31-08-2026      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो, मनमनाभवची ड्रिल निरंतर करत रहाल तर २१ जन्मांसाठी धष्ट-पुष्ट (निरोगी) बनाल”

प्रश्न:-
सद्गुरुचे कोणते श्रीमत पालन करण्यामध्येच गुप्त मेहनत आहे?

उत्तर:-
सद्गुरुचे श्रीमत आहे - गोड मुलांनो, या देहाला देखील विसरून माझी आठवण करा. स्वतःला एकटी आत्मा समजा. देही-अभिमानी होऊन राहण्याचा पुरुषार्थ करा. सर्वांना हाच संदेश द्या की अशरीरी बना. देहा सहित देहाच्या सर्व धर्मांना विसरा तर तुम्ही पावन बनाल. या श्रीमताचे पालन करण्यामध्येच मुलांना गुप्त मेहनत करावी लागते. भाग्यवान मुलेच ही गुप्त मेहनत करू शकतात.

ओम शांती।
मुले आपल्या भावांना आणि बहिणींना ड्रिल शिकविण्याकरिता बसली आहेत. ही कोणती ड्रिल आहे? यामध्ये मुलांना काहीही बोलावे लागत नाही. ती जी शारीरिक ड्रिल इत्यादी करतात त्याच्यामध्ये तर बोलावे लागते. हे तर सुप्रीम टीचर आहेत, जे गीतेचा भगवान देखील आहेत, ते बसून मुलांना योगाची ड्रिल देखील शिकवतात. ही ड्रिल देखील गुप्त आहे. ड्रिल यासाठी शिकवली जाते की विद्यार्थी धष्ट-पुष्ट (हेल्दी) बनावे. तुम्ही मुले जाणता की, या ‘मनमनाभव’च्या ड्रिलमुळे २१ जन्मांसाठी खूप धष्ट-पुष्ट राहू. कधीही आजारी पडणार नाही. तर ही किती चांगली रूहानी ड्रिल आहे. बाबा म्हणतात - मनमनाभव, याच्यामध्ये बोलण्याची देखील आवश्यकता नाही. फक्त सांगितले जाते की, स्वतःला आत्मा समजा. देही-अभिमानी भव. भवचा अर्थच आहे की तुम्ही बाबांची आठवण करा तर एव्हर-हेल्दी बनाल. कल्पापूर्वी देखील आम्ही या रूहानी ड्रिलने एव्हर-हेल्दी बनलो होतो. रूहानी ड्रिल फक्त रूहानी बाबा परमपिता परमात्मा शिवबाबाच शिकवतात. भगवान तर त्यांनाच म्हटले जाते, ज्यांची पूजा देखील होते. ‘शिवाय नमः’ देखील म्हणतात ना. ‘ब्रह्मा देवताय नमः’, ‘शिव परमात्माय नमः’ म्हणतात. ही ड्रिल काही देहधारी मनुष्य शिकवत नाहीत. असे नाही की तुम्हाला ही ड्रिल ब्रह्माने शिकवली आहे. नाही, भले ब्रह्माकुमार-कुमारी म्हणवले जाता परंतु… पत्रावर देखील लिहिता - ‘शिवबाबा केअर ऑफ ब्रह्मा’. तर ते गुप्त झाले. परंतु लोकांना कसे माहीत होईल की, ब्रह्मा तर प्रजापिता आहे. तर सारी दुनिया त्याची मुले आहेत. प्रजापिता आहे ना. ड्रिल शिकविणारे तर निराकार बाबा आहेत. ते गुप्त आहेत. गुप्त असल्याकारणाने लोकांना समजण्यामध्ये देखील अडचण होते. ब्रह्माला तर भगवान म्हटले जात नाही. इथे नावच दाखवतात - ब्रह्माकुमार-कुमारी अर्थात ब्रह्माची संतान. जेव्हा कोणी येते तेव्हा त्यांना समवून घ्यायचे आहे की, ही नवी दुनिया रचणारे ब्रह्मा नाहीत परंतु निराकार बाबा आहेत, जे ब्रह्मा द्वारा रचना रचतात. पारलौकिक परमपिता परमात्मा ब्रह्मा द्वारा रचतात त्यामुळे सुप्रीम सोलची रचना आहेत.

तुम्ही मुले पत्रावर लिहिता शिवबाबा केअर ऑफ ब्रह्मा. तर ही देखील आठवण करण्याची युक्ती आहे. शिवबाबा ब्रह्मा द्वारे शिकवतात. बस्स, फक्त म्हणतात - मनमनाभव जास्त काही त्रास दिला जात नाही फक्त सांगितले जाते की तुम्हाला स्वतःची उन्नती करायची असेल आणि सचखंडाचे मालक बनू इच्छित असाल तर सचखंड स्थापन करणारे तर एकच सत्य बाबा आहेत, त्यांची आठवण करा. बेहदचे बाबाच येऊन मुलांना म्हणतात की, माझी आठवण करा तर पापांमधून मुक्त व्हाल. परमपिता परमात्म्याव्यतिरिक्त श्रीकृष्णाला पतित-पावन म्हटले जात नाही. इतर कोणाचे नाव घेणार नाहीत, गॉडफादरच म्हणतील. सर्वजण त्यांना फादर म्हणतात तर मग त्यांना सर्वव्यापी कसे म्हणू शकतात. म्हणतात ते लिबरेट करण्यासाठी येतात. हे मनुष्य जाणत नाहीत. तर कल्पाचे आयुर्मानच उलटे लिहिले आहे. आता मुलांना ही ड्रिल करायची आहे. ज्ञान तर मिळालेले आहे. जेव्हा बसता तेव्हा स्वतःला देही समजून बाबांची आठवण करा तर विकर्म नष्ट होतील. टीचर समोर गादीवर बसतात, ते शोभून दिसतात. नियम आहे की ड्रिल करून घेण्यासाठी टीचर जरूर पाहिजे. कोणी मोठा टीचर तर कोणी छोटा टीचर असतो. आता तुमची परीक्षा घेण्याची काही आवश्यकता नाही कारण तुम्ही स्वतः जाणता की आम्ही किती वेळ मोस्ट बिलवेड बाबांची आठवण करतो. ब्रह्मा काही मोस्ट बिलवेड (अत्यंत प्रिय) नाहीये. बिलवेड मोस्ट ते आहेत जे सदा पावन आहेत. तुम्ही मुले जाणता की सर्वात प्रिय कोण आहेत. मनुष्य परमात्म्याचीच आठवण करतात - हे दुःख हर्ता, सुख कर्ता. त्यांना लिबरेटर देखील म्हणतात अर्थात दुःखांपासून मुक्त करणारा. तर मुलांनी आपला पुरुषार्थ करायचा आहे. ड्रामा प्लॅन अनुसार ही दुनिया पावन होणार आहे जरूर आणि दुनिया पावन बनण्यासाठी आग लागणार आहे. हे देखील जाणता की, आग कशी लागणार आहे. विनाश झाल्याशिवाय दुनिया पावन बनू शकणार नाही. हा आहे - ‘रुद्र ज्ञान यज्ञ…’, ‘रुद्र’ आणि ‘शिव’ काही वेगळा नाहीये. परंतु मुख्य नाव ‘शिव’ आहे. बाकी तर आपल्या-आपल्या भाषांमध्ये अनेक नावे ठेवली आहेत. खरे नाव आहे - शिव. शिवजयंती देखील साजरी करतात. भारतातच शिवजयंती प्रसिद्ध आहे. बेहदच्या बाबांची शिवजयंती आहे तर जरूर येत देखील असतील ना. शिवबाबांच्या नावाची खूप कीर्ती आहे. ब्रह्मा द्वारा स्वर्गाची स्थापना करून घेणारे आहेत. तर त्या सर्वोच्च बाबांची आठवण करवी लागेल. ब्रह्मा काही सर्वोच्च नाहीये. खरे तर ब्रह्मा सर्वोच्च बनत आहेत. नंतर मग खाली देखील उतरतात (पतन होते). तुम्ही बी. के. देखील खाली होतात (पतित होता) आता उच्च बनत आहात. एकदम उच्च बाबांच्या घरी निघून जाल. तुम्ही या वेळी त्रिकालदर्शी बनत आहात. तुम्ही स्वतः जाणता की आम्हीच स्वदर्शन चक्रधारी आहोत. आम्ही ब्रह्मांड आणि सृष्टीच्या आदि-मध्य-अंताला जाणणारे आहोत. ब्रह्मांड अर्थात उंच, जिथे सर्व आत्मे निवास करतात. दुनियेमध्ये इतर असा कोणीही नाही जो सांगेल की आत्मे मूलवतनामध्ये रहातात. विश्व आणि ब्रह्मांड वेगवेगळे आहेत. आत्मे राहतात निर्वाणधाम मध्ये, ज्याला शांतीधाम म्हटले जाते. ते सर्वांना प्रिय वाटते. त्याचे खरे नाव निर्वाणधाम अथवा शांतीधाम आहे. आत्म्याचे स्वरूप शांत आहे. एक शांतीधाम, मग आहे मूव्हीधाम आणि हे आहे टॉकीधाम. मूव्हीधाम मध्ये जास्त राहायचे नाहीये. शांतीधाम मध्ये तर खूप जणांना रहावे लागते, दुसरे कोणतेही स्थान नाहीये. आत्मा जेव्हा बाबांची आणि घराची आठवण करते तेव्हा वरच्या दिशेने आठवण करते. मधल्या धाम विषयी तर तुमच्याशिवाय इतर कोणीही जाणत नाही. मनुष्यांना इतके ज्ञान नाहीये. फक्त म्हणतात - ब्रह्मा, विष्णू, शंकर सूक्ष्मवतनमध्ये राहतात. बाकी त्यांच्या जीवन कहाणी विषयी जाणत नाहीत. ८४ जन्म घेतात. ब्रह्मा सो विष्णू, विष्णू सो ब्रह्मा आहे. हे आहे लीप युग. हे थोड्या कालावधीचे आहे. जसे पुरुषोत्तम मास म्हटले जाते. हा तुमचा हिऱ्या समान उत्तम बनण्याचा श्रेष्ठ जन्म आहे. शुद्रापासून ब्राह्मण बनणे सर्वात उत्तम आहे. ब्राह्मण बनता तेव्हा मग आजोबांकडून वारसा घेण्याचे अधिकारी बनता (पात्र बनता).

बाबा मुलांना म्हणतात - ‘मुलांनो, सदैव मनमनाभव’. बाबांचा संदेश सर्वांना देत रहा. बाबांनाच मेसेंजर म्हटले जाते, दुसरा कोणीही मेसेंजर अथवा पैगंबर नाहीये. ते तर येऊन आपला धर्म स्थापन करतात. पैगंबर केवळ एकच आहेत तेच येऊन तुम्हाला पवित्र बनण्याचा संदेश देतात. ते (इतर धर्मस्थपाक) येतात धर्म स्थापन करण्याकरिता. ते काही परत घेऊन जाणारे गाईड नाहीत. ते तर एकच सद्गुरु सद्गती देणारे आहेत. सत्य बोलणारे, सत्य मार्ग सांगणारे तर एकच परमपिता परमात्मा शिव आहेत. तर मुलांना खूप गुप्त मेहनत करायची आहे. आता तुम्ही जाणता की, आपल्याला हा देह विसरून एका बाबांची आठवण करायची आहे. शरीर सुटते, तेव्हा सारी दुनिया मागे सुटते आणि आत्मा एकटी बनते. बाबा म्हणतात - देही-अभिमानी बना तेव्हा मग कोणत्याही मित्र-नातेवाईकांची आठवण येणार नाही. मी आत्मा आहे, मी बाबांकडे निघून जाणार. बाबा सल्ला देतात की तुम्ही माझ्याकडे कसे येऊ शकता. हे बाबा (ब्रह्मा बाबा) देखील प्रसिद्ध आहेत. यांच्याद्वारे बाबा सर्व आत्म्यांचे गाईड बनून मच्छरांसदृश्य परत घेऊन जातात. हे यथार्थ ज्ञान फक्त तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये आहे. तुम्हाला ‘पांडव-सेना’ देखील म्हणतात. ‘पांडव-पती’ स्वयं साक्षात परमपिता परमात्मा आहेत. जे तुम्हा मुलांना ड्रिल शिकवत आहेत, हुबेहूब कल्पापूर्वी प्रमाणे. जेव्हा विनाश होईल तेव्हा सर्व आत्मे शरीर सोडून निघून जातील. सतयुगामध्ये जेव्हा थोडे आत्मे असतात तेव्हा एक राज्य असते, आता अनेक आहेत; मग पुन्हा जरूर एक असेल. पूर्ण दिवस हे ज्ञान बुद्धीमध्ये ठेवून त्याचेच चिंतन करायचे आहे. मुलांनी प्रदर्शनावर देखील समजावून सांगायचे आहे. जेव्हा नवी दिल्ली होती तेव्हा नवा भारत होता. एकच आदि सनातन देवी-देवता धर्म होता. आदि सनातन काही हिंदू धर्म नव्हता. आम्ही ब्राह्मण सो देवता बनत आहोत. हे इतर धर्माचे लोक मानणार नाहीत. जे सर्वात आधी येतात तेच ८४ जन्म घेतात. या गोष्टी समजायला अत्यंत सोप्या आहेत. आता तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये आहे की आता नाटक पूर्ण होत आहे. सर्व ॲक्टर्स आलेले आहेत. ८४ जन्म पूर्ण केले, आता पुन्हा घरी जायचे आहे कारण खूप थकून गेला आहात ना. भक्तिमार्ग आहेच थकण्याचा मार्ग. बाबा म्हणतात - आता माझी आठवण करा, इतरांना संदेश द्या की देहा सहित देहाचे सर्व धर्म सोडून स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करा. अशरीरी बना तर पावन बनाल कारण आता परत घरी जायचे आहे. मृत्यू समोर उभा आहे.

इथे बाबांकडे देखील मुले, सन्मुख रिफ्रेश होण्यासाठी येतात. बाबा मुलांना सन्मुख समजावून सांगतात की, मुलांनो, देह-अभिमान सोडून मामेकम् (मज एकाची) आठवण करा. ही जुनी दुनिया आता नष्ट होणार आहे. तुम्ही एका बाबांची आठवण करून पवित्र बनलात तर पवित्र दुनियेचे मालक बनाल. जर मेहनत केली नाहीत तर फळ देखील मिळणार नाही. आणि मग शिक्षा भोगावी लागेल. बाबा म्हणतात की, स्वतःची कमाई जमा करत रहा आणि दुसऱ्यांना देखील निमंत्रण द्या. बाबांचा मार्ग देखील सांगा. तुम्हा मुलांना देखील कल्याणकारी बनायचे आहे. आपल्या मित्र-नातेवाईकांचे देखील कल्याण करायचे आहे. इथे तुम्हाला देही-अभिमानी बनवले जात आहे. महामंत्र देतात. प्राचीन योग, बाबांनीच येऊन शिकवला आहे, ज्याच्यासाठी गायले जाते - ‘योग-अग्नीद्वारे पापे दग्ध होतील’, कल्पापूर्वी देखील हाच इशारा मिळाला होता. बाबा इशारा देत आहेत की, स्वतःला आत्मा समजून माझी आठवण करा. भले आपल्या गृहस्थ व्यवहारामध्ये रहा. गायले गेले आहे की, ‘शरण पडी मैं तेरे’. असे देखील होते - जेव्हा कोणी दुःखी होतात तेव्हा उच्च शक्तिशाली असणाऱ्याकडे जाऊन आश्रय घेतात. इथे तर प्रत्यक्षात आहेत. जेव्हा अतोनात दुःख अनुभवतात, सहन करू शकत नाहीत, लाचार होतात तेव्हा मग पळत येऊन बाबांचा आश्रय घेतात. सद्गती तर बाबांशिवाय कोणीही देऊ शकत नाही. मुले जाणतात की जुन्या दुनियेचा विनाश होणार आहे. तयारी होत आहे. या बाजूला तुमच्या स्थापनेची तयारी, त्या बाजूला विनाशाची तयारी चालू आहे. स्थापना झाली तर विनाश देखील जरूर होणार आहे. तुम्ही जाणता की बाबा स्थापना करून घेण्यासाठी आलेले आहेत. यांच्याद्वारे वारसा देखील जरूर मिळेल. बाकी प्रेरणेने थोडेच काम चालते. टीचरला म्हणाल का की आम्ही तुमच्या प्रेरणेने शिकू. प्रेरणेने जर सर्व काही झाले असते तर शिवजयंती का साजरी केली असती? प्रेरणेने करणाऱ्यांसाठी तर शिवजयंती साजरी करण्याची आवश्यकताच नाही. जयंती तर सर्व आत्म्यांची असते. सर्व आत्मे जीवामध्ये (शरीरामध्ये) येतात. आत्मा आणि शरीर जेव्हा एकत्र होतात तेव्हा पार्ट बजावतात. आत्म्याचा तर स्वधर्म शांत आहे, त्याच्यामध्येच नॉलेज धारण होते. आत्माच चांगले-वाईट संस्कार घेऊन जाते. बाबा तर स्वर्गाचे रचयिता आहेत. तिथे तर पवित्रताच आहे. अपवित्रतेचे नामोनिशाण सुद्धा नाही. हा आहे - विषय सागर. किती स्पष्ट करून समजावून सांगितले जाते, तरी देखील कोणाच्याच बुद्धीमध्ये येत नाही परंतु तुम्ही कोणालाही दोष देत नाही. सर्व ड्रामाच्या बंधनामध्ये बांधलेले आहेत.

तुम्ही समजता शिडीने वरून खाली उतरत आलो आहोत (पतित बनत आलो आहोत). ड्रामा अनुसार आम्हाला उतरायचेच आहे. तर मग बाबा म्हणतात - आता चढण्यासाठी पुरुषार्थ करायचा आहे. परंतु ज्यांच्या नशिबात नाही ते मग असे म्हणतात. जे असे म्हणतात त्यावरून समजले जाते की यांच्या भाग्यातच नाहीये. दोन-चार वर्षे चालता-चालता देखील खाली पडतात (पतन होते). जाणीव देखील होते की आपण मोठी चूक केली आहे. मोठा फटका खाल्ला. हा देखील अर्ध्याकल्पाचा आजार आहे, थोडाथोडका नाहीये. अर्ध्याकल्पाचे रोगी आहेत. भोगी बनल्यामुळे रोगी बनतात. तर बाबा येऊन पुरुषार्थ करवून घेतात. श्रीकृष्णाला योगेश्वर म्हणतात. यावेळी तुम्ही खरे-खरे योगी आहात, योगेश्वर तुम्हाला योग शिकवत आहेत. तुम्ही ज्ञान-ज्ञानेश्वर देखील आहात नंतर मग राज-राजेश्वर बनाल. ज्ञानाद्वारे तुम्ही श्रीमंत बनता. योग द्वारे निरोगी, एव्हर-हेल्दी बनता. अर्ध्याकल्पासाठी तुमची सर्व दुःखे दूर होतात तर याच्यासाठी किती पुरुषार्थ केला पाहिजे. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) पावन बनण्यासाठी अशरीरी बनण्याचा अभ्यास करायचा आहे. सर्वांना संदेश द्यायचा आहे की एका बाबांची आठवण करा. देहा सहीत सर्व काही विसरून जा.

२) योगेश्वर बाबांकडून योग शिकून खरे-खरे योगी बनायचे आहे. ज्ञानाद्वारे श्रीमंत आणि योग द्वारे निरोगी, एव्हर-हेल्दी बनायचे आहे.

वरदान:-
निमित्त बनलेल्या आत्म्यांद्वारे कर्मयोगी बनण्याचे वरदान प्राप्त करणारे मास्टर वरदाता भव

जेव्हा कोणतीही वस्तू साकारमध्ये बघितली जाते तेव्हा तिला लवकर ग्रहण केले जाऊ शकते, त्यामुळे निमित्त बनलेले जे श्रेष्ठ आत्मे आहेत त्यांची सेवा, त्याग, स्नेह आणि सर्वांच्या सहयोगीपणाचे प्रत्यक्ष कर्म पाहून जी प्रेरणा मिळते तेच वरदान बनते. जेव्हा निमित्त बनलेल्या आत्म्यांना कर्म करताना या गुणांच्या धारणांमध्ये बघता तेव्हा सहज कर्मयोगी बनण्याचे जणू वरदान मिळते. जे असे वरदान प्राप्त करत राहतात, ते स्वतः देखील मास्टर वरदाता बनतात.

बोधवाक्य:-
नावाच्या आधारे सेवा करणे अर्थात उच्च पदा मध्ये नाव मागे करून घेणे आहे.

हे अव्यक्त इशारे - अपवित्रतेच्या बीजाला देखील नष्ट करून संपूर्ण स्वच्छ (पवित्र) बना.

पवित्रतेची निशाणी आहे स्वच्छता, सत्यता. जर पूर्ण दिवसभरात भले उठण्यामध्ये, बसण्यामध्ये, बोलण्यामध्ये, सेवा करण्यामध्ये, स्थूल सेवा केली अथवा सूक्ष्म सेवा केली; परंतु जर ती विधिपूर्वक केली नाही, विधी मध्ये देखील जर थोडीशी कमतरता राहिली तर ती देखील स्वच्छता अर्थात पवित्रता नाही. अपवित्रता म्हणजे केवळ कोणाला दुःख देणे अथवा पाप कर्म करणे एवढेच नाहीये; परंतु स्वतःमध्ये जर सत्यता, स्वच्छता विधीपूर्वक अनुभव करत असाल तर पवित्र आहात.