30-08-26 अव्यक्त बापदादा
मराठी मुरली
13.04.2011 ओम
शान्ति
मधुबन
ज्वालामुखी अग्नी
स्वरूप योगाच्या शक्तीद्वारे संस्कारांचे संस्कार करा, आपल्या वर्तन, चेहरा, दृष्टी,
वृत्ती आणि संकल्पाद्वारे बाबांना प्रत्यक्ष करा
आज मुलांच्या प्रेमाने
प्रेमाच्या सागराला देखील आपल्या जवळ बोलावले आहे. बापदादांना आनंद आहे की मुलांचे
बाबांवर मनापासून प्रेम खूप आहे आणि नेहमीच या प्रेमाच्या आधारावर पित्या समान
बनणारच आहात. तसेही बापदादांनी प्रेमाच्या सब्जेक्ट मध्ये मुलांना पुढे ठेवले आहे.
तर आज मुलांनी आपल्या प्रेमाच्या तारेमध्ये बांधून प्रेमाच्या सागराला मधुबनमध्ये
विशेष बोलावले आहे. असे प्रेम सदैव इमर्ज राहावे. मुलांच्या हृदयातील प्रेम दिलाराम
बाबांपर्यंत देखील नेहमीच पोहोचत असते परंतु नंबरवार जरूर आहे. बाबांची हीच इच्छा
आहे की प्रेमाची निशाणी आहे की प्रत्येकाच्या हृदयामध्ये दिलाराम सदैव सोबत रहावे,
कोणताही बच्चा एकटा नसावा, कंबाइंड असावा. तर चेक करा सदैव कंबाइंड राहता की कधी-कधी
एकटे देखील बनता? एकटेपणात माया आपला चान्स घेते; म्हणून बापदादा नेहमी सांगत असतात
की, दिलारामला सदैव हृदयामध्ये बसवा. याला म्हटले जाते सच्चे आणि नित्यप्रेम. तर कधी
एकटे बनता की सदैव सोबत राहता? प्रत्येक मुलाचा वायदा काय आहे? विशेष मधुबन
निवासींना नशा आहे की सोबत आहोत, सोबत चालणार, सोबत राज्य करणार. त्याचप्रमाणे, जी
विशेष खूप-खूप गोड, निमित्त मुले बसली आहेत, जी सदैव कंबाइंड रूपामध्ये राहतात
त्यांचा तर बाबांसोबत मनापासून वायदा आहे आणि मेजॉरिटींचा प्रत्यक्षात आहे देखील
परंतु नंबरवार आहेत. बाबांची इच्छा आहे की, प्रत्येक बच्चा, महारथी निमित्त मुले तर
इतरांना देखील आपल्या चेहऱ्याद्वारे बाबांचा साक्षात्कार करविणारे आहेत. त्यांच्या
चेहऱ्यामधून आणि वर्तनामधून बाबांचा तेजोमय चेहरा आणि त्याच सोबत बाबांसारख्या
अनासक्त आणि प्रेमळ व्यक्तिमत्वाचा साक्षात्कार होत राहतो.
ब्रह्माबाबांना पाहिले,
ब्रह्माबाबांनी शेवटपर्यंत बाबांच्या श्रीमतानुसार प्रत्येक मुरलीमध्ये किती वेळा
‘बाबा-बाबा’ म्हटले, जरा मोजून तर पहा, प्रत्येक मुरलीमध्ये ‘बाबा-बाबा’ किती वेळा
म्हटले आहे, आणि आपल्या चेहऱ्याद्वारे, प्रतिमेद्वारे, शब्दांद्वारे, विशेषत:
नयनांद्वारे आणि मस्तकाद्वारे बाबांना प्रत्यक्ष केले, तुम्ही मुले तर अनुभवी आहात
की ब्रह्माबाबांना पाहिल्यावर काय अनुभव होतो? बापदादा. कोणीही फक्त ‘बाबा’ शब्द
म्हणत नाही, सदैव प्रत्येकाच्या मुखातून ‘बापदादा’, ‘बाप-दादा’ एकत्र निघते आणि
अनुभव होतो. असे फॉलो फादर. पाहणाऱ्याला तुमच्या चेहऱ्यामधून, बोलण्यामधून,
वर्तनामधून, दृष्टीमधून बाबांची आठवण आपोआप यावी. आता बाबांनी पाहिले की मेजॉरिटी
तुम्हा सर्वांचा हाच संकल्प आहे की, आम्ही आमच्या चेहऱ्याद्वारे अथवा शब्दांद्वारे,
अथवा कर्माद्वारे बाबांना प्रत्यक्ष करणार. तर फॉलो फादर. जसे ब्रह्माबाबांनी आपल्या
वर्तनामधून, चेहऱ्यामधून, दृष्टीद्वारे, वृत्तीद्वारे आणि संकल्पाद्वारे सदैव
बाबांना प्रत्यक्ष केले, तुम्हा सर्वांना अनुभव तर आहे ना! एकट्या ब्रह्माबाबांना
बघत नव्हते, बापदादांनाच बघत होते. कारण? ब्रह्मा बाबांनी सदैव आपल्या नयनांमध्ये,
मस्तकामध्ये बाबांना एकरूप केले. तर तुमचे विशेषत: नयन, मुख, वर्तन बापदादांशी
एकरूप झाल्याचे प्रत्यक्ष करावे. प्रत्येक शब्दामध्ये शिकवण देणारा अनुभव व्हावा,
हे जे काही बोलत आहेत यांना शिकविणारे, यांच्यामध्ये शक्ती भरणारे सर्वशक्तिमान बाबा
आहेत, भगवान आहेत. ही भगवंताची मुले आहेत, भगवंताचे स्टुडंट आहेत, भगवंताला फॉलो
करणारे फॉलोअर्स नाहीत, परंतु एका पावलामध्ये पद्म कमविणारे आहेत. आता काळ देखील
तुमचा सहयोगी बनण्यासाठी तयार आहे. परिस्थिती बदलत आहे, जी परिस्थिती इच्छा नसताना
देखील भगवंताची आठवण करून देते. तर एक आहे - समय आणि दुसरे तुम्ही निमित्त बनलेले
दोन्ही ग्रुपची विशेषता आहे; एक विशेष निमित्त बनलेले मधुबन निवासी आहेत, दुसरा
अगोदरच तयार असलेला निमित्त ग्रुप मीटिंगमध्ये आला आहात.
बापदादांनी पाहिले
येणाऱ्या मेजॉरिटी मुलांच्या मनामध्ये उमंग-उत्साह आहे की आम्हाला, बाबांना
प्रत्यक्ष करायचेच आहे. भले मग आपल्या चेहऱ्यावरील हाव-भावावरून असो, वाणीद्वारे असो,
अथवा कोणत्याही आत्म्याशी असलेल्या नात्याद्वारे, संपर्काद्वारे असो, आजकाल तुमची
मनसा आत्म्यांविषयीच्या कल्याणाच्या भावनेमुळे आत्मे तुमच्या कनेक्शनमध्ये येत आहेत
आणि येऊ देखील इच्छित आहेत. आणि बापदादांनी जे मनसा सेवेचे काम दिले आहे, त्यामध्ये
देखील पाहिले की, जे योगयुक्त होऊन मनसा सेवेचा अभ्यास करत आहेत; तर आता हे
व्हायब्रेशन चोहो बाजूंना कोणा ना कोणापर्यंत पोहोचत आहे की, ‘आम्हाला कुठून तरी
लाईटची किरणे, सुख-शांतीचे तरंग येत आहेत’, परंतु कुठून येत आहेत, ते अजून स्पष्ट
झालेले नाहीये. येत आहेत परंतु भारतातील बापदादांच्या मुलांकडून येत आहेत, हे
स्पष्ट झालेले नाहीये. नाहीतर धावतील. आता आणखी शक्तिशाली किरणे अशा आत्म्यांवर टाका
ज्यामुळे त्यांना स्पष्ट होईल, पोहोचत आहेत, आता सुरुवात झाली आहे, परंतु
कोणा-कोणाची थोडी-थोडी किरणे पोहोचू लागली आहेत, आता याला अजून शक्तिशाली बनवा.
यासाठी जे विघ्न पडते, ही पोहोचणारी किरणे स्पष्ट होण्यामध्ये कारण बनते; योग लावता,
अमृतवेलेला बसता, परंतु ज्वालामुखी योग, त्याची कमतरता आहे. या कारणाने एकतर ज्या
भक्तांना अथवा आत्म्यांना तुम्ही किरणे पाठवता ती इतकी स्पष्ट नसतात आणि दुसरे
ज्वालामुखी अग्नी स्वरूप योगाची शक्ती नसल्यामुळे किंवा कमी असल्यामुळे संस्कार जे
मध्येच विघ्न आणतात, ते संस्कार देखील नष्ट होत नाहीत. पुरुषार्थ करता - संस्कार
परिवर्तन व्हावे, परंतु संस्कार मरतात, जळत नाहीत. जसे रावणाला फक्त मारत नाहीत,
मारल्यानंतर जाळतात; कारण मारल्यानंतर शरीर तर राहते ना! तर तसेच तुम्ही अमृतवेलेला
आठवणीमध्ये बसता, परंतु योग-अग्नीच्या रूपामध्ये, ज्वाला रूपात कमी आहे. मिलन साजरे
करता, रुहरिहान करता, आपल्या जीवनाच्या गोष्टी देखील करता. सतत योग-अग्नी रूप असावा,
संस्काराला मारता जरूर, आणि तो मरतो देखील परंतु मधून-मधून पुन्हा जागा होतो. जळून
जाईल तर नाव-रूप नष्ट होईल. आता सर्व मुले रुहरिहानमध्ये देखील म्हणतात की जितके हवे
आहे तितके नाहीये.
तर बापदादा आज हा
इशारा देत आहेत कारण स्पेशल महावीर मुले मीटिंगमध्ये आली आहेत आणि मधुबन निवासी
अर्थात मधुबनमध्ये काय आहे, मधुबन अर्थात बाबा. मधुबन म्हटल्यावर सर्वांना काय आठवते?
मधुबनचे बाबा. तर मधुबनवाल्यांनी विशेष हे अटेन्शन ठेवले पाहिजे की, मधुबन म्हटले
की मधुबनचे बाबा आठवतात का! मधुबनमध्ये राहणाऱ्यांना कोणत्या दृष्टीने पाहतात?
मधुबनवाले हात वर करा. भरपूर आहेत. भले मग खाली असोत अथवा वर, परंतु आजच्या सभेमध्ये
सर्वात जास्त मधुबन निवासी आहेत. बापदादा खुश आहेत की मधुबन निवासी हा चमत्कार
अवश्य दाखवतील की प्रत्येक मधुबन निवासीच्या चेहऱ्यावरून आणि आचरणातून बाबा आणि
बाबाच दिसून यावेत. बोलण्यामधून बाबा दिसून यावेत कारण मधुबनमध्ये यज्ञ सेवेचे बळ
आणि फळ खूप मिळते. घेणाऱ्याने घ्यावे, परंतु मिळते. संस्कारांकडे पाहण्याच्या
बाबतीत अथवा संस्कार जुळवून घेण्याकडे अजून सतत अटेंशन देण्याची आवश्यकता आहे.
बापदादांना प्रत्येक मधुबनच्या मुलावर विशेष प्रेम आहे; का? बाबांनी स्थापन केलेल्या
यज्ञाच्या सेवेमध्ये स्वतःला समर्पित केले आहे. मधुबन निवासींना एक तर आपल्या
पुरुषार्थाचे फळ मिळत आहे आणि दुसरे जे मधुबनमध्ये येणारे, भले मग ब्राह्मण अथवा
नवीन आत्मे जे येतात त्यांच्या सेवेचे, यज्ञसेवा आहे, साधारण सेवा नाहीये, यज्ञ
सेवेचे अधिकचे पुण्य देखील मिळते. जर कोणताही मधुबन निवासी आपल्या बापदादांच्या
श्रीमतावर अमृतवेले पासून रात्री पर्यंत श्रीमताप्रमाणे चालत असेल तर त्यांना
एक्स्ट्रा, मधुबनवाले स्वतः जाणत असो वा नसो, अलबेले राहिले तरी देखील मधुबनच्या
सेवेचे पुण्य मिळते जरूर. मधुबन निवासी बनणे काही साधी गोष्ट नाहीये. भले मग कोणी
कोणतेही काम करत असेल, समजा सफाईचे काम करत असेल. परंतु अशा साधारण कामाचे देखील
पुण्य खूप आहे कारण बाबांनी रचलेला यज्ञ आहे. या यज्ञाद्वारेच मधुबनमध्येच सर्वांना
परमात्म प्रेम प्राप्त होते म्हणून मधुबनशिवाय बाबा इतर कुठेही येत नाहीत. हा
मधुबनला बाबांच्या येण्याचा, भेटण्याचा आणि भेटविण्याचा पार्ट नोंदलेला आहे. तर
प्रत्येक मधुबनवाले आपल्या पुण्याच्या खात्याला जाणा, ओळखा आणि त्या महान प्राप्तीचे
स्वरूप बना. काहीही असो, तुमचे काम आहे मोठ्यांपर्यंत पोहोचवणे, पोहोचवले अर्थात
मनातून काढून टाकले, तुमची जबाबदारी संपली. जर तुम्हाला असे वाटत असेल की काहीच
हालचाल होत नाहीये, तरीही तुमचे यामध्ये पाप बनणार नाही. जे जबाबदार आहेत त्यांचे
बनेल. तुम्ही निश्चिंत राहा. माहिती देणे तुमचे काम आहे, परंतु विचार करणे - काय
झाले, काय नाही झाले, हे का झाले नाही, ते का झाले नाही, हे बघण्याची तुम्हाला गरज
नाही उलट अजूनच व्यर्थ संकल्प चालतील. तुमची जी जबाबदारी आहे ती तुम्ही करा, पोहोचवा.
परंतु माहिती पोहोचवल्यानंतर, पोहोचवायची देखील रीतीप्रमाणे, मधुबन निवासी ब्राह्मण
आहात, उच्च आहात, आपले पद लक्षात घेऊन असे कर्तव्य करा जेणेकरून तुमच्या कामाविषयी
ऐकून बाकीचे देखील शिकतील. मधुबन निवासींवर सर्वांच्या भावना आहेत, तर अशा भावना
असणाऱ्यांना भावनेचे फळ दाखवा. मधुबनवाल्यांमध्ये बापदादा जाणतात की, काही-काही मुले
अतिशय मर्यादापूर्वक, स्व-पुरुषार्थी, बाबांचे स्नेही बनून सहयोग देणारी देखील आहेत.
परंतु बापदादा हेच इच्छितात, बापदादांची मधुबन निवासींप्रति काय इच्छा आहे? मधुबन
निवासी, बाबांचा प्रत्येक बच्चा यज्ञ-स्नेही, सहयोगी बनून आपल्या चलनद्वारे सर्वांना
बाबांचा परिचय देईल की आम्हा मधुबन निवासींचे किती मोठे भाग्य आहे, भाग्याला
प्रसिद्ध करा कारण यज्ञ-निवासी आहात, परमात्म्याने आधी काय रचले? यज्ञ रचला. आणि
यज्ञाची धरणी निमित्त मधुबन आहे. जाणता ना मधुबनची महिमा, जे जाणतात मधुबनची महिमा,
त्यांनी हात वर करा. बापदादा इथे (समोर टी.व्ही.वर) पाहत आहेत. छान, खूप छान.
जी निमित्त बनलेली
मुले आहेत, बापदादा त्यांना पाहून खूश होत आहेत. सर्वजण अटेंशन देतात परंतु अजून
अटेंशन देऊन सर्वांना संतुष्ट करा म्हणजे मग विश्वाला संतुष्टतेची किरणे पोहचतील,
हे कार्य देखील निमित्त असणाऱ्यांना करायचे आहे. जे निमित्त आहेत त्यांना आपापल्या
हॅन्ड्सचे, संस्कार परिवर्तन करवून घेण्यासाठी थोडी मेहनत करावी लागेल. सेवा करवून
घेता, राहण्या-खाण्याची व्यवस्था मेजॉरिटी सेंटर्स देतातच, परंतु त्यांच्यामध्ये अशी
शक्ती भरा जे बाबांकडून शक्ती घेऊन तुमच्या सेवास्थानाचे वायूमंडळ असे बनवतील की जो
कोणी येईल तो आधी तर वायुमंडळाच्या आकर्षणामध्ये येईल कारण आजकाल सर्वांना हेच हवे
आहे की, असे काहीतरी कार्य व्हावे जे येताच काहीतरी अनुभव व्हावा, पाहताच काहीतरी
अनुभव व्हावा. ऐकण्याचा अनुभव होतो, ‘योग’चा अनुभव होतो परंतु वायुमंडळाचा देखील
अनुभव व्हावा, हे अटेंशन निमित्त बनलेल्या आत्म्यांनी ठेवणे, ही त्यांची विशेष सेवा
आहे. स्वतः जर योगयुक्त बनून वायुमंडळामध्ये उत्तम स्थितीमध्ये राहतील तर त्यांचा
प्रभाव सेवास्थानावर आपोआपच पडतो.
जसे बापदादांचे अथवा
मोठ्या निमित्त आत्म्यांचे वायुमंडळ, व्हायब्रेशन यांचा प्रभाव पडतो ना. बापदादांचे
वायुमंडळ बदलते ना. तर प्रत्येक मुलाने वायुमंडळ बनवायचे आहे, कारण आता आपल्या
सेंटरचे वायुमंडळ बदलाल तेव्हाच संसाराचे वायुमंडळ बदलेल, निमित्त तुमच्या
सेवास्थानाकडून व्हावे. पुरुषार्थ आहे, लक्ष्य आहे परंतु या लक्ष्याला आणखी पॉवरफुल
बनवा., आजकाल लोक, ज्याला पण पाहतील चेहऱ्यावरून, व्हायब्रेशनवरून ओळखतात, कारण
त्यांच्या बुद्धीमध्ये आसुरी शक्तीचा देखील प्रभाव आहे आणि नॉलेजचा देखील प्रभाव आहे;
त्यामुळे जेपण मीटिंगमध्ये आले आहेत, प्रत्येकजण जबाबदार आहात. नाहीतर मीटिंगमध्ये
नाव का घातले! हिंमत आहे ना, म्हणूनच तर तुमचे नाव झाले ना, त्यामुळे आपले कर्तव्य
प्रत्यक्ष करा. करण्याची इच्छा देखील आहे, बापदादा जाणतात करण्याचा प्रयत्न देखील
करत आहात परंतु अजून थोडे प्रयत्नाला वाढवा. समजले.
आता बापदादा सर्वांचा
रिझल्ट पाहू इच्छित आहेत. मधुबनवाले अथवा मीटिंगवाले, दोघांचाही रिझल्ट पाहू इच्छित
आहेत. जो जगत्-अंबाचा विशेष पुरुषार्थ होता - ‘बाबांचे सांगणे आणि जगत्-अंबेचे करणे’.
तुमच्या दीदीचे हेच शब्द होते - ‘अब घर चलना है, अब घर चलना है’. तुमच्या दादींचा
हाच संकल्प होता - ‘आता कर्मातीत व्हायचे आहे’; कर्मातीत होण्याचे क्लास घेणे,
कर्मातीत होण्यासाठी प्रोत्साहन देणे. तुमचे पांडव जे गेले, त्यांचा देखील हाच
मनामध्ये संकल्प होता की, आम्हाला जे पांडव, पांडवांना विजयी म्हटले जाते, तर
पांडवांचे जे लक्ष्य होते आणि आहे देखील की, जे गायन आहे - ‘विजयी पांडव’. ‘पांडव’
म्हटले की काय आठवते? विजय! जरी अक्षौहिणी सेना होती तरी देखील ‘पांडव’ शब्द
उच्चारताच विजयाची आठवण येते. ५ पांडव, परंतु विजयी! कसेही वायुमंडळ असो, अक्षौहिणी
सेनेचे वायुमंडळ होते परंतु पांडव, पांडवपतीच्या श्रीमताद्वारे विजयी बनले आणि
विजयाचे नाव प्रसिद्ध केले. आता तेच पांडव, विजयी बनून इतरांना देखील विजय मिळवून
देणारे. तर पांडवांना पाहून बापदादा आनंदी होतात, कोणत्या बाबतीत आनंदी होतात? की
शक्तींचे साथीदार आहेत. शक्तींना सहयोग देऊन पुढे जाण्यासाठी सहकार्य करणारे
साथीदार आहेत. जसे बाबांनी शक्तींना, ‘शिवशक्ती’चा मंत्र देऊन कंबाइंड बनवले, तसेच
पांडव देखील, पांडवांमध्ये ज्या विशेषता आहेत, त्या विशेषतांमध्ये शक्तींना सहयोग
देऊन पुढे ठेवणारे चांगले आहेत, आणि सदैव चांगल्यात चांगले बनून पुढे जाणारे आहेत.
बापदादा आज तुमच्या
स्नेहाला पाहून तुम्हा सर्वांना स्नेहाचा हार घालत आहेत. बस्स, तुम्ही देखील
प्रत्येकाला स्नेह आणि सहयोगाचा हार घाला. बाहूंचा हार नाही, मनातून सहयोगाचा हार
घाला. बापदादांनी यापूर्वी देखील सांगितले आहे - प्रत्येक मुलांच्या खिशामध्ये
सहयोगाची नोट असली पाहिजे. तर चुका नोट करू नका, परंतु सहयोगाच्या नोटांनी खिसा
भरलेला असला पाहिजे. कुठेही पाहा, सहयोग हवा आहे, तर सहयोगाची नोट देऊन टाका. आहे
का खिशात? सहयोगाच्या नोटा आहेत? भरलेला आहे का, खिसा भरलेला आहे? रिकामा तर नाहीये?
तुम्ही सहयोगाची नोट द्या आणि ते तुम्हाला आशिर्वादांचा हार घालतील.
तुमच्या ॲडव्हान्स
पार्टीचे विशेष आत्मे आणि सूक्ष्मवतन निवासी बाबा, तुमची प्रतीक्षा करत आहेत.
तुम्हाला त्यांचा संकल्प पोहोचतो का? ते तारीख मागत आहेत. तुमच्या मोठ-मोठ्या दादी
आणि दादा दोघेही तारखेची वाट बघत आहेत. तर त्यांना तुम्ही तारीख देणार? देणार का?
पहिली लाइन सांगा, डेट द्याल? की म्हणाल ‘वेट अँड सी’ (थांबा आणि पाहा). सर्वांनाच
यामध्ये काय करायचे आहे? प्रत्येकाने आपल्या राहिलेल्या संस्कारांचे संस्कार करा,
वेळ जवळ येईल. वेळेला जवळ आणण्याची हीच पद्धत आहे. राहिलेले संस्कार, जे विघ्न घालत
आहेत. तर आता जेव्हा दुसऱ्या वेळी सीझन सुरू होईल त्याला अजून बरेच दिवस आहेत, खूप
दिवस आहेत. दररोज कोणत्या ना कोणत्या संस्काराचा संस्कार करून टाका. एका-एका
संस्काराचा संस्कार करत जा, इतके दिवस आहेत. तर पुढच्या वेळी जेव्हा बापदादा येतील
तेव्हा, ‘आमच्या संस्कारांचा संस्कार झाला आहे, यासाठी आम्ही हात वर करू’, असे
कोणाला वाटते त्यांनी हात वर करा. झाला? हात तर वर करत आहेत. बापदादा ॲडव्हान्समध्ये
खूप-खूप-खूप मुबारक देत आहेत. अच्छा.
वरदान:-
आळसाच्या
विविध रूपांना नष्ट करून सदैव उत्साहामध्ये राहणारे तीव्र पुरुषार्थी भव
वर्तमान समयी मायेचा
वार आळसाच्या रूपामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने होतो. हा आळस देखील एक विशेष विकार आहे,
तो नष्ट करण्यासाठी सदैव उत्साहामध्ये राहा. जेव्हा कमाई करण्याचा उत्साह असतो
तेव्हा आळस संपून जातो, त्यामुळे उत्साह कधीही कमी होऊ देऊ नका. विचार करू, करू,
करूनच घेऊ, होऊन जाईल... ही सर्व आळसाची लक्षणे आहेत. अशा आळसयुक्त दुर्बल
संकल्पांना नष्ट करून, हाच विचार करा की, ‘जे करायचे आहे, जितके करायचे आहे ते
आत्ताच करायचे आहे’, तेव्हाच म्हटले जाईल तीव्र पुरुषार्थी.
सुविचार:-
खरे सेवाधारी ते आहेत
ज्यांचे विचार करणे आणि बोलणे एक समान असते.
हे अव्यक्त इशारे -
अपवित्रतेच्या बीजाला देखील नष्ट करून संपूर्ण स्वच्छ (पवित्र) बना.
पवित्रतेची श्रेष्ठ
ते श्रेष्ठ ज्योत सदैव तेवत रहावी, ती जरासुद्धा हलचलमध्ये येऊ नये, अचल. पवित्रतेची
ज्योत जितकी अचल असेल तितके सर्वजण सहजच बाबांना ओळखू शकतील आणि पवित्रतेचा जयजयकार
होईल. पवित्रतेच्या पर्सनॅलिटीला सदैव इमर्ज रूपामध्ये स्मृतीमध्ये ठेवा. स्मृतीच
समर्थीचा आधार आहे आणि जिथे समर्थी आहे तिथे माया येऊ शकत नाही. समर्थ आत्म्याजवळ
मायेचे येणे असंभव आहे.