31-03-2026      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


प्रश्न:-
कोणती मुले कधीही लपून राहू शकत नाहीत?

उत्तर:-
ज्यांचे ईश्वरीय परिवारावर प्रेम आहे, ज्यांना रात्रं-दिवस सेवेची काळजी असते अशी सेवाभावी, जी आज्ञाधारक आणि प्रामाणिक आहेत, कधीही मन-मतावर चालत नाहीत, बाबांशी सच्चे आणि स्वच्छ मनाचे असतात ते कधीही लपून राहू शकत नाहीत.

गीत:-
तुम्हीं हो माता पिता…

ओम शांती।
गाण्यामध्ये कशाची गॅरंटी (हमी) होती. माता-पित्या सोबतच मुलांची गॅरंटी आहे की, ‘बाबा, आमचे तर एक तुम्हीच आहात, दुसरे कोणीही नाही’. किती उच्च ध्येय आहे. अशा श्रेष्ठ बाबांच्या श्रीमतावर कोणी चालेल तर गॅरंटी आहे की, नक्कीच उच्च वारसा प्राप्त करेल. परंतु बुद्धी म्हणते खूप उच्च ध्येय दिसून येते. जे कोटींमध्ये कोणी, आणि कोणीमध्ये सुद्धा कोणीच फक्त माळेचे मणी बनतात. म्हणतात देखील - ‘तुम माता-पिता’, परंतु माया इतकी कठोर आहे की कोणी मुश्किलीने गॅरंटी नुसार चालू शकतील. प्रत्येक जण स्वतःला विचारू शकता की, खरंच मी मात-पित्याचा बनलो आहे का? बाबा म्हणतात - नाही. फार कमी आहेत तेव्हाच तर बघा माळा कितीजणांची बनली आहे? किती कोटींमधून फक्त आठ जणांची वैजयंतीमाळा बनते. कित्येकजण तर म्हणतात एक, आणि करतात दुसरेच म्हणून बाबा देखील म्हणतात - ‘बघा, किती आश्चर्य आहे’. बाबा किती प्रेमाने समजावून सांगतात, परंतु सपूत मुले फार कमी निघतात (माळेचे मणी). मुलांमध्ये इतकी शक्ती नाहीये जे श्रीमतावर चालू शकतील, तर जरूर रावणाच्या मतावर आहेत म्हणून इतके पद प्राप्त करू शकत नाहीत. कोणी विरळेच माळेचे मणी बनतात, ती मुले देखील लपून रहात नाहीत. ते बाबांच्या हृदयाच्या जवळ राहतात. रात्रं-दिवस त्यांचे सेवेवरच लक्ष असते, ईश्वरीय नात्यावर प्रेम असते, बाहेर कुठेही त्यांची बुद्धी जात नाही. असे प्रेम दैवी परिवाराशी ठेवायचे आहे. अज्ञान काळामध्ये देखील मुलांचे वडिलांवर, बहीण-भावांचे आपसात खूपच प्रेम असते. इथे तर काहीजणांचा कणभर सुद्धा बाबांशी योग नाहीये. गॅरंटी तर खूप देतात. भक्तीमार्गामध्ये गातात, आता तर मुले सन्मुख आहेत. विचार केला जातो, भक्तीमार्गामध्ये जे गात राहतात, ते किती प्रेमाने आठवण करतात. इथे तर आठवणच करत नाहीत. बाबांचे बनल्यामुळे माया शत्रू बनते. बुद्धी बाहेर जाते त्यामुळे माया चांगलीच खाली पाडते. त्यांना स्वतःलाच समजत नाही की आपण जे काही करत आहोत ते पडण्यासाठीच करत आहोत. स्वतःच्या मतामुळे पडत राहतात. त्यांना कळत सुद्धा नाही की आपण काय करत आहोत. मुलांमध्ये काहीतरी खामी (कमतरता) आहेत ना. बोलतात एक, करतात दुसरेच. नाहीतर बाबांकडून वारसा किती उच्च मिळतो. किती सच्चाईने बाबांच्या सेवेमध्ये लागले पाहिजे. परंतु माया किती कठोर आहे. कोटींमध्ये कोणीच बाबांना पूर्णपणे ओळखतात. बाबा म्हणतात, कल्प-कल्प असेच होते. प्रामाणिक, आज्ञाधारक नसल्यामुळे त्या बिचाऱ्यांचे पद असे होते. म्हणतात देखील - ‘बाबा, आम्ही राजयोग शिकून नरा पासून नारायण, नारी पासून लक्ष्मी बनणार. राम-सीता बनणार नाही. हात सुद्धा उंच करतात. परंतु वर्तन देखील तसे पाहिजे ना. बेहदचे बाबा वारसा देण्यासाठी आले आहेत, त्यांच्या मतावर किती चालले पाहिजे. असे भरपूर आहेत ज्यांनी शपथ घेतली आहे की, आम्ही श्रीमतानुसार चालणार नाही. ते लपून राहत नाहीत. कोणाच्या नशिबात नसेल तर पहिल्यांदा देह-अभिमान थप्पड लगावतो. नंतर आहे काम विकार. काम विकार नसला तर क्रोध, लोभ आहेतच. हे तर सर्व शत्रू आहेत. मोह देखील अशी गोष्ट आहे जो एकदम सत्यानाश करतो. लोभ सुद्धा काही कमी नाहीये. हे सर्व अतिशय क्रूर शत्रू आहेत. खूप क्षुल्लक वस्तूची चोरी करतील. हा देखील लोभ आहे ना. चोरीची खूप वाईट सवय आहे. आतून मन खायला पाहिजे की आपण पाप करत राहिलो तर काय पद मिळवणार. शिवबाबांच्या यज्ञामध्ये येऊन बाबांकडे मी असे काम कसे करू शकतो. माया खूप उलटी कामे करून घेते. कितीही समजावून सांगा, तरीही सवय जात नाही. कोणी नावा-रूपामध्ये अडकतात. देह-अभिमानामुळे नावा-रूपामध्ये अडकतात. प्रत्येक सेंटर विषयी बाबांना सर्वकाही ठाऊक असते ना. बाबा तरी काय करणार, समजावून सांगावे तर लागते. किती सेंटर्स आहेत. बाबांकडे किती समाचार येतात. काळजी तर असते ना. मग समजावून सांगावे लागते, माया काही कमी नाहीये. खूप त्रास देते. चांगल्या-चांगल्या मुलांना सांगितले जाते - मोठी कहाणी मोठे दुःख भोगणे. इथे तर दुःखाची काही गोष्टच नाही. जाणता की कल्पापूर्वी देखील असे झाले होते. ईश्वराचे बनून तरीसुद्धा मायेच्या वश होतात. काही ना काही विकर्म करतात, म्हणून तर बाबा म्हणतात की प्रतिज्ञा तर खूप मुले करतात की, ‘बाबा, आम्ही तुमच्या श्रीमतानुसार नक्की चालू’; परंतु चालत नाहीत त्यामुळे माळा बघा किती छोटी बनते, बाकी तर आहे प्रजा. किती मोठे ध्येय आहे, यामध्ये मनाची खूप सफाई पाहिजे. म्हण देखील आहे - ‘सच तो बिठो नच’. जर बाबांसोबत सच्चाईने (प्रामाणिकपणाने) चालत रहाल तर सतयुगामध्ये जाऊन श्रीकृष्णासोबत डान्स कराल. सतयुगामध्ये श्रीकृष्णाचा डान्सच प्रसिद्ध आहे. रासलीला, राधे-कृष्णाचीच दाखवतात. नंतर रामलीला दाखवतात. परंतु नंबर वन रासलीला राधे-कृष्णाची आहे कारण या वेळी ते बाबांसोबत खूपच प्रामाणिक बनून राहतात तर किती उच्च पद प्राप्त करतात. असे हात तर बरेचजण वर करतात, परंतु माया कशी आहे ना. प्रतिज्ञा करतात तर त्यावर चालावे लागेल ना. मायेच्या भुतांना पळवून लावायचे आहे. देह-अभिमानाच्या मागे सर्व भूते चिकटून राहतात. बाबा म्हणतात देही-अभिमानी बनून बाबांची आठवण करा. त्यातही पहाटे उठून बाबांशी गुज गोष्टी करा. बाबांची महिमा करा. भक्तीमार्गामध्ये भले आठवण करतात परंतु महिमा तर कोणाचीच नाहीये. श्रीकृष्णाची आठवण करतील. महिमा करतील - ‘लोणी चोरले, त्यांना पळवून नेले. अकासूर, बकासुराला मारले, असे केले’. बस्स, आणखी काय म्हणतील. हे सर्व आहे असत्य. सूतभर सुद्धा खरे नाही. मग रस्ता काय दाखवतील! मुक्तीलाच जाणत नाहीत. यावेळी साऱ्या विश्वावर रावणाचे राज्य आहे. यावेळी सर्व पतित आहेत. मनुष्याला भ्रष्टाचारीचा अर्थ देखील समजत नाहीत. हे देखील जाणत नाहीत की सतयुगामध्ये निर्विकारी देवता होते. गातात देखील - सर्व गुण संपन्न, १६ कला संपूर्ण. आणि मग असेही म्हणतात की, तिथे देखील रावण, कंस, जरासंध इत्यादी होते. सांगितले जाते - पवित्र बना, तर म्हणतात - ‘देवतांना देखील मुले इत्यादी तर होती ना’. अरे, तुम्ही गाता सर्वगुण संपन्न, संपूर्ण निर्विकारी… मग विकाराची गोष्ट कशी असू शकते. तुम्ही देखील निर्विकारी बना; तर म्हणतात की, सृष्टीची वृद्धी कशी होईल. मुले कशी जन्माला येतील. मंदिरांमध्ये जाऊन महिमा गातात. घरी आल्यावर ती महिमा देखील विसरून जातात. भले तुम्ही तपासून बघा. घरी जाऊन समजावून सांगाल तर मानणार नाहीत. तिथली गोष्ट तिथेच राहते.. पवित्र बनण्यासाठी सांगाल तर म्हणतील वाह! याच्याशिवाय दुनिया कशी चालेल. त्यांना माहितीच नाही आहे की व्हाईसलेस दुनिया (निर्विकारी दुनिया) कशी चालते.

मुलांनी गाणे देखील ऐकले. प्रतिज्ञा करतात - ‘तुमच्याच मतावर चालू’, कारण श्रीमतावर चालण्यामध्येच कल्याण आहे. बाबा तर सांगत राहतात - श्रीमतावर चाला, नाहीतर सरते शेवटी मृत्यू समोर येऊन उभा राहील. मग ट्रिब्युनलमध्ये सर्व काही सांगावे लागेल. तुझ्या कडून ही-ही पापे झाली आहेत. स्वतःच्या मतावर चालून मग कल्प-कल्पाचा डाग लागेल. असे नाही की एकदा नापास झाला तर दुसऱ्या, तिसऱ्या वर्षामध्ये शिकेल. नाही. आता नापास झाला तर कल्प-कल्प होत राहील, म्हणून खूप पुरुषार्थ करायचा आहे. पावलो-पावली श्रीमतावर चाला. आतमध्ये कसलीही घाण राहू नये. हृदयाला शुद्ध बनवायचे आहे. नारदाला देखील सांगितले ना - ‘आपले तोंड आरशात बघ’. तर असे बघितले की, आपण तर मर्कटा समान आहोत. हा देखील एक दृष्टांत आहे. स्वतःला विचारायचे आहे की, आपण कितपत श्रीमतावर चालत आहोत. बुद्धियोग कुठे बाहेर तर भटकत नाही ना? देह-अभिमानाध्ये तर नाही ना? देही-अभिमानी तर सेवेमध्ये व्यस्त राहील. सर्व काही योगावर अवलंबून आहे. भारताचा योग प्रसिद्ध आहे. ते तर निराकार बाबाच निराकार मुलांना समजावून सांगतात. याला म्हटले जाते सहज राजयोग. लिहिले देखील आहे - निराकार पित्याने सहज राजयोग शिकविला. फक्त श्रीकृष्णाचे नाव घातले आहे. तुम्ही जाणता आपल्याला असे लक्ष्मी-नारायण बनायचे आहे. पुण्य आत्मा बनायचे आहे. पापाची कोणती गोष्टच नाही. बाबांच्या आठवणीमध्ये राहूनच त्यांच्या सेवेमध्ये राहायचे आहे. इतके उच्च पद मिळवायचे असेल तर काहीतरी मेहनत करणार ना. संन्यासी इत्यादी तर म्हणतात की, गृहस्थ व्यवहारामध्ये राहून कमलपुष्प समान राहणे, हे तर होऊ शकत नाही. संपूर्ण बनण्यामध्ये खूपजण फेल होतात कारण ते आठवण करू शकत नाहीत. आता प्राचीन योग बाबा शिकवत आहेत. बाबा म्हणतात - ‘योग तर मी स्वतः येऊन शिकवतो, आता माझी आठवण करा. तुम्हाला माझ्याकडे यायचे आहे’. ही आहे आठवणीची यात्रा. तुमचे स्वीट सायलेन्स होम ते आहे. हे देखील जाणता की आपणच बाबांकडून पूर्ण वारसा घेणार. तर बाबा वारंवार समजावून सांगतात, प्रतिज्ञेवर अटल रहा. चूक झाली असेल तर बाबांकडून क्षमा मागितली पाहिजे.

आता बघा, हा मुलगा क्षमा मागण्यासाठी खास बाबांकडे एका दिवसासाठी आला आहे. थोडी चूक झाली तर पळत आला, कारण मनाला खात राहते तर असे वाटले सन्मुख जाऊन बाबांना ऐकवावे. बाबांप्रती केवढा रिगार्ड आहे. अशी खूप मुले आहेत जी याच्यापेक्षाही जास्त विकर्म करत राहतात, परंतु त्यांना ते कळत सुद्धा नाही. मी तर असे म्हणतो - वाह बच्चा, खूप चांगला आहेस. थोडीशी चूक झाली तर क्षमा घेण्यासाठी आला आहेस. बाबांचे नेहमीच असे म्हणणे आहे की, चूक कबूल करून क्षमा मागा. नाहीतर त्या पापांची वृद्धी होत राहील. आणि मग कोसळाल (पतन होईल). मुख्य तर योगा मुळेच वाचू शकाल, ज्या योगाची खूप कमतरता आहे. ज्ञान तर खूप सोपे आहे. ही तर जशी एक कहाणी आहे की, आजपासून ५००० वर्षांपूर्वी कोणाचे राज्य होते, कसे राज्य केले, किती वेळ केले, मग राज्य करता-करता कसे विकारांमध्ये फसले. कोणी आक्रमण केलेले नाहीये. आक्रमण तर नंतर जेव्हा वैश्य बनले तेव्हा झाले आहे. त्यांच्याकडून तर रावणाने राज्य हिसकावून घेतले. तुम्ही मग परत रावणावर विजय प्राप्त करून राज्य घेता, हे देखील कोणाच्या बुद्धीमध्ये मुश्किलीने बसते. तुम्हाला बाबांसोबत पूर्ण इमानदार, आज्ञाधारक होऊन राहायचे आहे. अज्ञान काळामध्ये देखील कोणी इमानदार, आज्ञाधारक असतात. काही नोकर देखील खूप प्रामाणिक असतात. लाखो रुपये पडून राहिले तरी, कधी एकही रुपया उचलणार नाहीत. असे म्हणतात - शेटजी, तुम्ही चाव्या विसरून गेला होता, मी सांभाळण्यासाठी घेऊन बसलो आहे. असे देखील असतात. बाबा तर खूप चांगल्या रीतीने समजावून सांगत राहतात. विवेक म्हणतो की, या-या कारणामुळे माळेचा मणी बनत नाहीत. मग तिथे जाऊन दास-दासी बनतील. अभ्यास न केल्यामुळे जरूर अशी हालत होत असेल. श्रीमतावर चालत नाहीत. बाबा समजावून सांगतात - तुमचे ध्येयच सारे योगाचे आहे. माया एकदम नाकाला पकडून योग लावू देत नाही. योग असेल तर सेवा देखील खूप चांगली करतील. पापांची भीती वाटावी. जसा हा मुलगा तर खूप चांगला आहे. प्रामाणिकपणा असावा तर असा. चांगल्या-चांगल्या मुलांपेक्षा याचे पद चांगले आहे. आणि जे सेवा करत राहतात, ते कुठे ना कुठे अडकलेले राहतात. ते काहीच सांगत नाहीत. सांगितल्यावर सुद्धा सोडतही नाहीत. गाण्यामध्ये तर बघा, प्रतिज्ञा करतात की काहीही होऊ देत, कधीही अशी चूक करणार नाही. मूळ गोष्ट आहे देह-अभिमानाची. देह-अभिमानामुळेच चुका होतात. खूप चुका करतात म्हणून सावधानी दिली जाते. बाबांचे काम आहे समजावून सांगणे. समजावून नाही सांगितले तर म्हणतील - आम्हाला कोणी सांगितले थोडेच होते. यावर देखील एक कहाणी आहे. बाबा देखील म्हणतात - ‘मुलांनो, खबरदार रहा’. नाहीतर खूप सजा भोगावी लागेल. मग असे म्हणू नका की आम्हाला सांगितले का नाही. बाबा साफ समजावून सांगतात थोडे जरी पाप केले तरी त्याची खूप वृद्धी होत जाते. मग बाबांसमोर डोके वर देखील करू शकणार नाही. खोटे बोलले तर तोबा-तोबा केले पाहिजे. असे समजू नका की शिवबाबा आम्हाला बघत थोडेच आहेत. अरे अज्ञान काळामध्ये देखील ते सर्व काही जाणतात तेव्हाच तर पाप आणि पुण्याचे फळ देतात. स्पष्टपणे सांगतात की जर तुम्ही पाप कराल तर तुमच्यासाठी खूप कठोर सजा आहे. बाबांकडून वारसा घेण्यासाठी आला आहात, तर त्या बदल्यात दोन्ही कान तर छाटले जाऊ नयेत ना. म्हणतात - ‘एक’ आहे आणि आठवण करतात दुसऱ्याची. बाबांची आठवण करत नाहीत तर सांगा त्यांची गती काय होईल? सत्य खाणे, सत्य बोलणे, सत्य परिधान करणे… ही देखील आताची गोष्ट आहे. जेव्हा की बाबा येऊन शिकवत आहेत तर त्यांच्यासोबत प्रत्येक गोष्टीमध्ये प्रामाणिक राहिले पाहिजे. अच्छा!

अशा सच्च्या प्रामाणिक, अज्ञाधारक मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) प्रामाणिकपणे बाबांच्या सेवेमध्ये रुजू व्हायचे आहे. पूर्णत: प्रामाणिक, आज्ञाधारक बनायचे आहे. ईश्वरीय परिवारावर खरे प्रेम करायचे आहे.

२) श्रीमतामध्ये मनमत किंवा रावणाचे मत मिक्स करायचे नाही. ‘एक बाबा दुसरा ना कोणी’, या गॅरंटीवर पक्के रहायचे आहे. मनाला शुद्ध, पवित्र बनवायचे आहे.

वरदान:-
रुहानियतच्या सुगंधाच्या आधारे सर्वांना परमात्म संदेश देणारे विश्व कल्याणकारी भव

रुहानियतच्या सर्व शक्ती स्वतःमध्ये धारण करा म्हणजे मग रुहानियतचा सुगंध सहजच अनेक आत्म्यांना आपल्याकडे आकर्षित करेल. जसे मनसा शक्तीद्वारे प्रकृतीला तमोप्रधानापासून सतोप्रधान बनविता तसे अन्य विश्वातील आत्मे जे लोकांसमोर येऊ शकणार नाहीत त्यांना दूर असताना देखील तुम्ही रुहानियतच्या शक्ती द्वारे बाबांचा परिचय अथवा मुख्य संदेश देऊ शकाल. ही सूक्ष्म मशिनरी जेव्हा फास्ट कराल तेव्हा अनेक तळमळत असलेल्या आत्म्यांना दिलासा मिळेल आणि तुम्ही विश्व कल्याणकारी म्हणून संबोधले जाल.

बोधवाक्य:-
आपल्याकडे शुद्ध अथवा श्रेष्ठ संकल्प इमर्ज ठेवा तर व्यर्थ स्वतः मर्ज होतील.

हे अव्यक्त इशारे - “निश्चयाच्या फाउंडेशनला मजबूत करून सदैव निर्भय आणि निश्चिंत रहा”

जेव्हा कधी कोणतीही परिस्थिती उद्भवेल तेव्हा बाबांना आपला सोबती बनवा तर तुम्ही असा अनुभव काराल की मी एकटा नाही, माझ्यासोबत विशेष शक्ती आहे. जिथे बाबा आहेत तिथे भले कितीही तुफान असोत, ते तोहफा बनतील. ‘निश्चय-बुद्धी विजयन्ती’ - टायटलच्या स्मृती द्वारे विजयी बना आणि विजयी वर्ष साजरे करा.