30-12-2025
प्रभात: मराठी मुरली
ओम
शान्ति
बापदादा
मधुबन
“गोड
मुलांनो - पापांपासून मुक्त होण्याकरिता विश्वासू, ऑनेस्ट (प्रामाणिक) बनून आपली
कर्म-कथा बाबांना लिहून द्या तर अर्धे माफ होईल ”
प्रश्न:-
संगमयुगावर
तुम्ही मुले कोणते बीज लावू शकत नाही?
उत्तर:-
देह-अभिमानाचे. या बिजापासून सर्व विकारांची झाडे उत्पन्न होतात. यावेळी संपूर्ण
दुनियेमध्ये ५ विकारांची झाडे आलेली आहेत. सर्व जण काम-क्रोधाचे बीज पेरत राहतात.
तुम्हाला बाबांचे डायरेक्शन आहे - मुलांनो, योगबलाद्वारे पावन बना. हे बीज पेरणे
बंद करा.
गीत:-
तुम्हें पा के
हमने जहाँ पा लिया है…
ओम शांती।
गोड-गोड रुहानी मुलांनी गाणे ऐकले! आता तर थोडे आहेत, पुष्कळ मुले होतील. यावेळी
प्रॅक्टिकलमध्ये फार थोडे बनला आहात तरी देखील या प्रजापिता ब्रह्माला जाणतात तर
सर्वजण ना. नावच आहे - प्रजापिता ब्रह्मा. किती असंख्य प्रजा आहे. सर्व धर्माचे
यांना जरूर मानतील. त्यांच्या द्वारेच मनुष्य मात्राची रचना झालेली आहे ना. बाबांनी
समजावून सांगितले आहे लौकिक पिता देखील हदचे ब्रह्मा आहेत कारण त्यांचा देखील सिजरा
बनतो (वंशावळ बनते) ना. आडनावाने वंशावळ चालते. ते असतात हदचे, हे आहेत बेहदचे पिता.
यांचे नावच आहे प्रजापिता. ते लौकिक पिता तर मर्यादित प्रजा रचतात. कोणी तर रचतही
नाहीत. हे तर जरूर रचतील. असे कोणी म्हणतील का की, प्रजापिता ब्रह्माला संतान नाही
आहे? यांची संतान तर सारी दुनिया आहे. सर्वप्रथम आहेतच प्रजापिता ब्रह्मा. मुसलमान
देखील ‘आदम-बीबी’ जे म्हणतात ते जरूर कोणाला तरी म्हणत असतील ना. ‘ॲडम-ईव’, ‘आदि
देव’, ‘आदि देवी’ हे प्रजापिता ब्रह्मासाठीच म्हटले जाते. जे पण धर्मवाले आहेत सर्व
यांना मानतील. बरोबर, एक आहेत हदचे पिता, दुसरे आहेत बेहदचे. हे बेहदचे पिता आहेत
बेहदचे सुख देणारे. तुम्ही पुरुषार्थ देखील करता बेहद स्वर्गाच्या सुखाकरिता. इथे
बेहदच्या बाबांकडून बेहदच्या सुखाचा वारसा घेण्यासाठी आला आहात. स्वर्गामध्ये बेहदचे
सुख आहे, नरकामध्ये बेहदचे दुःख देखील म्हणू शकता. दुःख देखील खूप येणार आहे.
हाय-हाय करत राहतील. बाबांनी तुम्हाला साऱ्या विश्वाच्या आदि-मध्य-अंताचे रहस्य
समजावून सांगितले आहे. तुम्ही मुले समोर बसला आहात आणि पुरुषार्थ देखील करत आहात.
हे तर दोघेही माता-पिता झाले ना. इतकी असंख्य मुले आहेत. बेहदच्या माता-पित्याशी कधी
कोणी शत्रुत्व ठेवणार नाहीत. माता-पित्याकडून किती सुख मिळते. गातात देखील - ‘तुम
मात-पिता…’ हे तर मुलेच समजतात. बाकीच्या धर्माचे सर्वजण फादरलाच बोलावतात.
माता-पिता म्हणणार नाहीत. हे फक्त इथेच गातात तुम्ही मात-पिता आम्ही… तुम्ही मुले
जाणता - आपण शिकून मनुष्यापासून देवता, काट्यांपासून फूल बनत आहोत. बाबा खिवैया
देखील आहेत, बागवान देखील आहेत. बाकी तुम्ही ब्राह्मण सर्व अनेक प्रकारचे माळी आहात.
मुगल गार्डनचा देखील माळी असतो ना. त्याचा पगार देखील खूप चांगला असतो. माळी देखील
नंबरवार आहेत ना. काही-काही माळी किती चांगली-चांगली फुले बनवतात. फुलांमध्ये एक
किंग ऑफ फ्लॉवर देखील असते. सतयुगामध्ये किंग-क्वीन फ्लॉवर देखील आहेत ना. इथे भले
महाराजा-महाराणी आहेत परंतु फ्लॉवर्स नाही आहेत. पतित बनल्याने काटे बनतात. वाटेने
चालता-चालता काटा लावून (दुःख देऊन) पळून जातात. अजामिल देखील त्यांना म्हटले जाते.
सर्वात जास्त भक्ती देखील तुम्ही करता. वाममार्गामध्ये गेल्याची चित्रे बघा कशी
घाणेरडी बनवली आहेत. देवतांचीच चित्रे दाखवली आहेत. आता ती आहेत वाममार्गाची चित्रे.
आता तुम्हा मुलांना या गोष्टी समजल्या आहेत. आता तुम्ही ब्राह्मण बनला आहात. आपण
विकारांपासून खूप दूर-दूर जातो. ब्राह्मणांमध्ये भावा-बहीणी सोबत विकारामध्ये जाणे
- हा तर खूप मोठा क्रिमिनल एसॉल्ट (विकारांचे आक्रमण) होईल. नावच खराब होते. म्हणून
बालपणापासूनच काही खराब काम केले असेल तर ते देखील बाबांना ऐकवतात तर अर्धे माफ होते.
लक्षात तर राहते ना. अमक्या वेळेला आपण हे घाणेरडे काम केले. बाबांना लिहून देतात.
जे खूप प्रामाणिक ऑनेस्ट असतात ते बाबांना लिहितात - ‘बाबा, मी हे-हे घाणेरडे काम
केले. क्षमा करा’. बाबा म्हणतात क्षमा तर होत नाही, बाकी खरे सांगता त्यामुळे ते
हलके होईल. असे नाही विसरून जायला होते. विसरू शकत नाही. पुढे पुन्हा असे कोणते काम
होऊ नये त्यासाठी खबरदार करतो. बाकी मन खाते जरूर. म्हणतात - ‘बाबा, आम्ही तर
अजामिल होतो’. आता या जन्माचीच गोष्ट आहे. हे देखील आता तुम्हीच जाणता. केव्हा
पासून वाममार्गामध्ये येऊन पाप आत्मा बनला आहात? आता बाबा पुन्हा आपल्याला पुण्य
आत्मा बनवत आहेत. पुण्य आत्म्यांची दुनियाच वेगळी आहे. भले दुनिया एकच आहे परंतु
तुम्ही समजता की दोन भागामध्ये विभागलेली आहे. एक आहे पुण्य आत्म्यांची दुनिया
ज्याला स्वर्ग म्हटले जाते. दुसरी आहे पाप आत्म्यांची दुनिया ज्याला नरक दुःखधाम
म्हटले जाते. सुखाची दुनिया आणि दुःखाची दुनिया. दुःखाच्या दुनियेमध्ये सर्वजण ओरडत
असतात - आम्हाला लिबरेट करा, आपल्या घरी घेऊन जा. हे देखील मुले समजतात की, घरी
जाऊन बसून रहायचे नाहीये, तर पुन्हा पार्ट बजावण्याकरिता यायचे आहे. यावेळी सारी
दुनिया पतित आहे. आता बाबांद्वारे तुम्ही पावन बनत आहात. एम ऑब्जेक्ट समोर उभे आहे.
इतर कोणीही एम ऑब्जेक्ट दाखवणार नाहीत की आपण असे बनत आहोत. बाबा म्हणतात -
‘मुलांनो, तुम्ही हे (लक्ष्मी-नारायण) होता, आता नाही आहात. पूज्य होता आता पुजारी
बनला आहात; आता पुन्हा पूज्य बनण्यासाठी पुरुषार्थ केला पाहिजे. बाबा किती चांगला
पुरुषार्थ करवून घेतात. हे बाबा (ब्रह्मा बाबा) समजतात ना की, मी प्रिन्स बनणार आहे.
नंबरवनमध्ये आहेत हे, तरी देखील निरंतर आठवण टिकत नाही. विसरून जातात. कितीही कोणी
मेहनत करेल परंतु अजून ती अवस्था साध्य होणार नाही. कर्मातीत अवस्था तेव्हा होईल
जेव्हा युद्धाची वेळ असेल. पुरुषार्थ तर सर्वांना करायचाच आहे ना. यांना देखील
करायचा आहे. तुम्ही कल्पवृक्षाच्या चित्रावर समजावून सांगता देखील की, चित्रामध्ये
पहा बाबांचे चित्र कुठे आहे? एकदम झाडाच्या टोकाला शेवटी पतित दुनियेमध्ये उभे आहेत
आणि खालच्या बाजूला मग तपस्या करत आहेत. किती सोप्या पद्धतीने समजावून सांगितले जाते.
या सर्व गोष्टी बाबांनीच सांगितल्या आहेत. हे देखील (ब्रह्माबाबा देखील) जाणत नव्हते.
बाबाच नॉलेजफुल आहेत, त्यांचीच सर्वजण आठवण करतात - ‘हे परमपिता परमात्मा, येऊन आमचे
दुःख दूर करा’. ब्रह्मा-विष्णू-शंकर तर देवता आहेत. मूलवतनमध्ये राहणाऱ्या
आत्म्यांना देवता थोडेच म्हटले जाते. ब्रह्मा-विष्णू-शंकराचे देखील रहस्य बाबांनी
समजावून सांगितले आहे. ब्रह्मा, लक्ष्मी-नारायण हे तर सर्व इथेच आहेत ना.
सूक्ष्मवतनचा केवळ तुम्हा मुलांना आता साक्षात्कार होतो. हे बाबा देखील फरिश्ता
बनतात. हे तर मुले जाणतात शिडीच्या वर उभे आहेत, तेच मग खाली तपस्या करत आहेत.
चित्रामध्ये एकदम क्लियर दाखवले आहे. ते स्वतःला भगवान कुठे म्हणवून घेतात. हे तर
म्हणतात - ‘मी वर्थ नॉट ए पेनी होतो, ततत्वम्’. आता वर्थ पाउंड बनत आहोत, ततत्वम्.
किती सोप्या समजून घेण्यासारख्या गोष्टी आहेत. कधी कोणी बोलेल तर सांगा पहा हे तर
कलियुगाच्या अंतामध्ये उभे आहेत ना. बाबा म्हणतात - जेव्हा जडजडीभूत अवस्था,
वानप्रस्थ होते, तेव्हा मी यांच्यामध्ये प्रवेश करतो. आता राजयोगाची तपस्या करत
आहेत. तपस्या करणाऱ्यांना देवता कसे म्हणणार? राजयोग शिकून असे बनतील. तुम्हा
मुलांना देखील असे ताज वाले बनवतात ना. हे सो देवता बनतात. असे तर १०-२० मुलांचे
फोटो देखील दाखविण्यासाठी ठेवू शकता की असे बनत आहेत. पहिले सर्वांचे असे फोटो
काढलेले आहेत. ही नीट समजावून सांगण्याची गोष्ट आहे ना. एकीकडे साधारण, दुसरीकडे
डबल मुकुटधारी. तुम्ही समजता आपण असे बनत आहोत. बनतील तेच ज्यांची लाईन क्लिअर असेल
आणि खूप गोड देखील बनायचे आहे. यावेळी लोकांमध्ये काम-क्रोध आदींचे बीज किती वाढले
आहे. सर्वांमध्ये ५ विकार रुपी बिजाची झाडे उगवली आहेत. आता बाबा म्हणतात - असे बीज
पेरू नका. संगमयुगावर तुम्हाला देह-अभिमानाचे बीज पेरायचे नाहीये. काम विकाराचे बीज
पेरायचे नाही आहे. अर्ध्या कल्पासाठी मग रावणच राहणार नाहीये. प्रत्येक गोष्ट बाबा
बसून मुलांना समजावून सांगतात. मुख्य तर एकच गोष्ट आहे मनमनाभव. बाबा म्हणतात - माझी
आठवण करा. सर्वात शेवटी हे आहेत, पुन्हा सर्वात पहिले देखील हेच आहेत. योगबलाद्वारे
किती पावन बनतात. सुरुवातीला तर मुलांना खूप साक्षात्कार होत होते. भक्तीमार्गामध्ये
जेव्हा नवधा भक्ती करत होते तेव्हा साक्षात्कार होतो. इथे तर हे बसल्या-बसल्या
ध्यानामध्ये जात होते, त्याला जादू समजत होते. ही तर फर्स्टक्लास जादू आहे. मीराने
तर खूप तपस्या केली, साधू-संत इत्यादींचा संग केला. इथे साधू इत्यादी कुठे आहेत. हे
तर बाबा आहेत ना. सर्वांचे पिता आहेत शिवबाबा. म्हणतात - ‘गुरु’जींना भेटायचे आहे.
इथे तर गुरु नाही आहेत. शिवबाबा तर आहेत निराकार मग कोणाला भेटू इच्छिता? त्या
गुरुकडे जाऊन तर भेट-वस्तू ठेवतात. हे बाबा तर बेहदचे मालक आहेत. ही भेट-वस्तू
इत्यादी देण्याचा प्रश्नच नाही. हे पैशाचे काय करणार? हे ब्रह्मा देखील समजतात - मी
विश्वाचा मालक बनतो. मुले जे काही पैसा इत्यादी देतात तर त्यांच्यासाठीच घरे इत्यादी
बनवतात. पैसे तर ना शिवबाबांच्या कामाचे आहेत, ना ब्रह्मा बाबांच्या कामाचे आहेत.
ही घरे इत्यादी बनवली आहेतच मुलांसाठी, मुलेच येऊन राहतात. कोणी गरीब आहेत, कोणी
श्रीमंत आहेत, कोणी तर दोन रुपये सुद्धा पाठवतात - ‘बाबा, आमची एक वीट लावा’. कोणी
तर हजार पाठवतात. भावना तर दोघांचीही एकच आहे ना. तर दोघांचे एक समान बनते. मग
तुम्ही मुले येता तेव्हा जिथे पाहिजे तिथे रहा. ज्यांनी घर बांधायला सहयोग दिला आहे,
ते जर येतात तर त्यांना जरूर सुखामध्ये ठेवतील. बरेचजण मग म्हणतात बाबांकडे देखील
खातिरी (आदरातिथ्य) होते. अरे ते तर जरूर करावे लागेल ना. कोणी कसे आहेत, कोणी तर
कुठेही आरामात राहतात. कोणी खूप नाजूक असतात, विदेशात राहणारे, मोठ-मोठ्या
बंगल्यामध्ये राहणारे असतात, प्रत्येक राष्ट्रातून मोठ-मोठे श्रीमंत निघतात तर घरे
इत्यादी तशीच बनवतात. इथे तर पहा असंख्य मुले येतात. इतर कोणत्या पित्याला असे
विचार थोडेच असतील. फारफार तर १०-१२-२० नातवंडे असतील. अच्छा, कोणाला २००-५०० देखील
असतील यापेक्षा जास्त तर नसतील. या बाबांची फॅमिली तर किती मोठी आहे, अजूनच वृद्धी
होणार आहे. ही तर राजधानी स्थापन होत आहे. बाबांची फॅमिली केवढी बनेल. मग प्रजापिता
ब्रह्माची फॅमिली केवढी झाली. कल्प-कल्प जेव्हा येतात तेव्हाच वंडरफुल गोष्टी
तुमच्या कानामध्ये पडतात. बाबांसाठीच म्हणता ना - ‘हे प्रभू तुमची गत-मत सर्वात
न्यारी सुरू होते’. भक्ती आणि ज्ञानामध्ये फरक पहा किती आहे.
बाबा तुम्हाला
समजावून सांगतात - स्वर्गामध्ये जायचे असेल तर दैवी गुण देखील धारण केले पाहिजेत.
आता तर काटे आहात ना. गात राहतात - मैं निर्गुण हारे में कोई गुण नाही. बाकी ५
विकारांचे अवगुण आहेत, रावण राज्य आहे. आता तुम्हाला किती चांगले नॉलेज मिळते. ते
नॉलेज इतका आनंद देत नाही, जितके हे नॉलेज देते. तुम्ही जाणता आपण आत्मे वर
मूलवतनमध्ये राहणारे आहोत. सूक्ष्मवतनमध्ये ब्रह्मा-विष्णू-शंकर, तो देखील फक्त
साक्षात्कार होतो. ब्रह्मा देखील इथलेच, लक्ष्मी-नारायण देखील इथलेच आहेत. हा केवळ
साक्षात्कार होतो. व्यक्त ब्रह्मा सो मग सूक्ष्मवतनवासी ब्रह्मा फरिश्ता कसे बनतात,
त्याची निशाणी आहे; दुसरे काहीच नाही. आता तुम्ही मुले सर्व गोष्टी समजत आहात, धारणा
करत जाता. काही नवीन गोष्ट नाहीये. तुम्ही अनेकदा देवता बनला आहात, डीटी राज्य (देवतांचे
राज्य) होते ना. हे चक्र फिरत राहते. तो (दुनियेतील) विनाशी ड्रामा असतो, हा आहे -
अनादि अविनाशी ड्रामा. हे तुमच्या व्यतिरिक्त इतर कोणाच्याही बुद्धीमध्ये नाही आहे.
हे सर्व बाबा बसून समजावून सांगतात. असे नाही की परंपरेने चालत आले आहे. बाबा
म्हणतात - हे ज्ञान आता तुम्हाला ऐकवत आहे. पुन्हा हे प्राय: लोप होते. तुम्ही
राज्य पद प्राप्त करता नंतर मग सतयुगामध्ये हे नॉलेज राहत नाही. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) नेहमी हे
लक्षात राहावे की, आपण आता ब्राह्मण आहोत त्यामुळे विकारांपासून खूप-खूप दूर रहायचे
आहे. कधीही क्रिमिनल एसॉल्ट (विकारांचे आक्रमण) होऊ नये. बाबांशी खूप-खूप ऑनेस्ट,
प्रामाणिक रहायचे आहे.
२) डबल मुकुटधारी
देवता बनण्याकरिता अतिशय गोड बनायचे आहे, लाईन क्लिअर ठेवायची आहे. राजयोगाची तपस्या
करायची आहे.
वरदान:-
नेहमी बेहदच्या
स्थितीमध्ये स्थित राहणारे बंधनमुक्त, जीवनमुक्त भव
देह-अभिमान हदची
स्थिती आहे आणि देही-अभिमानी बनणे - ही आहे बेहदची स्थिती. देहामध्ये आल्याने अनेक
कर्मांच्या बंधनामध्ये, हदमध्ये यावे लागते परंतु जेव्हा देही-अभिमानी बनता तेव्हा
ही सर्व बंधने नष्ट होतात. जसे म्हटले जाते - ‘बंधनमुक्तच जीवनमुक्त आहे’; तर असे
जे बेहदच्या स्थितीमध्ये स्थित राहतात ते दुनियेचे वायुमंडळ, व्हायब्रेशन, तमोगुणी
वृत्ती, मायेचे वार या सर्वांपासून मुक्त होतात यालाच म्हटले जाते जीवनमुक्त स्थिती,
ज्याचा अनुभव संगमयुगावरच करायचा आहे.
बोधवाक्य:-
निश्चय
बुद्धीची निशाणी आहे - निश्चित विजयी आणि निश्चिंत, त्यांच्याकडे व्यर्थ येऊ शकत
नाही.
अव्यक्त इशारे:- आता
संपन्न अथवा कर्मातीत बनण्याचा ध्यास धरा.
कर्मांच्या
गुह्य गतीला जाणून अर्थात त्रिकालदर्शी बनून प्रत्येक कर्म करा तेव्हाच कर्मातीत बनू
शकाल. जर छोट्या-छोट्या चुका संकल्प रूपामध्ये जरी होतात तर त्याचा देखील हिशोब खूप
कठोर बनतो त्यामुळे छोटीशी चूक देखील मोठी समजायची आहे कारण आता संपूर्ण स्थितीच्या
समीप येत आहात.