवळ मूर्ती पुजारी आहेत. देवीच्या समोर जाऊन भीक मागतात. आता हा
राजस्व अश्वमेध अविनाशी रुद्र ज्ञान यज्ञ आहे. याचे क्रियेटर आहेत माता-पिता,
तत्त्वतम्. तुम्ही देखील यज्ञाचे क्रियेटर आहात. तुम्हा सर्व मुलांना या यज्ञाचा
खूप सांभाळ करायचा आहे. यज्ञाप्रती खूप रिस्पेक्ट असला पाहिजे. यज्ञाचा पूर्ण रीतीने
सांभाळ केला जातो. हे आहे हेड ऑफिस, इतरही ब्रॅंचेस आहेत. मम्मा, बाबा आणि तुम्ही
मुले या यज्ञाद्वारे आपले भविष्य हिऱ्या समान बनवत आहात. तर अशा यज्ञाचा किती
सांभाळ केला पाहिजे आणि इज्जत ठेवली पाहिजे. किती प्रेम असायला पाहिजे. हा आपल्या
मम्मा, जगत अंबेचा यज्ञ आहे. मम्मा, बाबांचा यज्ञ सो आपला यज्ञ. यज्ञाची वृद्धी
करायची असते की यज्ञामध्ये अनेक मुलांनी येऊन आपल्या बाबांकडून वारसा घ्यावा. भले
स्वतः घेऊ शकत नाहीत, स्वतःला वेळ नसेल तर ठिक आहे परंतु बाकीच्यांना तरी निमंत्रण
दिले पाहिजे. याचे नावच आहे - ‘राजस्व अश्वमेध ज्ञान यज्ञ’, ज्याद्वारे स्वराज्य
मिळते. या यज्ञामध्ये जुन्या शरीराला देखील स्वाहा करायचे असते. बाबांचे बनायचे आहे.
यज्ञ काही कोणते घर नाही आहे, ही आहे बेहदची गोष्ट. ज्या यज्ञामध्ये सारे विश्व
स्वाहा होणार आहे. पुढे चालून तुम्ही पहाल या यज्ञाचा किती रिगार्ड ठेवतील. इथे
अनेकांना रिगार्ड नाही आहे. इतकी सर्व यज्ञाची मुले आहेत. मुले जन्माला येत राहतात
तर या यज्ञाची किती इज्जत ठेवली पाहिजे. परंतु असे बरेचजण आहेत की ज्यांना कदरच नाही
आहे. हा इतका मोठा यज्ञ आहे ज्याद्वारे मनुष्य कवडी पासून हिऱ्या समान, भ्रष्टाचारी
पासून श्रेष्ठाचारी बनतात; म्हणूनच बाबा म्हणतात - भले कितीही यज्ञ करत रहा, परंतु
एक जरी श्रेष्ठाचारी बनला तरी अहो सौभाग्य. इतकी लाखो मंदिरे इत्यादी आहेत, तिथे
कोणीही श्रेष्ठाचारी बनत नाहीत. इथे तर फक्त पृथ्वीची ३ पावले पाहिजेत. कोणी येईल
तर एकदम जीवनच सुधारेल. यज्ञाबद्दल किती इज्जत असायला पाहिजे. बाबांना अनेक जण
लिहितात की, ‘बाबा, आम्ही आमच्या घरी सेंटर उघडू’? ‘ठीक आहे बाळा, भले यज्ञ भूमी
बनव. कोणा ना कोणाचे कल्याण होईल’. या यज्ञाची खूप मोठी महिमा आहे. यज्ञाची भूमी आहे
जिथे मुली इतरांचे कल्याण करत राहतात. अशा यज्ञाचा खूप मान ठेवला पाहिजे. परंतु
पूर्ण ज्ञान नसल्या कारणाने इतका रिगार्ड नाही आहे. यज्ञामध्ये विघ्न टाकणारे भरपूर
आहेत. हा शिवबाबांचा यज्ञ आहे. तर माता-पिता एकत्र आहेत. या मम्मा, बाबांकडून तर
काहीच मिळत नाही. बेहदच्या बाबांकडूनच सर्व काही मिळते. ते एकच आहेत. मम्मा, बाबा
म्हटले जाते शरीरधारींना. निराकाराला तर शरीर नाही आहे. ते बाबा म्हणतात की साकारचा
(ब्रह्मा बाबांचा) देखील मुरीद (भक्त) बनू नका. मामेकम् (मज एकाची) आठवण करा. हे
ब्रह्मा बाबा देखील माझीच आठवण करतात. चित्रांमध्ये दाखवतात राम, कृष्ण, ब्रह्मा
इत्यादी सर्व त्यांची आठवण करतात. परंतु असे काही नाहीये. तिथे (स्वर्गामध्ये) तर
कोणी आठवण करत नाहीत. त्यांना प्रारब्ध मिळाले आहे. त्यांना आठवण करण्याची काय गरज
आहे. पतित तर आपण बनलो आहोत, आपल्यालाच पावन बनण्यासाठी बाबांची आठवण करायची आहे.
महिमा एकाचीच आहे. त्यांच्या मुळे यांचा (ब्रह्मा बाबांचा) मान आहे. तुम्हाला
कोणत्याही देहधारीची आठवण करायची नाहीये. देहधारी द्वारे त्यांचा (शिवबाबांचा)
परिचय मिळतो परंतु आठवण शिवबाबांची करायची आहे. बाबा देखील देहधारी आहेत, सर्व
परिचय देतात. परंतु अशी देखील बरीच बेसमज (बुद्धू) मुले आहेत जी म्हणतात आम्ही तर
डायरेक्ट शिवबाबांच्या प्रेरणे द्वारे ज्ञान घेऊ शकतो. जर असे झाले असते तर मग
त्यांना या रथामध्ये येण्याची गरजच काय आहे. असे देखील आहेत जे समजतात साकार सोबत
आमचे काहीही काम नाही. बाबा म्हणतात - मनमनाभव. त्यांची आठवण करा परंतु यांच्या
द्वारेच तर सांगतात ना. मग नंबरवार रिगार्ड ठेवायचा असतो. रिगार्ड तेच ठेवतील जे
नंबरवार गादीवर बसणारे असतील. राजसिंहासनावर प्रथम मम्मा, बाबा बसतील. मग त्यांना
फॉलो करायचे आहे. परंतु प्रजा बनवावी लागेल. पद देखील खूप उच्च आहे. घाबरण्याची काही
गरज नाही. जसे एरोप्लेनमध्ये कोणी नवीन चढतात तर घाबरतात ना. कोणी तर बघा चंद्रावर
सुद्धा जात राहतात. प्रॅक्टिसची गोष्ट आहे ना. परंतु त्याने फायदा तर काहीच होणार
नाहीये, हे तुम्हीच जाणता. ते असे समजतात की चंद्रावर देखील राजधानी बनवणार. परंतु
असे काहीच होणार नाही आहे. डाऊन फॉल (अधःपतन) आहे ना. डाऊन फॉल आणि राईज विषयी (पतन
आणि उत्थान विषयी) देखील मुलेच समजतात. चित्र देखील आहेत, हे लक्ष्मी-नारायण राज्य
करत होते.
आज तर पहा भारत किती
गरीब आहे. ही तर खरी गोष्ट आहे. यांनी तर स्वतःच लिहिले आहे तर इथे शिडीच्या
चित्रामध्ये दाखविले पाहिजे. तिथे हिऱ्यांचे महाल चमकत असतात, इथे मग कवड्या
दाखविल्या पाहिजेत. पूर्वी कवड्या चालत होत्या. गुरुद्वारे मध्ये कवड्या ठेवत होते.
आता तर कोणी पैसे देखील ठेवत नसतील. शिडीचे चित्र तर खूप चांगले आहे, यामध्ये खूप
काही लिहू शकता. मम्मा, बाबां सोबत मुलांचे देखील चित्र असावे आणि वरती आत्म्यांचे
झाड देखील असावे. नवीन-नवीन चित्रे तयार होत जातील. समजावून सांगणे देखील सोपे होईल.
डाउन फॉल (अधःपतन) कसा होतो मग राईज (उत्थान) कसा होतो. आपण निराकारी दुनियेमध्ये
जाऊन मग साकारी दुनियेमध्ये येतो, समजावून सांगण्यासाठी खूप सोपे आहे. समजत नसतील
तर असे समजले जाते भाग्यामध्ये नाहीये. ड्रामाला साक्षी होऊन पाहिले जाते. मुलांना
यज्ञाचा खूप रिस्पेक्ट असायला पाहिजे. यज्ञाचा एक पैसा देखील विचारल्या शिवाय उचलणे
किंवा माता-पित्याची परवानगी असल्या शिवाय कोणाला देणे, हे महान पाप आहे. तुम्ही तर
मुले आहात, कोणत्याही वेळी कोणतीही वस्तू मिळू शकते. जास्त घेऊन कशाला ठेवली पाहिजे.
असा विचार करतात माहित नाही उद्या मिळेल की नाही, तर असे आत ठेवल्यामुळे मग मन खात
राहते कारण बेकायदेशीर काम आहे ना. वस्तू तर तुम्हाला कधीही मिळू शकते. बाबांनी
सांगितले आहे अंतिम समयी अचानक कोणीही मरू तर शकतात. तर अंतिम समयी जी पापे केली
असतील ती कचरापट्टी सर्व समोर येईल म्हणून बाबा नेहमीच सांगत राहतात मनामध्ये
कोणत्याच प्रकाराची दुविधा राहता कामा नये. मन साफ असेल तर अंतिम समयी काहीच समोर
येणार नाही. यज्ञामधून तर सर्व काही मिळत राहते. अशी पुष्कळ मुले आहेत ज्यांच्या कडे
खूप पैसे आहेत. त्यांना म्हणतात जेव्हा गरज असेल तेव्हा मागून घेऊ. म्हणतात -
‘बाबा, कधीही गरज असेल तर आम्ही बसलो आहोत’. भले पवित्र राहत नाहीत. खाण्या-पिण्याचे
देखील नियम पाळत नाहीत. परंतु ही प्रतिज्ञा करतात - बाबा आमच्याकडे खूप पैसे पडलेले
आहेत, असेच उडून जातील. मध्येच कोणी खाऊन टाकतील त्यामुळे जेव्हा पाहिजे तेव्हा
मागून घ्या. बाबा म्हणतात - आम्ही देखील काय करणार. घर बांधायचे असते तेव्हा आपोआप
पैसे येतात. तर आपल्या घरामध्ये अशी पुष्कळ मुले बसली आहेत. तर अशी मुले देखील उच्च
पद प्राप्त करतात. प्रजेमध्ये देखील काही कमी पद नाहीये. राजांपेक्षाही कितीतरी
श्रीमंत खूप धनवान असतात त्यामुळे मनामध्ये कोणताच असा विचार करता कामा नये. तुमचे
वचन आहे - ‘बाबा, तुम्ही जे खाऊ घालाल…’ तरी देखील त्यावर चालत नाहीत तर दुर्गती
होते. बाबा आले आहेत सद्गती देण्याकरिता. सर्व उच्च पद मिळवणार नाही तर दुर्गतीच
म्हणावी लागेल ना. तिथे देखील खूप श्रीमंत, कोणी कमी पदवाले, कोणी उच्च पदवाले तर
आहेत ना. मुलांना श्रीमतानुसार पुरुषार्थ करायचा आहे. आपल्या मतावर चालल्याने
स्वत:लाच धोका देतात. हा शिवबाबांनी रचलेला यज्ञ आहे. याचे नावच आहे - ‘राजस्व
अश्वमेध अविनाशी रुद्र ज्ञान यज्ञ’. शिवबाबा येऊन स्वराज्य देतात. कोणाच्या
भाग्यामध्ये नसेल, तर नाव प्रसिद्ध होणारच नसेल तर मुखावाटे चांगले-चांगले पॉईंट्स
देखील निघणार नाहीत. कोणाला ज्ञान समजावून सांगत नाहीत तर म्हणणार - नाव निघण्यासाठी
अजून वेळ आहे, ज्यामुळे समजावून सांगत असताना मुख्य-मुख्य पॉईंट्स विसरून जातात. हे
देखील समजावून सांगितले पाहिजे - हा राजस्व अश्वमेध विनाशी रुद्र ज्ञान यज्ञ आहे,
स्वराज्य प्राप्त करण्यासाठी. बोर्डावर देखील लिहू शकता. या यज्ञामध्ये जुनी दुनिया
सर्व स्वाहा होते, यासाठी ही महाभारत लढाई उभी ठाकली आहे. विनाशाच्या अगोदर हे
स्वराज्य पद घ्यायचे असेल तर येऊन घ्या. बोर्डावर तर खूप काही लिहू शकता. एम
ऑब्जेक्ट देखील यावा. खाली लिहायचे आहे - स्वराज्य पद मिळते. जितके शक्य होईल
क्लियर लिखाण असले पाहिजे जेणेकरून कोणीही वाचून समजेल. बाबा डायरेक्शन देतात - अशा
प्रकारे बोर्ड बनवा. हा शब्द जरूर लिहा. पुढे चालून या यज्ञाचा प्रभाव खूप निघेल.
संकटे तर खूप येतील. म्हटले जाते - ‘सत्याची नाव हलेल-डुलेल परंतु बुडणार नाही’.
क्षीरसागराकडे जायचे आहे तर विषय सागराकडे मन असता कामा नये. जे ज्ञान घेत नाही
त्यांच्या मागे लागून आपला वेळ वाया घालवायचा नाही. स्पष्टीकरण तर खूपच सोपे आहे.
तुम्हीच पूज्य
देवी-देवता होते, आता पुजारी बनले आहात. मग बाबा म्हणतात - ‘मामेकम् (मज एकाची)
आठवण करा तर भेसळ निघून जाईल. तुमची पापे भस्म होतील दुसरा कोणताही उपाय नाही. हाच
खरा-खरा उपाय आहे. परंतु योगामध्ये राहत नाहीत. देह-अभिमान खूप आहे. देह-अभिमान
जेव्हा नष्ट होईल तेव्हा योगामध्ये राहू शकतील, आणि मग कर्मातीत अवस्था होईल. अंतिम
वेळी कोणत्याही वस्तूची आठवण येता कामा नये. काही-काही मुलांचा एखाद्या वस्तूमध्ये
इतका मोह असतो काही विचारू नका. शिवबाबांची कधीच आठवण करत नाहीत. अशा बाबांची विशेष
आठवण करायची आहे. म्हटले जाते - ‘हथ कार डे दिल यार डे…’ असे खूप मुश्किलीने
कोणाच्या लक्षात राहते. वर्तनावरूनच माहित होते. यज्ञाचा रिगार्ड राहत नाही. या
यज्ञाचा खूप सांभाळ केला पाहिजे. सांभाळ केला अर्थात बाबांना खुश केले. प्रत्येक
गोष्टीमध्ये सांभाळले पाहिजे. गरिबांचा पैसा-पैसा या यज्ञामध्ये येतो ज्यामुळे ते
पदमपती बनतात. माता ज्यांच्याकडे काहीच नाहीये, एक-दोन रुपये, आठ आणे यज्ञामध्ये
देतात त्या पदमपती बनतात कारण मोठ्या भावनेने आनंदाने आणून देतात. बाबा म्हणतात -
मी आहेच गरीब निवाज. तुम्हा मुलांसाठीच तर आलो आहे. कोणी आठ आणे घेऊन येतात. बाबा
घराला एक विट लावा. कधी दोन मुठी धान्य देखील घेऊन येतात. त्याचे तर भरपूर होते.
दाणा-दाणा एका मोहरे समान बनतो. असे थोडेच आहे की तुम्हाला गरिबांना बसून दान
द्यायचे आहे. गरिबांना तर ते लोक दान देतात. असे तर दुनियेमध्ये असंख्य गरीब आहेत.
सगळे येऊन इथेच बसले तर डोकेच खराब करतील. असे तर खूपजण म्हणतात की, आम्ही
यज्ञामध्ये समर्पित व्हावे. परंतु जपून काळजीपूर्वक घ्यावे लागते. असे होऊ नये की
यज्ञामध्ये येऊन गोंधळ माजवेल. यज्ञामध्ये तर खूप पुण्य आत्मा बनले पाहिजे. खूप
सांभाळ केला पाहिजे. यज्ञाप्रती रिगार्ड वाटला पाहिजे. ज्या ईश्वरीय यज्ञा द्वारे
आपण आपला शरीर निर्वाह करतो. यज्ञाचा पैसा कोणाला देणे खूप मोठे पाप आहे. हे पैसे
आहेतच त्यांच्या करिता जे कवडी पासून हिऱ्या समान बनतात, ईश्वरीय सेवेमध्ये आहेत,
बाकी गरिब इत्यादींना देणे हे दान पुण्य तर जन्मो-जन्मी करत आला आहात. उतरता-उतरता
पाप आत्माच बनत गेलात.
तुम्ही मुले सर्वांना
बाबांचा परिचय देण्याकरिता छोट्या-छोट्या गावांमध्ये देखील प्रदर्शनी करत रहा. एक
जरी गरीब निघाला तरी ते देखील चांगले आहे, यामध्ये कोणता खर्च तर नाहीये.
लक्ष्मी-नारायणाने ही राजाई मिळवली, काय खर्च केला. काहीच नाही. विश्वाची बादशाही
मिळविण्याकरिता खर्च तर काहीच केला नाही. ते लोक आपसामध्ये किती भांडतात. दारूगोळा
इत्यादीवर किती खर्च करतात. इथे तर खर्चाचा काही प्रश्नच नाही. बिना कवडी खर्च करता,
सेकंदामध्ये विश्वाची बादशाही घ्या. अल्फची आठवण करा. बे बादशाही तर आहेच. बाबा
म्हणतात - जितके शक्य होईल सच्च्या दिलाने सच्च्या साहेबाला राजी करा, तर सचखंडाचे
मालक बनाल. खोटे इथे चालणार नाही. आठवण करायची आहे. असे नाही की आम्ही तर मुले
आहोतच. आठवण करण्यामध्ये खूप मेहनत आहे. कोणते विकर्म केले तर खूप घोटाळ्यामध्ये
याल. बुद्धी इथे टिकणार नाही. बाबा तर अनुभवी आहेत ना. बाबा सांगत राहतात. कितीतरी
मुले स्वतःला मिया मिट्ठू समजतात परंतु बाबा म्हणतात - खूप मेहनत आहे. माया खूप
विघ्न आणते. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) आपल्या या
रुद्र यज्ञाचा खूप-खूप रिस्पेक्ट ठेवायचा आहे. यज्ञाचे वातावरण खूप शुद्ध, पॉवरफुल
बनविण्यामध्ये सहयोगी बनायचे आहे. याचा खूप प्रेमाने सांभाळ करायचा आहे.
२) आपल्याकडे काहीही
लपवून ठेवायचे नाही. दिल साफ तो मुराद हाँसिल (मन स्वच्छ असेल तर इच्छा पूर्ण). या
यज्ञाची कवडी-कवडी अमूल्य आहे त्यामुळे एकही कवडी व्यर्थ घालवायची नाही. याच्या
वृद्धी साठी सहयोग द्यायचा आहे.
वरदान:-
तिन्ही काळांना
समोर ठेवून प्रत्येक कार्यामध्ये सफल होणारे सदा विजयी भव
लौकिक रितीने देखील
जे हुशार असतात ते मागचा पुढचा विचार करून मग पाऊल उचलतात. असे इथे देखील तुम्ही
मुले जेव्हा कोणते कार्य करता तर आधी तिन्ही काळांना समोर ठेवून मग करा, फक्त
वर्तमानाला पाहू नका, बेहदचे शहाणपण धारण करा आणि विजयी होण्याच्या निश्चयाच्या
आधारावर किंवा त्रिकालदर्शी स्थितीच्या आधारावर प्रत्येक कर्म करा किंवा प्रत्येक
शब्द बोला तेव्हा म्हटले जाईल अलौकिक किंवा असाधारण.
बोधवाक्य:-
हदच्या
किनाऱ्यांना सोडून एका बाबांना सहारा बनवा तर पार व्हाल.
हे अव्यक्त इशारे -
“निश्चयाच्या फाउंडेशनला मजबूत करून सदैव निर्भय आणि निश्चिंत रहा”
बरीच मुले असे समजतात
की, ‘मी स्वतःला जाणतो की मी ठीक आहे, दुसरे जाणत नाहीत किंवा दुसरे ओळखत नाहीत,
शेवटी ओळखतीलच किंवा पुढे चालून बघा काय होते ते’! हे देखील ज्ञान स्वरूप, आठवण
स्वरूप आत्म्यासाठी स्वतःला धोका देणारी आळशीपणाची गोड झोप आहे. ज्या मुलांचे
निश्चयाचे फाउंडेशन मजबूत आहे ते कधीही लपू शकत नाहीत. ते नेहमी निर्भय आणि
निश्चिंत राहतात.