30-05-2026      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - आपले सर्व काही ईश्वरीय सेवेमध्ये सफल करून भविष्य बनवा कारण मृत्यू डोक्यावर आहे”

प्रश्न:-
ज्ञान ऐकत असताना देखील मुलांमध्ये ज्ञानाची धारणा का होत नाही?

उत्तर:-
कारण विचार सागर मंथन करता येत नाही. बुद्धियोग देह आणि देहाच्या नात्यांमध्ये अडकलेला आहे. सर्वप्रथम बुद्धीतून मोह जेव्हा निघेल, तेव्हा थोडीफार धारणा देखील होईल. मोह, ही एक अशी गोष्ट आहे, जी एकदम मर्कट बनवते म्हणून बाबा मुलांना अगदी सुरुवातीला केलेल्या प्रतिज्ञेची आठवण करून देत आहेत - देहासहित देहाच्या सर्व नात्यांना विसरा आणि माझी आठवण करा.

गीत:-
भोलेनाथ से निराला…

ओम शांती। बाबा बसून समजावून सांगत आहेत, आता मुलांना हे तर चांगल्या रीतीने ठाऊक झाले आहे की, बेहदच्या पित्यालाच म्हटले जाते - बिगडीला बनविणारे (बिघडलेल्या भाग्याला ठीक करणारे). श्रीकृष्ण बिगडीला (बिघडलेल्या भाग्याला) सुधारू शकत नाहीत. गीतेचा भगवान श्रीकृष्ण नाहीत, परंतु शिव आहेत. शिवबाबा रचयिता आहेत आणि श्रीकृष्ण रचना आहे. स्वर्गाचा वारसा देणारे, स्वर्गाचे रचयिताच असू शकतात. हीच भारताची मुख्य मोठ्यात मोठी चूक आहे. श्रीकृष्णाला कोणीही बाबा म्हणू शकत नाही. वारसा बाबांकडूनच मिळतो आणि भारतालाच मिळाला होता. भारतामध्येच श्रीकृष्ण राजकुमार, राधे राजकुमारी म्हणून गायली गेली आहे. महिमा उच्च ते उच्च एका बाबांचीच आहे. श्रीकृष्ण आहेत उच्च ते उच्च रचना, विश्वाचे मालक. त्यांना म्हटले जाते सूर्यवंशी डिटी डिनायस्टी. गीता हे आदि सनातन देवी-देवता धर्माचे शास्त्र आहे. सतयुगामध्ये काही कोणाला ज्ञान ऐकवलेले नाहीये. संगमावरच बाबांनी ऐकविले आहे. चित्रांमध्ये देखील पहिले हे सिद्ध करायचे आहे. दोघांचीही चित्रे दाखवतो, गीतेचे भगवान, हे रचयिता आहेत, जे पुनर्जन्मरहित आहेत, ना की श्रीकृष्ण, रचना. तुम्ही जाणता - शिवबाबाच हिरे-तुल्य बनवतात. गायले देखील जाते - हिरे-तुल्य, कवडी-तुल्य. मुलांच्या बुद्धीमध्ये हे राहिले पाहिजे की बाबांचा आदेश आहे - तुम्ही माझी आठवण करा आणि वारशाची आठवण करा. ते आहेत बेहदचे पिता. कृष्ण तर आहे हदचा मालक. भले विश्वाचा राजा बनतो, शिवबाबा काही राजा बनत नाहीत ना. खरे पाहता गीतेची खूप मोठी महिमा आहे. त्याच सोबत भारताची देखील महिमा आहे. भारत सर्व धर्मियांचे सर्वांत मोठे तीर्थ आहे. फक्त कृष्णाचे नाव टाकल्या कारणाने सारे महत्वच नाहीसे झाले आहे. याच कारणामुळे भारत कवडी-तुल्य बनला आहे. आहे तर ड्रामा अनुसार परंतु सावध करावे लागते. बाबा खूप चांगल्या रीतीने समजावून सांगतात. दिवसें-दिवस गूढ गोष्टी ऐकवत राहतात; तर मग जुन्या चित्रांना बदलून दुसरी बनवावी लागतील. हे तर शेवट पर्यंत होतच राहील. मुलांनी व्यवस्थित लक्षात ठेवले पाहिजे की, शिवबाबा आपल्याला वारसा देत आहेत. म्हणतात - मामेकम् (मज एकाची) आठवण करा तर विकर्म विनाश होतील. कृष्णाची आठवण केल्याने विकर्म विनाश होणार नाहीत. तो काही सर्वशक्तिमान तर नाहीये. सर्वशक्तीमान बाबा आहेत, वारसा देखील तेच देतात. मनुष्य, श्रीकृष्णाचीच आठवण करत राहतात. अच्छा, कृष्णाने म्हटले आहे असे समजा. परंतु ते देखील म्हणतात - देहाची नाती सोडून, मामेकम् (मज एकाची) आठवण करा. आत्मा तर बाबांचीच आठवण करेल ना. श्रीकृष्ण काही सर्व आत्म्यांचा पिता नाही आहे. हे सर्व विचार सागर मंथन करून बुद्धीमध्ये धारण केले पाहिजे. कोणी तर मोहामध्ये अडकल्या कारणाने मग धारणा करू शकत नाहीत. तुम्ही गात आला आहात - ‘और संग तोड़ आप संग जोड़ेंगे’, ‘मेरा तो एक, दुसरा ना कोई’. परंतु मोह ही एक अशी गोष्ट आहे जी एकदम माकडच बनवते. माकडामध्ये मोह आणि लोभ खूप असतो. श्रीमंत लोकांना देखील सांगितले जाते की आता मृत्यू समोर उभा आहे. हे सर्व ईश्वरीय सेवेमध्ये लावा, भविष्य बनवा. परंतु माकडा सारखे लटकून राहतात, सोडतच नाहीत. बाबा म्हणतात - जी पण देहा सहित देहाची नाती आहेत त्यातून बुद्धियोग काढून टाका. बाबांच्या श्रीमतावर चाला. तुम्ही म्हणता - हे धन, मुले-बाळे इत्यादी सर्व ईश्वराने दिले आहे. आता ते स्वतः आले आहेत, म्हणतात - तुमचे हे धन-दौलत इत्यादी सर्व नष्ट होणार आहे. ‘किनकी दबी रही धूल मे…’ भूकंप इत्यादी होतील, हे सर्व नष्ट होईल. विमाने खाली कोसळतात किंवा आग इत्यादी लागते तेव्हा पोलीस येईपर्यंत सर्वात आधी चोर आतमध्ये घुसतात. तर बाबा समजावून सांगत आहेत - मुलांनो देहधारीं मधून मोह काढून टाकला पाहिजे. मोहजीत बनायचे आहे. देह-अभिमान आहे सर्वात पहिल्या नंबरचा शत्रू. देवता देही-अभिमानी आहेत. देह-अभिमानामध्ये आल्यानेच विकारांमध्ये अडकून पडतात. तुम्ही अर्धा कल्प देह-अभिमानी होऊन राहिला आहात. आता देही-अभिमानी बनण्याची प्रॅक्टिस करायची आहे. जे पण मनुष्यमात्र आहेत ते या गोष्टींना अजिबातच जाणत नाहीत, ना परमात्म्याला जाणतात. आत्मा काय आहे, परमात्मा कोण आहेत, आत्मा किती जन्म घेते, कसा पार्ट बजावते, आपण ॲक्टर्स आहोत - हे कोणालाच माहीत नाहीये, म्हणून अनाथ, निधनके म्हटले जाते. ते (दुनियावाले) तर म्हणतात, आत्मा ज्योतीमध्ये लीन होते. परंतु आत्मा तर अविनाशी आहे. आत्म्यामध्येच ८४ जन्मांचा पार्ट नोंदलेला आहे. म्हटले देखील जाते - आत्मा स्टार आहे, तरी देखील समजत नाहीत. आत्मा सो परमात्मा म्हणतात, बाबांना तर अजिबातच जाणत नाहीत. आत्म्यासाठी म्हणतात देखील - ‘भ्रकुटी के बीच में सितारा चमकता है’. परमात्म्यासाठी तर काहीच सांगत नाहीत. त्यांना परम-आत्मा म्हटले जाते, ते देखील परमधाममध्ये राहतात. ते देखील बिंदू आहेत. फक्त पुनर्जन्मरहित आहेत, आत्मे पुनर्जन्मामध्ये येतात. परमात्म्याकरिता म्हटले जाते - ज्ञानाचा सागर, आनंदाचा सागर, पवित्रतेचा सागर आहे. देवतांना हा वारसा कोणी दिला? बाबांनी. सर्वगुण संपन्न, १६ कला संपूर्ण… या देवतांसारखा आता कोणीच नाही आहे. त्यांना हा वारसा कसा मिळाला, हे कोणालाच माहीत नाही. बाबाच येऊन सांगतात, त्यांनाच ज्ञानाचा सागर म्हटले जाते. यावेळी येऊन ज्ञान देतात, नंतर मग हे ज्ञान प्राय:लोप होते. त्यानंतर आहे भक्ती, त्याला ज्ञान म्हटले जाऊ शकत नाही. ज्ञानाद्वारे तर सद्गती होते. जेव्हा दुर्गती होईल, तेव्हाच सर्वांचे सद्गती दाता, ज्ञानाचे सागर येतील. बाबाच येऊन ज्ञानाचे स्नान घालतात. ते तर पाण्याचे स्नान आहे, त्याच्या द्वारे सद्गती होऊ शकत नाही. या छोट्या-छोट्या गोष्टी देखील धारण केल्या पाहिजेत. जी चांगली-चांगली मुख्य चित्रे आहेत, ती मोठ्या साईझ मध्ये असावीत जेणेकरून कोणीही व्यवस्थित समजू शकेल. त्यावरील लिखाण अगदी सुस्पष्ट असावे. चित्रे बनविणाऱ्यांनी ही गोष्ट नीट लक्षात ठेवली पाहिजे. कोणालाही निमंत्रण देऊन बोलवायचे आहे की, येऊन परमपिता परमात्म्याचा परिचय घ्या आणि भविष्य २१ जन्मांकरिता बाबांकडून वारसा घ्या. बंधू आणि भगिनींनो, पारलौकिक पित्याकडून बेहद सुखाचे स्वराज्य कसे मिळते - ते येऊन समजून घ्या. बेहदच्या बाबांकडून वारसा घ्यायला शिका, यामध्ये घाबरण्याचा काही प्रश्नच नाही. बोलावत राहतात - ‘हे पतित-पावन या’.

बाबा देखील म्हणतात - काम महाशत्रू आहे. पावन दुनियेमध्ये जायचे असेल तर पवित्र जरूर बनायचे आहे. पतित त्यांना म्हटले जाते जे विकारातून जन्म घेतात. सतयुग-त्रेतामध्ये विष (विकार) असत नाही; त्याला म्हटलेच जाते - संपूर्ण निर्विकारी दुनिया. विकारच नसतात. तरी देखील तुम्ही असे का विचारता - तिथे मुले कशी जन्म घेतील? पहिले तुम्ही निर्विकारी तर बना, बाळ जसे जन्म घेणार असेल तसे घेईल, तुम्ही हे विचारताच कशाला? तुम्ही बाबांची आठवण करा तर जन्म-जन्मांतरीची विकर्म विनाश होतील, ही आहेच पाप आत्म्यांची दुनिया. ती आहे पुण्य आत्म्यांची दुनिया. हे बुद्धीमध्ये व्यवस्थित रित्या पक्के करायचे आहे. भक्तीचे फळ भगवान येऊन देतात, बाबाच सर्वांची सद्गती करून स्वर्गाचे मालक बनवतात. बाबा म्हणतात - आता पवित्र बना, मामेकम् (मज एकाची) आठवण करा, हा आहे महामंत्र. बाबांकडून वारसा जरूर मिळणार आहे. बाबा म्हणतात - तुम्ही माझी आठवण करा तर तुम्ही सतोप्रधान बनाल. शिडीच्या चित्रावरून समजावून सांगायचे आहे. दिवसेंदिवस प्रत्येक गोष्टीमध्ये सुधारणा होत जाते, यामध्ये क्लिअर करून लिहायचे आहे. ब्रह्माद्वारे आदि सनातन देवी-देवता धर्माची स्थापना. जेव्हा आदि सनातन देवी-देवता धर्म होता तेव्हा इतर कोणताही धर्म नव्हता. जे पवित्र बनतात तेच पवित्र दुनियेमध्ये येतील. तुमच्यामध्ये जितकी ताकद भरत जाईल, तितके तुम्ही लवकर याल. सगळेच काही एकत्र येणार नाहीत. हे देखील जाणता सतयुग-त्रेतामध्ये देवी-देवता फार थोडे असतात, नंतर मग वृद्धी होत जाते. प्रजा तर पुष्कळ असेल. ज्ञान समजावून सांगणारे देखील खूप चांगले पाहिजेत. तुम्ही बोला - ‘येऊन बेहदच्या बाबांकडून वारसा घ्या, ज्यांना तुम्ही बोलावता ‘हे बाबा’, त्यांचे खरे नाव शिव आहे’. ईश्वर, प्रभू अथवा भगवान म्हटल्याने हे समजत नाही की ते आपले पिता आहेत, त्यांच्याकडून वारसा मिळतो. ‘शिवबाबा’ म्हटल्याने वारशाची आठवण होते. त्यांना आपण शिव परमात्माये नमः म्हणतो, परमात्म्याचे नाव तर सांगा. कोणीही नावा-रूपा पासून न्यारे नाही. त्यांचे तर नाव ‘शिव’ आहे. फक्त ‘शिवाय नमः’ सुद्धा म्हणायचे नाही, ‘शिव परमात्माये नमः’ म्हणावे लागेल. प्रत्येक शब्दाचा अर्थ खूप बारकाईने स्पष्ट करून समजावून सांगायचा आहे. ‘शिवाय नमः’ म्हटल्याने देखील पित्याच्या नात्याचा आनंद मिळत नाही. लोकांनी तर सर्व नावे स्वतःलाच दिली आहेत. तुम्ही जाणता मनुष्याला कधीही भगवान म्हटले जात नाही. ब्रह्मा, विष्णु, शंकराला देखील देवता म्हटले जाते. बाबा रचयिता तर एक निराकारच आहेत. जसे लौकिक पिता मुलांना रचतात ना, वारसा देतात, तसेच बेहदचे पिता देखील वारसा देतात. भारताला विश्वाचा मालक बनवतात. साऱ्या दुनियेचे पतित-पावन एक बाबाच आहेत, हे थोडेच कोणाला ठाऊक आहे. आपले धर्म स्थापक देखील यावेळी पतित आहेत, कब्रदाखल आहेत. आता सर्वांच्या कयामतची वेळ (महाविनाशाची वेळ) आहे. बाबाच येऊन सर्वांना जागे करतील. महाविनाशाच्या वेळीच खुदा, भगवान येतात. तेच ज्ञानाचा सागर आहेत. लिहिलेले आहे - सागराची मुले भस्मिभूत झाली होती अर्थात काम-चितेवर बसून काळी, आइरन एज्ड बनली होती, मग आता सुंदर कशी बनतील? बाबा म्हणतात आठवणीच्या यात्रेद्वारे. ‘योग’ शब्द म्हटल्याने माणसे गोंधळून जातात. बाबा म्हणतात - माझी आठवण करा तर ‘अंत मती सो गति होईल’. किती सोपे करून समजावून सांगतात तरी देखील या गोष्टी बुद्धीमध्ये का बसत नाहीत? देह-अभिमान खूप आहे त्यामुळे धारणा होत नाही. बाबा खूप चांगली युक्ती सांगतात. बेहदच्या बाबांनी, ज्यांची आठवण करतात त्यांनी येऊन काय केले? भारताला स्वर्ग बनवले होते. हदचा वारसा तर जन्म-जन्मांतर घेत आला आहात. आता बेहदच्या बाबांकडून २१ जन्मांकरिता बेहदचा वारसा घ्या. सतयुग-त्रेतामध्ये देवता राज्य करत होते. सूर्यवंशी मग चंद्रवंशी सो मग वैश्यवंशी आणि मग शूद्रवंशी बनतात. सो शब्द टाकल्याने हे सिद्ध होते की तेच पुनर्जन्म घेतात, वर्णांमध्ये येतात. बाबा समजावून तर सर्वांनाच सांगतात, तुम्ही सन्मुख बसले आहात तर आनंदी होता. काहीजणांच्या भाग्यात नसेल तर सेवाच करत नाहीत. सेवा करतील तर नाव होईल. म्हणतील - ‘बाबांच्या मुली किती हुशार आहेत, सर्व प्रकारची कामे करतात, आम्हाला स्वर्गाच्या बादशाहीचा वारसा देतात, हे वक्खर (माल) देखील देतात. ही चित्रे आहेत - आंधळ्यांसमोर आरसा, यामध्ये जादू इत्यादीचा प्रश्नच नाही. पवित्रतेचीच मुख्य गोष्ट आहे. समजतात - हा अंतिम जन्म आहे, स्वर्गामध्ये यायचे असेल तर पवित्र जरूर बनायचे आहे. विनाश समोर उभा आहे. पावन जरूर बनावे लागेल. संन्याशी पावन बनण्यासाठी घरदार सोडतात. बाबा म्हणतात - विनाश समोर उभा आहे, माझी आठवण करा तर बेडा पार होईल. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) विनाश होण्या अगोदर आपले सर्व काही सफल करायचे आहे. ही कयामतची वेळ आहे त्यामुळे पावन जरूर बनायचे आहे.

२) देहधारीं मधून मोह काढून मोहजीत बनायचे आहे. देह-अभिमान जो पहिल्या नंबरचा शत्रू आहे त्याच्यावर विजय मिळवायचा आहे. इतर सर्व संग तोडून, बाबांशी बुद्धियोग जोडायचा आहे.

वरदान:-
आठवणीच्या मंत्रा द्वारे संकल्प आणि कर्मामध्ये अविनाशी सिद्धी प्राप्त करणारे सिद्धी स्वरूप भव

तुम्ही मुले ऑलमाईटी गव्हर्मेंटचे मेसेंजर आहात त्यामुळे कोणाशीही चर्चा करण्यात आपली बुद्धी डिस्टर्ब करून घ्यायची नाही. आठवणीच्या मंत्राला युज करायचे आहे. ज्याप्रमाणे कोणी वाणीद्वारे किंवा अन्य कोणत्याही पद्धतीने वश होत नाहीत तेव्हा मंत्र-तंत्राचा वापर करतात, तुमच्याकडे आत्मिक दृष्टीचा नेत्र आणि मनमनाभवचा मंत्र आहे ज्याद्वारे आपल्या संकल्पांना सिद्ध करून सिद्धी स्वरूप बनू शकता.

बोधवाक्य:-
ॲक्शन-कॉन्शस बनण्या ऐवजी सोल-कॉन्शस बना.

हे अव्यक्त इशारे - सदैव अचल, अडोल एकरस स्थितीचा अनुभव करा.

‘एकरस’ याचा अर्थ असा नाही की पुरुषार्थाचा वेग नेहमी एक सारखाच असावा. एकरस अर्थात नेहमी उडत्या कलेचा अनुभव होत रहावा. सर्व नात्यांची अविनाशी तार एकासोबतच जोडलेली असावी. ‘एक बाबा दुसरे ना कोणी’, हा दृढ संकल्प असावा, एकाही नात्याची कमतरता नसावी, सर्व नात्यांचा दोर एकाशीच बांधलेला असावा तेव्हा एकरस स्थिती स्वतःच राहील.