31-05-26    अव्यक्त बापदादा    मराठी मुरली   15.03.2010  ओम शान्ति   मधुबन


परमात्म प्रेमास पात्र आत्म्यांनो, दुःखी असणाऱ्यांना सुखाची ओंजळ द्या, व्यर्थला समाप्त करून समर्थ बना आणि समयाला समीप आणा


आज बापदादा आपल्या चोहो बाजूंच्या परमात्म प्रिय मुलांना पाहत आहेत. असे परमात्म प्रिय कोटींमध्ये कोणीच मुले आहेत कारण याच वेळी परमात्म प्रेमाचा अनुभव करू शकता, संपूर्ण कल्पामध्ये आत्म्यांचे प्रेम, महात्म्यांचे प्रेम, धर्मात्म्यांचे प्रेम यांच्या प्रेमाचा अनुभव केला आहे, परंतु परमात्म प्रेम फक्त आता संगमयुगावर मिळते, ज्याला तुम्ही सर्व मुले अनुभव करत आहात. कोणी तुम्हाला विचारले परमात्मा कुठे आहेत? तर काय उत्तर द्याल? माझ्या सोबत आहेत. माझ्या सोबतच राहतात. माझ्या हृदयातच राहतात. असा अनुभव करत आहात ना! हे तुम्हीच जाणता आणि तुम्हालाच या प्रेमाचा अनुभव आहे की आमच्या हृदयामध्ये बाबा राहतात आणि बाबांच्या हृदयात आम्ही राहतो. तुम्ही जाणता की या परमात्म प्रेमाचा नशा अनुभव करण्याचे भाग्य आम्हालाच प्राप्त झाले आहे. जेव्हा कोणावर प्रेम जडते तेव्हा त्याची निशाणी काय असते? त्याची निशाणी आहे - त्याच्यावर कुर्बान होणे. तर परमपिता परमात्मा बाबांना तुम्हा मुलांकडून काय हवे आहे, ते तर तुम्ही सर्व जण जाणता. बाबांची प्रत्येक मुलाप्रति हीच इच्छा आहे की माझा प्रत्येक बच्चा पित्या समान बनावा. जसे बाबा तशीच मुलांची देखील श्रेष्ठ स्थिती बनावी. ती श्रेष्ठ स्थिती कोणती आहे? संपूर्ण पवित्रतेची स्थिती. अशी पवित्रता की स्वप्नामध्ये देखील अपवित्रता येऊ शकणार नाही. अशी संपूर्ण पवित्र स्थिती बनवत आहात का? ज्या संपूर्ण पवित्रतेमध्ये अपवित्रतेचे नामोनिशाणही नाही.

वर्तमान समय समीप आल्याकारणाने बापदादा आता हाच इशारा देत आहेत की समयाच्या समीपतेनुसार व्यर्थ संकल्प, ही देखील अपवित्रतेची निशाणी आहे. पूर्ण दिवसभरामध्ये हे देखील चेक करा की, कोणताही व्यर्थ संकल्प अभिमानाचा अथवा अपमानाचा आपल्याकडे खेचत तर नाही ना? कारण चालता-चालता जर बाबांनी दिलेल्या विशेषतांना स्वतःची विशेषता समजून अभिमानामध्ये येत असाल, तर हा देखील व्यर्थ संकल्प झाला आणि ‘माझे’पणाचे अशुभ संकल्प - ‘मी कमी नाही’, ‘मला सुद्धा सर्व समजते’, ‘हा माझाच संकल्प योग्य आहे, श्रेष्ठ आहे’…, हा ‘माझे’पणाचा अभिमानाचा संकल्प हा देखील सूक्ष्म अपवित्रतेचा अंश आहे. तर स्वतःला चेक करा - कोणत्याही प्रकारच्या अपवित्रतेचा, व्यर्थ संकल्पाचा कोणताही अंश तर शिल्लक राहिलेला नाही ना? कारण आता पवित्र दुनियेच्या स्थापनेची वेळ समीप आणणारी तुम्ही परमात्म प्रिय मुले निमित्त आहात. तर जे निमित्त आत्मे आहेत त्यांचे व्हायब्रेशन चोहो बाजूंना पसरते. तर चेक करा की, कोणत्याही प्रकारचा व्यर्थ संकल्प सुद्धा स्वतःकडे आकर्षित तर करत नाही ना? कारण आता पवित्र दुनिया, पवित्र राज्य समीप येत आहे. दुःख आणि अशांती चोहो बाजूंनी वेगवेगळ्या स्वरूपात वाढत आहे. त्यासाठी पवित्रतेचे व्हायब्रेशन आवश्यक आहे. दुःख अशांतीचे कारण - अपवित्रता आहे. म्हणून आता अपवित्र आत्म्यांची आणि भक्त आत्म्यांची अशी डबल सेवा केली पाहिजे. वाणीची सेवा तर बापदादांनी पाहिले की चोहो बाजूला धुमधडाक्यात सुरू आहे, आपल्या प्रति तक्रारी देखील समाप्त करत आहात (कर्तव्य पार पाडत आहात). परंतु आता आत्म्यांना एक्स्ट्रा सकाश हवी आहे. ती आहे - मन्सा सेवेद्वारे सकाश देणे, हिंमत देणे, उमंग-उत्साह देणे. तर आता यावेळी डबल सेवेची आवश्यकता आहे. यासाठी बापदादांनी सांगितले आहे की, प्रत्येक मुलाने स्वतःला पूर्वज समजावे. तुम्ही या कल्पवृक्षाचे फाउंडेशन पूर्वज आणि पूज्य तुम्ही आत्मे आहात. बापदादा तर दुःखी मुलांचा आवाज ऐकत असतात. तुम्हा मुलांपर्यंत त्यांची हाक, तो आवाज पोहोचला पाहिजे. जितके संपूर्ण पवित्र आत्मा बनाल. बनत आहात, बनला देखील आहात, परंतु त्यासोबतच आता मनसा सेवा वाढवायची आहे.

आज विश्वामध्ये सुख-शांती आणि संतोष आत्म्यांमधून कमी होत चालला आहे. तर तुम्ही परमात्म प्रेमास पात्र असणाऱ्या आत्म्यांनो, आता प्रेमाची संतुष्टतेची, आनंदाची ओंजळ देण्याची आवश्यकता आहे. दुःखी असणाऱ्यांना सुखाची ओंजळ द्यायची आहे. एक तर मन्सा सेवेद्वारे सकाश द्या आणि दुसरे आपल्या चेहऱ्याद्वारे आणि चलनद्वारे (वर्तनाद्वारे) बाबांना प्रत्यक्ष करा. आता जी सेवा करत आहात आणि केली आहे त्यावर बापदादा खुश आहेत की सेवेमध्ये चोहो बाजूला उमंग-उत्साह आहे परंतु अजून एक सेवा राहिलेली आहे. आतापर्यंत असा आवाज (चर्चा) तर झाला आहे की, ब्रह्माकुमारी मनुष्य आत्म्यांना उत्तम बनवतात, हा जो अशुद्ध व्यवहार आहे, त्या अशुद्ध व्यवहारातून मुक्त करतात; जी यूथ ग्रुपसाठी सरकारची अपेक्षा आहे, ती सेवा खूप चांगली करत आहात. परंतु आता - ‘बाबा आले आहेत, परमात्मा आले आहेत, ह्या परमात्म ज्ञान देत आहेत, माझे बाबा वारसा देण्यासाठी आले आहेत’, अशाप्रकारे बाबांकडे आता दृष्टी गेल्यामुळे त्यांना देखील परमात्म प्रेम आणि परमात्म्याचे आकर्षण आकर्षित करेल. ‘चांगले आहे, चांगले आहे’, एवढे तर झाले आहे, परंतु परमात्म पित्याची प्रत्यक्षता आकर्षित करून श्रेष्ठ बनवेल. तर आता त्यांनी बाबांना ओळखावे की, ज्यांची आपण आठवण करतो आहोत ते हे ज्ञान देत आहेत, त्यांच्याकडून वारसा मिळत आहे. तर आता मन्सा द्वारे त्यांना बाबांच्या समीप आणा. तुमच्या चेहऱ्यातून आणि वर्तनातून तुमच्या डोळ्यांमधून बाबा प्रत्यक्ष व्हावेत. तर आता याचा आपापसात प्लॅन बनवा.

बापदादांनी पाहिले आहे - जो प्लॅन बापदादांनी वेळोवेळी दिला आहे तो मुलांनी मोठ्या विधिपूर्वक उमंग-उत्साहाने केला आहे, करत आहेत, यासाठी बापदादा सर्व मुलांना पद्म-पद्मपटीने मुबारक देत आहेत. आता ॲडिशन करा की, भगवान वारसा देत आहेत. आत्ता वारसा घेणार नाही मग तर कधी घेणार! बाबांना दुःख, अशांतीचे वातावरण पाहून मुलांची दया येते. आणि बाबा व तुम्ही जाणता की, हे तर अति मध्ये जाणारच आहे. अति झाल्याशिवाय अंत होत नाही. अशा वेळी आत्म्यांना अनुभव करवा, केवळ ऐकवू नका, अनुभव करवा की, स्वयं भगवान वारसा देत आहेत. तुम्ही देखील सर्वजण हेच विचारता ना की, बाबांची प्रत्यक्षता कधी आणि कशी होईल! तर ब्रह्माकुमारींपर्यंत पोहोचले आहेत परंतु ब्रह्माकुमारींना शिकविणारा कोण! ब्रह्माकुमारींचा, ब्रह्माकुमारांचा दाता कोण! आता समयाला समीप आणायचे आहे, समाप्ती करायची आहे. समाप्तीला समीप आणणारे कोण आहेत? प्रत्येक बच्चा समजतो आहे ना की मीच निमित्त आहे. बाबांनी ही जबाबदारी स्वतःसोबत मुलांना दिली आहे. सन शोज फादर (मुलाने पित्याला प्रत्यक्ष करावे). काहीजण जेव्हा बाबांना ओळखतात, तर बघा तुम्ही सर्वांनी बाबांना ओळखले तर काय केले? ओळखले, जाणले, त्यामुळे त्यांची संतान बनून वारशाचे अधिकारी बनलात. आता वारसा घेणाऱ्या आत्म्यांची लाईन लागली पाहिजे. आणि ही लाईन कशासाठी थांबलेली आहे? कारण काही मुले अजूनही व्यर्थ संकल्पांच्या रांगेमध्ये उभी आहेत. ‘का’, ‘काय’, ‘कसे’, आता याच्या समाप्तीसाठी वेळ देतात, परंतु व्यर्थ समाप्त झालेले नाहीये. व्यर्थ समर्थ बनण्यामध्ये अडथळा निर्माण करते.

आज बापदादा व्यर्थ संकल्पांची समाप्ती करण्यासाठी चोहो बाजूंच्या सर्व मुलांना हिंमत देत आहेत की आत्ता पासून व्यर्थला समाप्त करून सदैव समर्थ बनून समर्थ बनवा. फक्त संदेश देऊ नका तर समर्थ बनवा, समर्थ बना, समर्थ बनवा. व्यर्थचा समाप्ती दिवस साजरा करा. हे होऊ शकते का? तर लक्षात येतंय का की व्यर्थ संकल्प आपलेच नुकसानही करतात, वेळही वाया घालवतात, चेहऱ्यावरील सदैव आनंदी, भाग्यवान असल्याच्या छटा देखील कमी करून टाकतात! म्हणून आता समाप्तीची वेळ जवळ आणायची आहे. कोणाला? तुम्हाला ना! जे समजतात की आता समाप्तीची वेळ समीप आणायची आहे, आणि त्यासाठी व्यर्थला समाप्त करायचेच आहे, ‘करणार आहे’ नको, तर ‘करायचेच आहे’ स्वप्नात सुद्धा येऊ नये, संकल्प तर सोडाच परंतु स्वप्नात देखील येऊ नये, अशी जी स्वतःला हिंमतवान मुले समजतात त्यांनी हात वर करा. मनाचा हात वर करत आहात ना! बाहूंचा हात वर करणे तर खूप सोपे आहे परंतु मनाचा हात वर करत आहात? जे मनाचा हात वर करत आहेत त्यांनी हात वर करा, मनाचा हात. अच्छा.

आता बापदादा सर्व मुलांना हे वरदान देत आहेत की, तुम्ही सर्वजण येणाऱ्या नवीन दुनियेमध्ये २१ जन्म सदैव आनंदी राहाल. मेहनत करावी लागणार नाही, दुनियेच्या गुंतागुंतीमध्ये अडकणार नाही. जे जीवनामध्ये हवे आहे, तन, मन, धन सर्व काही मिळेल. शरीर तंदुरुस्त, मन आनंदी, धन अथाह ही तुम्हाला २१ जन्मांची गॅरंटी आहे. अच्छा, आजकालच्या जमान्याच्या हिशोबाने गोष्टी खूप बदलत चालल्या आहेत. सरकारचे कायदे सुद्धा बदलणार आहेत, मनुष्यांची वृत्ती देखील बदलणार आहे. त्यामुळे मग प्रत्येकाच्या जीवनामध्ये व्यर्थ गोष्टी तर येणारच आहेत, तर व्यर्थला संपवण्यासाठी समर्थ संकल्प हवेत. वेस्ट (व्यर्थ) संपवण्यासाठी बेस्ट (श्रेष्ठ) संकल्प हवेत. म्हणून रोजच्या मुरलीमध्ये जे वरदान, स्लोगन येते ते ऐका. हे वरदानच श्रेष्ठ संकल्प आहेत. जेव्हा व्यर्थ येईल तेव्हा श्रेष्ठ संकल्प मनाला हवेत. मन रिकामे राहू शकत नाही. मनाला काही ना काही संकल्प हवेत. तर व्यर्थ वेस्टला बेस्ट करण्यासाठी तुम्हाला हे वरदान आणि स्लोगन इत्यादीचे शब्द मनाला चेंज करण्यासाठी पाहिजेत. दुसरे - पहाटे जेव्हा डोळे उघडतात तेव्हा सर्वात आधी शिवबाबांना गुड मॉर्निंग करा. करू शकता? पहा अशी म्हण आहे - दिवसभरात जर कोणा चांगल्या व्यक्तीला पाहिले तर संपूर्ण दिवस चांगला जातो, आणि कोणा वाईट व्यक्तीला पाहिले ना तर काय म्हणतात? म्हणतात - ‘माहीत नाही कोणाचे तोंड पाहिले ज्यामुळे पूर्ण दिवस खराब गेला’. तर सर्वात चांगले कोण? शिवबाबा. शिवबाबांवर प्रेम आहे ना. मग डोळे उघडताच ‘शिवबाबा गुड मॉर्निंग’ आणि रात्रीचे डोळे बंद करताना, झोपायला जाल तेव्हा ‘शिवबाबा गुडनाईट’. हे तर सोपे आहे ना. यामुळे तुमचा संपूर्ण दिवस चांगला जाईल कारण शुभ संकल्प सुद्धा केला ना, वरदान ऐकले. तर असे करा. तुम्हा मुलांवर बापदादांचे प्रेम आहे ना. हे केल्यामुळे तुम्ही अजून पुढे जात राहाल. आपल्या या जीवनामध्ये देखील आनंदाचा अनुभव कराल. कधीही दुःखाची लाट येणार नाही. तर मान्य आहे आणि सहज योगी बना, बस्स. मी आत्मा आहे, शिवबाबांचा बच्चा आहे, बस्स, असे सहजयोगी. चालता-फिरता हेच आठवा की, मी आत्मा आहे, शिवबाबांचा बच्चा आहे. एवढी तरी आठवण करू शकता ना! खूप छान.

तुम्ही सर्व जे वारसदार सुद्धा आहात आणि वारसदार बनणारे सुद्धा आहात. जे स्वतःला बापदादांचे पक्के वारसदार समजतात, त्यांनी हात वर करा. वारसदार आहात? व्ही.आय.पी. देखील सर्वजण हात वर करत आहेत. टाळ्या तरी वाजवा! अच्छा. आता वारसदार क्वालिटीवाले आज हा संकल्प स्वतःशी दृढ करतील, बापदादांना हा संकल्प देतील की, ‘आम्ही आत्तापासून, कधीपासून नाही, आत्तापासूनच व्यर्थ संकल्प संपवून टाकणारच’. मान्य आहे. आहे मान्य? असेल तर हात वर करा. दोन कामे आहेत. एक आहे - कायमचे समर्थ बनणे आणि दुसरे आहे - समर्थ समयाला समीप आणणे. कारण बापदादांकडे मारलेल्या हाका आणि दुःखाचा आक्रोश खूप मोठ्या प्रमाणात ऐकू येतो. तुमच्यापर्यंत कोणास ठाऊक का ऐकू येत नाही. बापदादा जेव्हा हे सर्व ऐकतात तेव्हा तुम्हा मुलांना जे स्वतःला वारसदार समजतात, वारसा घेणारे आहात, तर वारसा घेणाऱ्यांना इतरांना वारसा देण्यासाठी दया आली पाहिजे ना. दया का येत नाही? वैराग्य, बेहदचे वैराग्य आणि दया आली पाहिजे. छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये ‘का’, ‘कसे’ च्या क्यूमध्ये वेळ घालवायचा नाही. आता, ‘हे बापदादांच्या सिकीलध्या (खूप-खूप वर्षा नंतर भेटलेल्या), पद्मा-पदम वरदानांनी भरपूर असणाऱ्या वरदानी मुलांनो! आता संकल्पाला दृढ करा आणि दृढतेची चावी लावा. कर्मयोगी बना. कर्मयोगी जीवन वाले आहात. जीवन शाश्वत असते, क्षणिक नाही. तर आता आपले कृपाळू, दयाळू, दुःख-हर्ता, सुख दाता स्वरूप इमर्ज करा. बापदादांनी अचानक येणाऱ्या वेळेबद्दल खूप आधीपासूनच सांगितले आहे. तर अचानक घडण्याच्या अगोदर भक्तांची आळवणी तरी पूर्ण करा. पीडितांच्या दुःखाचा आवाज तर ऐका. आता लहान-थोर प्रत्येकाने स्वतःला विश्व परिवर्तक, विश्वातील दुःख परिवर्तन करून सुखाची दुनिया आणण्यासाठी जबाबदार असल्याचे समजा.

बापदादांचे हे येणे-जाणे सुद्धा कधीपर्यंत? म्हणून सर्व काही अचानक व्हायचे आहे. तर वारसदार क्वालिटी वाले आता तुम्ही त्यांना वारसा मिळवून द्या, दयाळू बनण्याचा पार्ट बजावा. असा विचार करू नका की कधीपर्यंत होईल! अचानक होईल; त्यामुळे व्यर्थला संपवायचेच आहे. फक्त ‘होणार आहे’ असे म्हणू नका, तर ‘करायचेच आहे’. बापदादांनी रिझल्ट पाहिला, सर्वांच्या कर्मांच्या गतिला चेक केले, पुरुषार्थाच्या गतिला चेक केले, खजिने जमा करण्याचे खाते चेक केले, तर रिझल्टमध्ये काय दिसले? जमा करण्याचा पुरुषार्थ खूप चांगला करता परंतु जे जमा करता त्यामध्ये टक्केवारी वेगवेगळी (कमी-जास्त) आहे. जमा केल्याचे जितके समजता, जमा होते परंतु पर्सेंटेज मध्ये आहे, थोडे जमा होते, कायमसाठी जमा होत नाही. जितके करता तितके कायमसाठी जमा होण्यामध्ये फरक आहे म्हणून बापदादा आता प्रत्येक गोष्टीवर दृढ संकल्प करवून घेत आहेत. क्रोधावर दृढ संकल्प करवून घेतला, की, मनातून सुद्धा कोणा प्रति अशांती नसावी. ‘का’, ‘कसे’, हे देखील नसावे. परंतु काही जणांनी वाणीवर चांगला कंट्रोल केला आहे, परंतु मनामध्ये थोडे-थोडे चालते. नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहात; तरीही बापदादा खुश आहेत की तुमचे अटेन्शन गेले आहे. समजू लागले आहेत की, यामध्ये माझेच नुकसान आहे. समजले. अच्छा.

आता चोहो बाजूच्या परमात्म प्रेमी मुलांना जे सदैव बाबांच्या प्रेमामध्ये उडत राहतात, तीव्र पुरुषार्थी आहेत आणि सेवेमध्ये निर्विघ्न खरे सेवाधारी आहेत, अशा चोहो बाजूच्या मुलांना बापदादा देखील पाहत आहेत, त्याचसोबत जे दूर राहणाऱ्यांना देखील पाहत आहेत आणि इथे शांतीवनमध्ये सुद्धा जे विविध ठिकाणी स्क्रीनवर बघत आहेत, ऐकत आहेत, त्या सर्व मुलांना बापदादा - ‘नेहमी आनंदी राहा आणि आनंद वाटा’, हे वरदान देत आहेत. आनंदी चेहरा, कोणीही तुमचा चेहरा पाहिल तर चेहरा पाहून आनंदी व्हावा. कसाही असो तुमचा आनंदी चेहरा पाहून तो स्वतः देखील आनंदी व्हावा, हे वरदान चोहो बाजूंच्या मुलांना तसेच जे सन्मुख बसले आहेत त्या सर्वांसाठी एक वरदान आहे. चेहरा कधीही कोमेजू देऊ नका. जर तुम्ही कोमेजलात तर विश्वाची काय हालत होईल! तुमचा चेहरा आणि वर्तन सदैव आनंदी असले पाहिजे आणि इतरांनाही तसेच राहण्यास प्रवृत्त करायचे आहे. अशा सर्व तीव्र पुरुषार्थी मुलांना बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि गोड-गोड मुलांना नमस्ते.

वरदान:-
आपल्या मूर्त स्वरुपाद्वारे बाबा आणि शिक्षकाचे आचरण प्रत्यक्ष करणारे अनुभवी मूर्त भव

आपल्या मूळ पोझीशनमध्ये टिकणे - हीच आठवणीची यात्रा आहे; जो आहे, ज्याचा आहे - त्यामध्ये स्थित राहा. याच सत्य स्वरूपाच्या निश्चयाने आणि अनेकवेळा मिळालेल्या विजयाच्या आठवणीमध्ये तुम्ही सदैव नशेच्या स्थितीच्या सागरामध्ये तरंगत रहाल. जेव्हा की सुखदात्याची मुले आहात तर दुःखाची लाट येऊच कशी शकते, सर्वशक्तिवानची मुले शक्तिहीन कशी असू शकतात! याच पोझीशनच्या अनुभवांमध्ये राहा तर तुमच्या मूर्त स्वरुपाद्वारे बाबा आणि शिक्षकाची सूरत (आचरण) आपोआप प्रत्यक्ष होईल.

सुविचार:-
सत्यवादी तो आहे ज्याच्या चेहऱ्यामध्ये आणि वर्तनामध्ये दिव्यता असेल.

हे अव्यक्त इशारे - सदैव अचल, अडोल एकरस स्थितीचा अनुभव करा.

जेव्हा तुम्ही मुले आपल्या या भृकुटीच्या तख्तावर, अकालमूर्त बनून स्थित व्हाल, तेव्हाच एकरस स्थितीच्या तख्तावर आणि बापदादांच्या दिलतख्तावर विराजमान होऊ शकाल. जेव्हा या दैवी संघटनच्या रूपामध्ये एकरस स्थितीचा प्रत्यक्षरित्या साक्षात्कार होईल तेव्हाच बापदादांची प्रत्यक्षता समीप येईल; यासाठी प्रत्येकाला बापदादांसारखे संस्कार धारण करण्यामध्ये समान बनावे लागेल.