30-10-2026
प्रभात: मराठी मुरली
ओम
शान्ति
बापदादा
मधुबन
गोड मुलांनो, तुम्हाला
योग बलाद्वारे रावण शत्रूवर विजय प्राप्त करायचा आहे, मनुष्यापासून देवता
बनण्याकरिता दैवी गुण धारण करायचे आहेत”
प्रश्न:-
सर्व मुले
बाबांच्या श्रीमतावर एकसारखे चालत नाहीत - असे का?
उत्तर:-
कारण १) बाबा
जे आहेत, तसे त्यांना सर्वांनीच अजून एकसारखे ओळखलेले नाहीये. जेव्हा पूर्णपणे
ओळखतील तेव्हा श्रीमतावर चालतील. २) माया शत्रू श्रीमतावर चालण्यापासून अडवते
त्यामुळे मुले मधून-मधून आपले मत चालवतात. आणि मग म्हणतात - ‘बाबा, मायेची वादळे
येतात, तुमची आठवण विसरायला होते’. बाबा म्हणतात - मुलांनो, रावण मायेला घाबरू नका.
जोराने पुरुषार्थ करा म्हणजे मग मायाच थकून जाईल.
गीत:-
न वह हमसे जुदा
होंगे…
ओम शांती।
तुम्ही सिंगल
आत्मा आहात. प्रत्येक जण म्हणेल ओम् शांती. हे डबल आहेत (शिवबाबा आणि ब्रह्मा बाबा)
यांना दोनदा म्हणावे लागेल - ओम् शांती, ओम् शांती. आता बाबा बसून मुलांना समजावून
सांगत आहेत की, तुम्ही इथे युद्धाच्या मैदानावर बसले आहात. परंतु असे नाही की, ते
लोक जसे आपसामध्ये युद्ध करतात. तसे तर घराघरामध्ये भांडण-तंटे करत राहतात.
मेजॉरिटींची गोष्ट बोलली जाते. नंबरवन आहे - देह-अभिमान, दुसरा आहे - काम विकार. आता
तुम्ही आठवणीच्या बळाद्वारे ५ विकार रुपी रावणावर विजय प्राप्त करता. आठवणीचे बळ
असेल तर तुम्ही कोसळणार नाही. तुमचे एका रावणाशीच युद्ध आहे. तिथे (दुनियेतील
युद्धामध्ये) तर अनेक प्रकारच्या गोष्टी असतात. इथे एकच गोष्ट आहे. तुमचे युद्ध
आहेच मुळी रावणा सोबत. तुम्हाला शिकविणारे कोण आहेत? पतित-पावन भगवान. ते आहेतच
पतितापासून पावन बनविणारे. पावन अर्थात देवता, तुम्ही विश्वाचे मालक बनता. इथे,
मनुष्य हेच समजत नाहीत की रावणामुळे तुम्ही पतित बनला आहात. बाबांनी समजावून
सांगितले आहे की यावेळी साऱ्या दुनियेमध्ये रावणाचे राज्य आहे. तसे तर रामराज्य असते
सतयुग, त्रेतामध्ये. तरी देखील साऱ्या दुनियेमध्ये रामराज्य असते असे म्हणता येईल.
परंतु तिथे इतके काही मनुष्य नसतात. तुम्ही विश्वाचे राज्य योगबलाद्वारे घेत आहात.
असे देखील नाही की इथे बसलेले असतानाच बाबांची आठवण करायची आहे अथवा स्वदर्शनचक्र
फिरवायचे आहे, बस्स. हे तर निरंतर बुद्धीमध्ये राहिले पाहिजे. आपण स्वर्गामध्ये
अर्धे कल्प राज्य केले आणि मग रावणाचा शाप मिळाल्यावर उतरत जातो (पतन होत जाते).
उतरण्यासाठी वेळ तर लागतो. ८४ पायऱ्या उतराव्या लागतात. चढत्या कलेमध्ये पायऱ्या तर
नाही आहेत, जर पायऱ्या असतील तर मग सेकंदामध्ये जीवन-मुक्ती कशी काय म्हणू शकणार?
कुठे तुम्हाला २५०० वर्षे उतरण्यासाठी लागतात, आणि कुठे तुम्ही थोड्याच वर्षांमध्ये
चढत्या कलेमध्ये येता. तुमचे आहे - योगबल. त्यांचे आहे - बाहुबळ. द्वापरपासून उतरतच
येतात आणि मग बाहुबळ सुरू होते. सतयुगामध्ये मारण्याची अशी कोणती गोष्ट होऊ शकत नाही.
श्रीकृष्णासाठी जे दाखवले आहे की, उखळीला बांधून घातले. अशी कोणती गोष्ट होऊ शकत
नाही. तिथले मूल कधीही चंचल (खोडकर) नसते. ते तर सर्वगुण संपन्न, १६ कला संपूर्ण
असते. श्रीकृष्णाची किती आठवण करत आले आहेत. चांगल्या गोष्टीची आठवण येते ना. जसे
दुनियेमध्ये सात आश्चर्य आहेत तर लोकांना ते आठवतात ना, बघण्यासाठी जातात. आबूमध्ये
सर्वात चांगली कोणती गोष्ट आहे, की जी मनुष्य बघण्यासाठी येतात? धार्मिक प्रवृत्तीचे
लोक तर मंदिर बघण्यासाठीच येतात. भक्तिमार्गामध्ये तर मंदिरे पुष्कळ असतात. सतयुग,
त्रेता मध्ये कोणतेही मंदिर नसते. मंदिरे नंतर बनतात, यादगार म्हणून. सतयुगामध्ये
सण इत्यादी काही असत नाहीत. दिवाळी देखील अशी होत नाही. हां, सिंहासनावर बसतात
तेव्हा कोरोनेशन डे (राज्याभिषेक दिन) साजरा करतात. तिथे तर सर्वांची ज्योत जागृत
असते.
तुमच्याकडे एक गाणे
देखील आहे - ‘नवयुग आया…’ हे फक्त तुम्हालाच ठाऊक आहे की, आपण नवयुगासाठी अर्थात
सतयुगासाठी देवी-देवता बनण्यासाठी पुरुषार्थ करत आहोत. अभ्यास तर व्यवस्थित केला
पाहिजे ना. जिथे कुठे राहायचे आहे, तिथे ज्ञान अमृत प्यायचे आहे. हे नॉलेज म्हणजे
सृष्टीच्या आदि-मध्य-अंताला जाणून घेणे होय. यामध्ये कोणती भाषा इत्यादी शिकवली जात
नाही. फक्त बाबांची आठवण करायची आहे आणि स्वदर्शनचक्र फिरवायचे आहे, बस्स. इथे
तुम्ही बसला आहात, स्वदर्शन चक्रधारी आहात. बुद्धीमध्ये आहे - आमचे ८४ जन्मांचे
चक्र पूर्ण झाले. आता जुने शरीर, जुने नाते सोडून नवीन घ्यायचे आहे. दुनियेमध्ये
बाकीचे सर्व आहेत - आसुरी संप्रदाय. भगवानुवाच - ‘हे तेच गीतेचे युग चालू आहे’. हे
आहे कल्प-कल्पाचे संगमयुग. बाबा म्हणतात - ‘मी या कल्पाच्या संगमयुगावर येतो’. मी
तोच गीतेचा भगवान आहे. इथे नवीन दुनिया स्वर्ग रचण्याकरिता येतो, मी द्वापरमध्ये कसा
येईन. ही एक खूप मोठी चूक आहे. एखादी चूक छोटी असते, एखादी चूक मोठी असते. ही तर
मोठ्यात मोठी चूक आहे. शिवभगवान जे पुनर्जन्म रहित आहेत, त्यांच्या ऐवजी ८४ जन्म
घेणाऱ्याचे नाव लिहिले आहे. तुम्ही आता जाणता की श्रीकृष्ण तर असे म्हणू शकत नाही
की, ‘मामेकम् (मज एकाची) आठवण करा’. सर्व धर्माचे थोडेच श्रीकृष्णाला मानतील! ‘शिव’
तर निराकार आहेत. तुम्ही शिवशक्ती सेना आहात. शिवबाबांसोबत योग लावून शक्ती घेता.
यामध्ये मेल-फिमेलची गोष्ट नाहीये. तुम्ही सर्व आत्मे ब्रदर्स (भाऊ-भाऊ) आहात.
तुम्ही सगळे बाबांकडून शक्ती घेत आहात. वारसा बाबाच देतील ना. तेच बाबा
सर्वशक्तिमान आहेत. या लक्ष्मी-नारायणाला देखील म्हणणार - ‘सर्वशक्तिमान’; कारण
साऱ्या विश्वाचे मालक आहेत. त्यांनी हे राज्य कसे मिळवले? सध्या केवळ भारतातच नव्हे,
तर संपूर्ण दुनियेमध्ये रावणाचे राज्य आहे. जेव्हा आपण एखाद्या राजाला पाहतो तर
समजून येते, त्यांच्या पूर्वजांनी हे राज्य केले आहे, जे चालत आहे आले आहे. हे (लक्ष्मी-नारायण)
तर सतयुगाच्या सुरुवातीपासून चालत आले आहेत, तर जरूर मागच्या जन्मामध्ये असा
पुरुषार्थ केला असेल. पतित राजाई मिळते दान-पुण्य केल्याने. इथे या संगमावर तुम्ही
ज्ञान आणि योगबलाद्वारे २१ जन्मांसाठी राज्य मिळवता.
तुम्ही जाणता ही सारी
जुनी दुनिया नष्ट होणार आहे. हा देह सुद्धा राहणार नाही, त्यामुळे स्वतःला आत्मा
समजून बाबांची आठवण करायची आहे. ‘बाबा-बाबा’ असे म्हणायला शिका. जसे लौकिक मुलांना
शिकवले जाते, तर तो देखील त्याच पित्याची आठवण करतो. आता रुहानी बाबा तुम्हा मुलांना
म्हणतात - ‘माझ्या मुलांनो, ही नवीन गोष्ट आहे’. बाबा म्हणतात - आता मज रुहानी
पित्याची आठवण करा कारण आता परत घरी जायचे आहे. आत्मा तर अविनाशी आहे, शरीर विनाशी
आहे तर शक्तिशाली कोण झाले? शरीर आत्म्याच्या आधारे चालते. आत्मा जेव्हा निघून जाते
तेव्हा देहाला अग्नीमध्ये जाळून टाकावे लागते. आत्मा तर आहेच मुळी अविनाशी; ती तर
बिंदू ती बिंदूच आहे. त्या आत्म्याला कोणीही जाणत नाही. फार-फार तर एखाद्याला
साक्षात्कार झाला तरी देखील पुढे काय! त्यांना तर हे देखील ठाऊक नाही आहे की, आत्मा
जी बिंदू आहे तिच्यामध्ये ८४ जन्मांचा अविनाशी पार्ट भरलेला आहे. या गोष्टी
तुमच्याच बुद्धीमध्ये आहेत. राजयोग शिकवणारे आहेतच ते एक बाबा. बाकी बॅरिस्टर, वकील,
इंजिनीयर इत्यादी तर होतच आले आहेत. इथे मात्र मनुष्यापासून देवता बनायचे आहे. आहेत
ते देखील मनुष्य, परंतु त्यांना देवता म्हटले जाते. देवता अर्थात दैवी गुण धारण
करणारे. तुम्हाला पुरुषार्थ करून असे दैवी गुणवाले बनायचे आहे. हे आहे एम ऑब्जेक्ट.
तुम्ही जाणता या देवतांमध्ये कोणते गुण आहेत! असे आपल्याला बनायचे आहे. प्रजा देखील
असेल ना. प्रजा प्रचंड प्रमाणात बनते. बाकी राजा-राणी बनण्यामध्ये मेहनत लागते. जे
खूप मेहनत करतील ते राजा-राणी बनतील. जे अनेकांना नॉलेज देतील, ते प्रत्येक जण
आपल्या मनाला ओळखू शकतात. आत्मा म्हणतो - मी बेहद बाबांचा बनूनच राहणार.
त्यांच्यावर वारी जाणार, कुर्बान होणार. माझ्याकडे जे काही आहे त्याच्या सहित वारी
जाईन (समर्पित होईन). ईश्वराला तर देतात ना. तुम्ही याल तेव्हा आम्ही कुर्बान होणार.
त्याच्याबदल्यात तुमच्याकडून आम्ही नवीन तन-मन-धन घेणार. नवीन मन कसे घ्याल?
आत्म्याला नवीन (पवित्र) बनवणार. मग शरीर देखील नवीन घेणार. राजधानी देखील घेणार.
आता तुम्ही घेत आहात ना. आत्मा म्हणते - ‘ओ बाबा, या शरीरासहित मी तुमची आहे. बाबा,
मी तुम्हाला शरण येत आहे’. सर्व रावण राज्यामध्ये खूप दुःखी झाले आहेत त्यामुळे आता
बाबा यातून लिबरेट करून आपल्या राजधानीमध्ये घेऊन चला. शिवबाबा तर भेटले, तर बाकी
काय राहिले! तुम्ही जाणता की शिवबाबांच्या श्रीमताद्वारे स्वर्ग बनतो. आसुरी
रावणाच्या मताने नरक बनतो. आता पुन्हा श्रीमताद्वारे स्वर्ग बनणार आहे. जरूर जे
कल्पापूर्वी आले असतील तेच येतील. श्रीमताद्वारेच श्रेष्ठ बनाल. रावणाच्या मतावर
चालल्यानेच कोसळाल. तुमची आता चढती कला आहे, बाकी सर्वांची उतरती कला आहे. किती
अनेक धर्म आहेत. सतयुगामध्ये एक देवी-देवता धर्मच होता. आता तो प्रायः लोप झाला आहे.
वडाच्या झाडाचे उदाहरण आहे ना.
तुम्ही जाणता
देवी-देवता धर्माच्या खाणा-खुणा तर आहेत ना. खरोखर, देवी-देवतांचे राज्य होते. ५
हजार वर्षांची गोष्ट आहे. तुम्ही सिद्ध करून सांगू शकता हे ५ हजार वर्षांचे चक्र आहे.
यामध्ये ४ युगे आहेत. प्रत्येक युगाचे आयुष्य १२५० वर्षे आहे. त्यांनी तर लाखो वर्षे
सांगितली आहेत. खूपच तफावत असल्यामुळे कोणाच्याही बुद्धीमध्ये येत नाही. समजतात की,
जशा इतर बाकीच्या संस्था आहेत, तशी ही देखील बी.कें.ची संस्था आहे. हे गीता
शास्त्राला प्राधान्य देतात. आता गीता तर भगवान श्रीकृष्णाने गायली, आणि हा दादा तर
हिऱ्यांचा व्यापारी बसलेला आहे; मग मनुष्य गोंधळून तर जातीलच ना. बाबा म्हणतात - मी
जो आहे, जसा आहे, अजून पर्यंत कोणीही मला ओळखलेले नाहीये. अखेरीला तुम्ही मला
पूर्णतः जाणाल. आतापर्यंत नंबरवार जाणले आहे, म्हणूनच तर श्रीमतावर चालणे खूप अवघड
आहे असे समजतात. चांगली-चांगली मुले देखील श्रीमतावर चालत नाहीत. रावण चालू देत नाही.
आपलेच मत चालवतात. असे फार थोडे आहेत जे पूर्णपणे श्रीमतावर चालणारे आहेत. पुढे
जाऊन पूर्णतः ओळखतील तेव्हा मग श्रीमतावर चालतील. मी जो आहे, जसा आहे, ते पुढे पुढे
जाऊन समजतील. आता समजून घेत चालले आहेत. पूर्णपणे समजतील तर मग अजून बाकी काय पाहिजे!
राहायचे देखील आपल्या गृहस्थीमध्येच आहे, परंतु माया शत्रू अशी आहे जी श्रीमतावर
चालण्यापासून अडवते. म्हणतात - बाबा, मायेची वादळे खूप येतात. माया तुमची आठवण
विसरायला लावते. हां जोराने पुरुषार्थ करता-करता मग सरते शेवटी माया देखील थकून
जाईल. माळा देखील आठची आहे. मुख्य आठ रत्न आहेत. आठ तर जोड्या आहेत. मध्यभागी नववे
रत्न शिवबाबांना ठेवतात. कोणी मधले नववे रत्न लाल रंगाचे बनवतात कोणी सफेद रंगाचे.
आता शिवबाबा तर आहेत बिंदू. बिंदू लाल रंगाचा तर नसतो. बिंदू तर सफेद रंगाचाच असतो.
तो अतिशय सूक्ष्म आहे. दिव्य दृष्टी शिवाय कोणीही पाहू शकत नाही. डॉक्टर इत्यादी
पाहण्यासाठी किती प्रयत्न करतात, परंतु पाहू शकत नाही; कारण अव्यक्त चीज आहे ना.
म्हणून मग विचारले जाते - तुम्ही म्हणता आम्ही आत्मा आहोत, अच्छा मग आत्म्याला कधी
पाहिले आहे का? स्वतःलाच पाहू शकत नाहीत तर बाबांना कसे पाहू शकाल. आत्म्याला जाणून
घ्यायचे आहे की त्याच्यामध्ये कसा पार्ट भरलेला आहे. हे कोणीही अजिबात जाणत नाही.
८४ च्या ऐवजी ८४ लाख म्हणतात. बाबा येऊन मुलांना देखील सर्व गोष्टी समजावून सांगतात.
आजचा भारत काय आहे, उद्याचा भारत काय असेल! महाभारत लढाई देखील आहे. गीतेचे ज्ञान
देखील दिले आहे, हा रुद्र यज्ञ देखील आहे. सर्व धर्मांचा विनाश आणि एका धर्माची
स्थापना होत आहे.
हा शिवबाबांचा भंडारा
आहे, यातून तुम्हाला पवित्र भोजन मिळते. ब्राह्मण-ब्राह्मणीच भोजन बनवतात, म्हणून
याची महिमा अपरंपार आहे. याच्यामुळे तुम्ही पवित्र बनून पवित्र दुनियेचे मालक बनता,
आणि म्हणून पवित्र भोजन चांगले आहे. जितकी तुमची उच्च स्थिती होत जाईल तितके
तुम्हाला भोजन देखील शुद्ध मिळेल. योगयुक्त होऊन जर कोणी भोजन बनवेल तर खूप बळ
मिळेल, ते देखील पुढे चालून मिळेल. सेवाभावी मुले जी सेंटरवर राहतात, ती आपल्या
हाताने भोजन बनवून खातील तरी देखील त्यातून खूप बळ मिळू शकते. जशी पतिव्रता स्त्री,
पती शिवाय इतर कोणाचीही आठवण करत नाही. तशी तुम्ही मुले देखील आठवणीमध्ये राहून
भोजन बनवा आणि खा, तर मग खूप बळ मिळेल. बाबांच्या आठवणी मध्ये राहिल्याने तुम्ही
विश्वाची बादशाही घेता. बाबा सल्ला तर देतात, परंतु अजून कोणाच्याही लक्षात येत
नाहीये. ते जाऊन होऊ शकते की, म्हणतील आम्ही आमच्या हाताने योगयुक्त होऊन भोजन बनवतो,
तर सर्वांचे कल्याण होईल.
बाबा, मुलांना सर्व
प्रकारचा सल्ला देतात ना. त्रिमूर्तीचे चित्र समोर ठेवलेले असावे. वारसा
शिवबाबांकडून घ्यायचा आहे. काही ना काही युक्ती करत राहा. बाबा (ब्रह्मा बाबा) आपले
उदाहरण देतात - ‘भक्तिमार्गामध्ये मी नारायणाच्या चित्रावर खूप प्रेम करत असे. बस्स,
त्यांची आठवण करताच अश्रू येत असत, कारण त्यावेळी वैराग्य आले होते’. बालपणी त्यांची
वृत्ती वैराग्याची होती. या आहेत मग बेहदच्या गोष्टी. तरी देखील म्हणतात - मनमनाभव.
योगमध्ये राहिल्यानेच तुम्ही तमोप्रधानापासून सतोप्रधान बनाल. आठवणीमध्ये राहण्याचा
फुरना (ध्यास) ठेवायचा आहे. श्रीमत मिळते - बाबा म्हणतात आठवण करा. मी सृष्टीचा
रचयिता आहे तर तुम्ही देखील नवीन दुनियेचे मालक बनाल ना. नाहीतर सजा देखील खाल आणि
पद सुद्धा भ्रष्ट होईल. मृत्यूपूर्वी मुलांना हा ध्यास असला पाहिजे की, आपण
सतोप्रधान कसे बनावे. बाबांची आठवण तर जरूर करायची आहे. हा आहे मोठ्यात मोठा ध्यास.
अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) योगयुक्त
होऊन आपल्या हाताने भोजन बनवायचे आहे आणि खायचे आहे. पवित्र दुनियेमध्ये जाण्यासाठी
पवित्र भोजन खायचे आहे. यामध्येच बळ आहे.
२) नवीन तन-मन-धन
प्राप्त करण्यासाठी जुने सर्व काही बाबांवर ओवाळून टाका. या शरीरासहित बाबांवर
पूर्णपणे कुर्बान जायचे आहे.
वरदान:-
एकांत आणि
अंतर्मुखता यांच्या अभ्यासाद्वारे स्वतःला अनुभवांनी संपन्न बनविणारे मायाजीत भव
नॉलेजफुल असण्यासोबतच
पॉवरफुल अर्थात अनुभवीमूर्त बनण्याकरिता एकांतवासी आणि अंतर्मुखी बना. डळमळीत
होण्याचे कारण आहे - अनुभवाची कमतरता. त्यामुळे फक्त समजून घेणारे, समजावून सांगणारे
अथवा मननमूर्त बनू नका तर एकांतवासी बनून प्रत्येक पॉईंटचे अनुभवी बना; म्हणजे मग
कोणत्याही प्रकारच्या धोक्यापासून, दुःख अथवा दुविधेपासून वाचाल. ‘मी कोणाचा बच्चा
आहे, प्राप्ती काय आहे’ या पहिल्या पाठाचा अनुभव कराल तरी देखील सहजच मायाजीत बनाल.
बोधवाक्य:-
जबाबदारी
सांभाळत असताना डबल लाईट राहणारेच बाबांचे समीप रत्न आहेत.
हे अव्यक्त इशारे -
परोपकाराच्या भावनेने संपन्न बनून अपकारीवर देखील उपकार करा.
आपली ३ स्वरूपे सदैव
लक्षात ठेवा - एक - ‘उपकारी’, दुसरे ‘निरहंकारी’, तिसरे ‘अधिकारी’. कितीही कोणी
अपकारी असो परंतु तुमची दृष्टी आणि वृत्ती उपकारी असावी, मग जितके अधिकारी तितकेच
निरहंकारी. जेव्हा वृत्तीमधून देखील ‘मी’पणाचा त्याग होईल, स्मृतीमध्ये सदैव ‘बाबा’
आणि ‘दादा’ राहतील आणि ओठांवर देखील हेच शब्द राहतील तेव्हाच विश्वपती बनून विश्वाची
सेवा करू शकाल.