30-06-2026      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो, यावेळी तुम्ही बाबांवर बलिहार जाल तर २१ जन्मांकरिता तुम्ही कायमचे सुखी व्हाल”

प्रश्न:-
ज्ञानी मुलांना आपली अवस्था मजबूत करण्यासाठी कोणती सवय पक्की केली पाहिजे?

उत्तर:-
पहाटे लवकर उठण्याची सवय पक्की केली पाहिजे. पहाटे लवकर उठून बाबांच्या आठवणीमध्ये बसणे - ही खूप चांगली धारणा आहे. जी मुले लवकर झोपतात आणि लवकर उठतात त्यांची अवस्था दिवसभर मजबूत राहते. अज्ञानी लोकांच्या झोपेपेक्षा ज्ञानी मुलांची झोप अर्धी असायला पाहिजे. १० वाजता झोपा आणि २ वाजता उठून बसा.

गीत:-
मुझको सहारा देने वाले…

ओम शांती।
सर्व मुले सन्मुख बसली आहेत तर जाणतात आपण जीव-आत्मे आहोत. इथे तर जीव-आत्मेच असतील ना. जेव्हा आत्म्याला शरीर नसते तर नअंगी आहे, त्याला अशरीरी म्हटले जाते. तुम्ही तर शरीरासहीत बसले आहात. आत्मा अथवा परमात्मा जोपर्यंत शरीरामध्ये येत नाही तोपर्यंत बोलू शकत नाही. तुम्ही जीव-आत्मे जाणता, आता बाबांच्या सन्मुख बसलो आहोत. हुबेहूब जसे ५ हजार वर्षांपूर्वी सन्मुख आलो होतो. मुले जरूर बाबांकडून वारसाच घेतील. जाणतात आपण आपल्या परमपिता परमात्मा बेहदच्या बाबांच्या सन्मुख बसलो आहोत. कशासाठी बसलो आहोत? बाबांकडून बेहदचा वारसा घेण्याकरिता. जसे स्कूलमध्ये समजतात की, आपण टीचर कडून इंजीनियरिंग, बॅरिस्टरी शिकत आहोत. हे एम ऑब्जेक्ट असते. तुम्ही मुले समजता - परमपिता परमात्मा आम्हाला ब्रह्माच्या तनाद्वारे बसून राजयोग शिकवत आहेत. भगवानुवाच हे तर मुलांना समजावून सांगितले आहे की भगवान निराकाराला म्हटले जाते. जीव-आत्मे पुनर्जन्म जरूर घेतात. कोणत्याही संन्याशाला तुम्ही विचारा - मनुष्य पुनर्जन्म घेतात का? तर ते असे म्हणणार नाहीत की, घेत नाहीत. नाहीतर मग ८४ लाख जन्म कसे म्हटले असते? विचारा - तुम्ही पुनर्जन्मांना मानता का? हे तर बरोबर आहे, आत्मा संस्कारा नुसार एक शरीर सोडून मग दुसरे घेते. असे काही-काही मनुष्य ८४ जन्म घेतात. ८४ लाख जन्मांची तर गोष्टच नाही. पहिला जन्म जरूर अतिशय उत्तम सतोप्रधान असेल आणि शेवटचा जन्म विकारी तमोप्रधान असेल. १६ कला पासून मग १४ कला, १२ कला होत जातील, पुनर्जन्म जरूर घेतात. विचारले पाहिजे - ‘अच्छा, परमपिता परमात्मा पुनर्जन्म घेतात की पुनर्जन्म रहित आहेत?’ पाहा, हा पॉईंट खूप सूक्ष्म आहे. जर म्हणाले जन्म-मरण रहित आहेत तर मग शिवजयंती सिद्ध होत नाही. म्हणतील शिव जयंती तर साजरी केली जाते. समजावून सांगितले जाते - होय, शिव जयंती आहे परंतु जन्मा सोबत मृत्यू ज्याला म्हटले जाते तो नाहीये. जर त्यांचा (शिवबाबांचा) मृत्यू झाला तर मग पुनर्जन्म घेतील. बाबा कधीही पुनर्जन्म घेत नाहीत. ते या तनामध्ये एकदाच येतात, बस्स, पुन्हा मग पुनर्जन्मामध्ये येत नाहीत. परमपिता परमात्मा पुनर्जन्म रहीत आहेत, ते कधीही सतोप्रधानापासून तमोप्रधान बनत नाहीत. आत्मे तर सर्व जन्म-मरणामध्ये येत-येत पतित बनतात, तर मग बाबा पावन बनविण्याकरिता येतात. यावरून सिद्ध होते की आत्माच पतित बनते, आत्मा घरून पावन येते आणि मग माया पतित बनवते. बाबा काही कधी पतित बनवणार नाहीत. बाबा कधीही मुलांना वाईट मत देणार नाहीत. यावेळचे मनुष्य पतित मतच देतात. आता पावन बाबा सांगत आहेत की, पतित बनू नका अर्थात विकारामध्ये जाऊ नका. रावणाच्या मतामुळे दुःखधाम बनले आहे. पहिले सुखधाम होते. असे नाही बाबाच सुख-दुःख देतात. नाही, बाबा मुलांना कधीही दुःखी करणारे मत देऊ शकत नाहीत. मायाच दुःख देते. त्या मायेवर विजय प्राप्त केल्याने तुम्ही जगतजीत बनता. मनुष्य मायेचा अर्थ समजत नाहीत. ते धनालाच माया समजतात. म्हणतात ना - याला मायेचा नशा खूप आहे. परंतु मायेचा नशा नसतो. तिथे रावणाचा पुतळा बनवून जाळत नाहीत. पुतळा तर शत्रूचा बनवला जातो. रावण राज्य सुरू होते अर्ध्या कल्पापासून. अहंकारामध्ये आल्याने मग इतर विकार येतात. शास्त्रांमध्ये लिहिलेले आहे - देवता वाम मार्गामध्ये अर्थात विकारांमध्ये जातात. मायेच्य अधीन झाल्याने पतित बनतात. परमतावर चालत राहतात. आता तुम्ही चालता - श्रीमतावर. पर-मत अर्थात मायेचे मत, श्री अर्थात श्रेष्ठ बाबांचे मत. ते आहे रावणाचे मत, परमत म्हणून बाबांनी सांगितले आहे - सर्व आसुरी संप्रदाय रावणाच्या बेड्यांमध्ये जखडलेले दुःखी आहेत.

मनुष्यांना वाटते की, सतयुगाचा कालावधी लाखो वर्षांचा आहे. तुम्ही तर हिशोब सांगता - ५ हजार वर्षे कशी आहेत. क्राईस्टला २,००० वर्षे झाली, बुद्धाला २,२५० वर्षे झाली मग इस्लामीला २,५०० वर्षे झाली. सर्वांचे मिळून अर्धे कल्प झाले. त्यांच्या अगोदर तर देवतांचे राज्य होते मग देवतांना लाखो वर्षे कसे म्हणू शकतात. इतके मनुष्य असते मग तर प्रचंड लोकसंख्या झाली असती. इतकी काही लोकसंख्या नाही आहे. अवघ्या ५ हजार वर्षांमध्येच लोकसंख्या करोडोंच्या घरात पोहोचली आहे. म्हणतात देखील क्राईस्टच्या ३ हजार वर्षांपूर्वी भारतामध्ये आदि सनातन देवी-देवताधर्म होता. ५ हजार पूर्ण होतात, नाटक पूर्ण होते ना. या गोष्टींना कोणीही समजत नाहीत. मी जो आहे, जसा आहे, हे चक्र कसे फिरते, कोणालाच कळू शकत नाही. बाबाच समजावून सांगतात - हा आहे गीता एपिसोड. बाबांनी येऊन सहज राजयोग शिकवला होता. बाबा वृद्ध मातांना देखील सांगतात की, ही खूप सोपी गोष्ट आहे. फक्त बाबांची आणि वारशाची आठवण करायची आहे. बाळ जन्माला आले जणू वारसदार जन्माला आला. तुम्ही समजता आपण बाबांचे वारसदार आहोत. ५ हजार वर्षा नंतर पुन्हा भेटण्याकरिता आलो आहोत. या खूप गुप्त गोष्टी आहेत. बाबा विचारतात - ‘अगोदर कधी भेटले होतात?’ म्हणतात - ‘हो बाबा.’ आत्मा या मुखाद्वारे म्हणते - आम्ही ५ हजार वर्षांपूर्वी तुम्हाला भेटलो होतो. तुम्ही या तनाद्वारे शिक्षण देण्याकरिता आला होता. जी चांगली पक्की मुले आहेत ती समजतात की, आपण बाबांकडून बेहदचा वारसा घेण्याकरिता बसलो आहोत, आम्ही ब्रह्मा द्वारे बेहदच्या बाबांचे बनलो आहोत. बाबा म्हणतात - ‘मला ओळखता का, मी तुमचा पिता आहे’. तुम्ही म्हणाल - ‘होय बाबा, आम्हा आत्म्यांचे तुम्ही परमपिता परमात्मा पिता आहात’. बाबा देखील म्हणतात - तुम्हाला मी स्वर्गामध्ये पाठवले होते, वारसा दिला होता, आणि नंतर मग मायेने हिरावून घेतला; आता पुन्हा मी देत आहे. माया वारसा हिरावून घेते, तर बाबा तो परत मिळवून देतात. हा खेळ अनेकदा झालेला आहे, होत राहील. याला काही अंत नाही. बाबांचे बनतात, मग कोणी जवळचे बनतात तर कोणी दूरचे बनतात. कोणी सख्खे, तर कोणी सावत्र बनतात. कच्चे-पक्के तर आहेत ना. पक्के असणाऱ्यांना देखील कधी-कधी माया एकदम जिंकून घेते. मुले म्हणतात - ‘बाबा, आम्ही जोपर्यंत जिवंत आहोत, तोपर्यंत आम्ही तुमच्याकडून वारसा घेत राहणार’. विकर्मांचे ओझे डोक्यावर खूप आहे. तर जितके तुम्ही आठवणीमध्ये राहाल त्या योग-अग्नीद्वारे तुम्ही पाप-आत्म्या पासून पुण्य-आत्मा बनत जाल. अग्नी वस्तूला पवित्र करतो. तुमचा आहे योग-अग्नी. हा बेहदचा यज्ञ आहे. बेहदच्या शेठने (शिवबाबांनी) बेहदचा यज्ञ रचला आहे. इतकी वर्षे कोणताही यज्ञ चालत नाही. ७-८ दिवस किंवा एक महिन्याकरिता यज्ञ रचतात. तुमचा हा यज्ञ तर अनेक वर्षांपासून सुरू आहे. बाबा तर हेच समजावून सांगत असतात. म्हणतात - विसरू नका, फक्त माझी आठवण करा म्हणजे मग तुमचे जन्म-जन्मांतरीचे विकर्मांचे ओझे हळूहळू नष्ट होत जाईल. भगवानुवाच - ‘मज आपल्या पित्याची आठवण करा’. जरूर आलेले आहेत तेव्हाच तर सांगत आहेत ना.

बाबा म्हणतात - आता तुम्हाला परत जायचे आहे. तुमची आत्मा या वेळी खूप पतित आहे. आता तुम्ही जाणता योगाद्वारे आपण पावन बनत जाणार. तुमची तर प्रतिज्ञा आहे की, तुम्ही जेव्हा याल तेव्हा बाकी सर्वांची संगत सोडून तुमच्याशी संगत जोडू, तुमच्यावर बलिहार जाऊ. पत्नी, पतीवर आणि पती, पत्नीवर बलिहार जातात. इथे आहे बाबांवर बलिहार जाणे. लग्नानंतर एकमेकांवर बलिहार जातात ना. आता बाबा म्हणतात - तुम्हाला कोणा मनुष्यावर बलिहार जायचे नाहीये. तुमची प्रतिज्ञा आहे - तुमच्यावर बलिहार जाऊ. तुम्ही माझ्यावर बलिहार जा, तर मग मी तुम्हाला २१ जन्म कायमचे सुखी बनवेन. किती श्रेष्ठ वारसा आहे. श्रीमताद्वारे तुम्ही श्रेष्ठ बनाल, हे विसरू नका. लक्ष्मी-नारायणाचे चित्र देखील घरी ठेवा. आम्ही बाबांकडून हा वारसा घेत आहोत. बाबा परमधामहून आलेले आहेत, परंतु माया गिधाड सुद्धा काही कमी नाहीये. सर्वांचीच गोष्ट नाहीये परंतु नंबरवार आहेत. कोणी तर पूर्णपणे विसरून जातात की आम्ही बाबांकडून वारसा घेत आहोत. इथे बसल्यावर नशा चढतो. इथून बाहेर गेला आणि विसरला; पुन्हा सकाळी रिफ्रेश होतात आणि मग पूर्ण दिवस विसरून जातात. ४-५ वर्षे राहून चांगली सेवा करणारे सुद्धा बघा आज कुठेच दिसत नाहीत. काही अवज्ञा केली आहे त्यामुळे मायेने थप्पड मारली आणि निघून गेले. बाबा म्हणतात - ‘चढे तो चाखे प्रेमरस, गिरे तो चकनाचूर’. तुम्ही बघता कसे चकनाचूर होतात (दुर्दशा होते). वैकुंठामध्ये तर नक्की येतील, परंतु पद तर नंबरवार आहे ना. भले तिथे सर्वजण सुखी असतात, तरी देखील पदे तर आहेत ना. शाळेत पद मिळविण्यासाठीच तर पुरुषार्थ करतात. असे नाही प्रजा पद सुद्धा चालेल, जे नशिबात असेल ते चालेल. नाही, याला तमोप्रधान पुरुषार्थ म्हटला जातो. सतोप्रधान त्यांना म्हणणार जे बाबांकडून पूर्ण वारसा घेण्याची प्रतिज्ञा करतात. ही घोडदौड आहे. सगळेच काही नंबर वनमध्ये जाणार नाहीत. ही मनुष्यांची शर्यत आहे. तुमची इच्छा आहे की, आपण लवकरात-लवकर शिवबाबांच्या गळ्यात ओवले जावे; तर मग त्यांची आठवण करावी लागेल. सर्व काही आठवणीवर अवलंबून आहे. माया असे विघ्न आणते की एकदम शर्यतीमधून बाहेरच काढून टाकते. तुमची मनुष्यांची शर्यत आहे. आत्मा म्हणते - ‘मी खूप दुःखी झाले आहे. वारंवार शरीर धारण करून थकले आहे’. म्हणतात - आता आपण बाबांकडे जावे. बाबांनी युक्ती तर सांगितली आहे. म्हणतात - ‘बाबा, आम्ही तुमच्या आठवणीतच राहू’. जितका वेळ काढू शकाल तितके चांगले आहे. सरकारी नोकरीमध्ये सुद्धा ८ तास देता, तसे आठवणीमध्ये देखील ८ तास तरी रहा. सृष्टीला स्वर्ग बनविणे ही किती श्रेष्ठ सेवा आहे! फक्त बाबांची आठवण करा आणि सुखधामची आठवण करा. बस्स, ही ८ तास सेवा कराल तर तुम्ही पूर्ण वारसा मिळवाल. अशा प्रकारे आठवण करता-करता तुमची विकर्मे विनाश होतील. ८ तास या सेवेमध्ये द्या, बाकी १६ तास तुम्ही मोकळे आहात. जितके शक्य होईल तुम्ही क्षणोक्षणी आठवण करा. आठवण तर कुठेही बसून करू शकता. सर्वात चांगला वेळ तुम्हाला पहाटे मिळेल. सिंधीमध्ये एक म्हण आहे - ‘सवेरे सोना, सवेरे उठना… तोच माणूस खूप गुणवान आहे’. हे गायन देखील आत्ताचे आहे. बाबा म्हणतात रात्री लवकर झोपा आणि मग पहाटे लवकर उठा. अज्ञानी लोक ८ तास झोपतात, तुमची झोप अर्धी असली पाहिजे. ४-५ तासांची झोप पुरेशी आहे. तुम्ही कर्मयोगी आहात ना. रात्री १० वाजता झोपा २ वाजता उठा. शिवबाबांची आठवण केल्यामुळे तुमची खूप कमाई होते. तुम्हाला हेल्थ-वेल्थ दोन्ही मिळतील. अच्छा, २ वाजता, नाहीतर ३ वाजता उठा, ४ वाजता उठा. ती उत्तम वेळ आहे. शांती असते, सर्व अशरीरी बनतात. त्यावेळी नीरव शांतता असते. अमृतवेलेला केलेली आठवण चांगला परिणाम करते. बाबा जास्त करून रात्रीचे जागे राहतात. सूक्ष्म सेवेमध्ये थकवा येत नाही. कमाईमुळे तर आनंद होईल. तुम्ही मुले पहाटे उठून आपली अविनाशी कमाई करत रहा. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) २१ जन्म कायमचे सुखी बनण्यासाठी एका बाबांवर पूर्णपणे बलिहार जायचे आहे. श्रीमताद्वारे श्रेष्ठ बनायचे आहे. मनमत अथवा परमताचा त्याग करायचा आहे. कोणतीही अवज्ञा करायची नाही.

२) पहाटे लवकर उठून आठवणीमध्ये बसून कमाई करायची आहे. सृष्टीला स्वर्ग बनविण्याची सेवा कमीतकमी ८ तास जरूर करायची आहे.

वरदान:-
समय आणि संकल्पासहित आपल्या सर्व खजिन्यांना विल करणारे मोहजीत भव

जसे मुलांना सर्व काही विल केले जाते, तसे तुम्ही लोक सुद्धा बाबांना आपला वारस बनवून सर्व काही विल करा तर विलपॉवर येईल. या विल पॉवरमुळे मोह आपोआप नष्ट होईल. जसे साकार बाबांनी स्वतःला पूर्णपणे विल केले तसे तुम्हा लोकांनी जी स्मृती आहे, वेळ आणि संकल्पांचा खजिना आहे तो विल करा अर्थात श्रीमतानुसार सेवेत लावा म्हणजे मग मोहजीत, बंधनमुक्त बनाल.

बोधवाक्य:-
एकमेकांचे स्नेही बनण्यासाठी साधेपणा आणि सहनशीलता हे गुण धारण करा.

हे अव्यक्त इशारे - सदैव हर्षित राहण्याकरिता आपल्या नेचरला (स्वभावाला) सरळ बनवा, सहनशील बना.

बापदादांचे वरदान आहे सदा खुश रहा, खुशीचा खजिना वाटा, खुशीची लाट सर्वांमध्ये पसरवा. तुमच्या चेहऱ्यावर सदैव आनंदाचे हास्य चमकत राहो. असे हर्षितमुख रहा. याच्यासाठी बोलण्यात मधुरता, संतुष्टता, साधेपणाची नवीनता जरूर असावी. ब्राह्मण आत्म्यांचे बोल साधारण बोल नसावेत. प्रत्येक कर्मामध्ये अशी नवीनता असावी की प्रत्येक जण त्यातून प्राप्तीचा अनुभव करेल.