31-10-2026      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो, तुमच्यासारखे सौभाग्यशाली कोणीच नाही, कारण ज्या पित्याला सारी दुनिया बोलावत आहे ते तुम्हाला शिकवत आहेत, तुम्ही त्यांच्याशी संवाद साधता”

प्रश्न:-
ज्या मुलांना विचार सागर मंथन करता येते, त्यांची निशाणी काय असेल?

उत्तर:-
त्यांच्या बुद्धीमध्ये संपूर्ण दिवस हेच विचार घोळत राहतात की, कसा सगळ्यांना मार्ग सांगावा! कसे कुणाचे कल्याण करावे! ते सेवेचे नवीन-नवीन प्लॅन बनवत राहतात. त्यांच्या बुद्धीमध्ये सारे ज्ञान टपकत राहते. ते आपला वेळ वाया घालवत नाहीत.

ओम शांती।
मुलांसमोर निराकार परमपिता परमात्मा बोलत आहेत, हे मुलेच जाणतात. भगवंताला सर्वोच्च म्हटले जाते. उंच त्यांचे राहण्याचे ठिकाण आहे. राहण्याचे स्थान तर प्रसिद्ध आहे. मुले जाणतात आम्ही मूलवतनमध्ये राहणारे आहोत. मनुष्यांना या सर्व गोष्टींची कल्पना देखील नाहीये. ‘गॉडफादर’, असे बोलतात. तुम्हा मुलांशिवाय असा कोणताही मनुष्य नाही ज्याला हे ठाऊक असेल की, स्वयं निराकार भगवान बोलत आहेत. निराकार असल्या कारणाने कोणाच्याही बुद्धीमध्ये येत नाही की भगवानुवाच कसे असू शकते. माहीत नसल्यामुळे गीतेमध्ये श्रीकृष्णाचे नाव घातले आहे. आता मुलांसमोर बोलत आहेत. समोर असल्याशिवाय तर ऐकू शकत नाहीत. भले दुरुन जरी ऐकतात परंतु निश्चय होत नाही. ऐकतात तर भगवानुवाच. यथार्थ रीतीने तुम्हीच जाणता की, भगवान तर शिवबाबा आहेत. तुम्ही प्रॅक्टिकलमध्ये जाणता की, बाबा आम्हाला ज्ञान ऐकवत आहेत. तुमची बुद्धी लगेचच वरती निघून जाते. शिवबाबा उंच ते उंच राहणारे आहेत. जसे एखादी मोठी व्यक्ती, राणी इत्यादी येते तेव्हा जाणतात ही अमक्या ठिकाणची राहणारी आहे, यावेळी इथे आली आहे. तुम्ही मुले देखील जाणता की, आम्हाला घेऊन जाण्याकरिता बाबा आलेले आहेत. आम्ही देखील बाबांसोबत परत जाऊ. आम्ही परमधामचे राहणारे आहोत. तुम्हाला आता बाबांची आणि घराची आठवण येते. तेच बाबा सृष्टीचे रचयिता आहेत. बाबांनी येऊन तुम्हा मुलांना मूलवतन, सूक्ष्मवतन, स्थूलवतन यांचे रहस्य समजावून सांगितले आहे. ज्याच्या बुद्धीमध्ये आहे तेच समजतील. बरोबर, आपण पुरुषार्थ करत आहोत - बाबांकडून भविष्य २१ जन्मांसाठी वारसा घेण्याकरिता. पुरुषार्थ तर करावाच लागेल. पुरुषार्थ कधीही सोडायचा नाही. शाळेची मुले जाणतात जोपर्यंत परीक्षा होत नाही तोपर्यंत आपल्याला अभ्यास करायचाच आहे. एम ऑब्जेक्ट असतो. आपण मोठ्यात मोठी परीक्षा पास करू. एक कॉलेज सोडून मग पुढे दुसऱ्या, मग अजून तिसऱ्यामध्ये जातील. हेतू तर शिकत राहायचे आहे हा असतो. मोठ्या व्यक्तीचा मुलगा असेल तर जरूर मोठी परीक्षा पास करण्याचा विचार करेल. तुम्ही जाणता आपण खूप मोठ्या पित्याची मुले आहोत. दुनियेमध्ये हे कोणालाच ठाऊक नाही आहे की, आम्ही शिवबाबाची संतान आहोत. तुम्ही खूप मोठ्या उच्च ते उच्च पित्याची संतान आहात. खूप मोठे शिक्षण घेत आहात. तुम्ही जाणता हे अत्युच्च शिक्षण आहे. शिकवणारे बाबा आहेत तर किती उत्साहामध्ये आणि आनंदामध्ये राहिले पाहिजे. हे कोणालाही समजावून सांगू शकता. आम्ही महान ते महान पित्याची मुले आहोत. खूप मोठ्या सद्गुरूच्या मतावर आम्ही चालतो. टीचरच्या, गुरूच्या मतानुसार चालायचे असते ना. त्यांना फॉलोअर्स म्हटले जाते. इथे बाबांच्या मतावर देखील चालायचे आहे, टीचरच्या मतावर देखील चालायचे आहे, तर गुरूच्या मतावर देखील चालायचे आहे. तुम्ही जाणता ते आमचे पिता, टीचर, सद्गुरु आहेत. त्यांच्या मतावर जरूर चालायचे आहे. हे तर एकमेव सर्वोच्च शिवबाबा आहेत, ते बोलत आहेत.

बाबा मुलांना विचारत आहेत - शिवबाबा बोलतात, अच्छा शंकर बोलतात? ब्रह्मा बोलतात? विष्णू बोलतात? (शिव आणि ब्रह्मा बोलतात, विष्णू आणि शंकर बोलत नाहीत) विष्णूची दोन रूपे लक्ष्मी-नारायण म्हणता तर मग काय ते बोलत नाहीत? मुके आहेत? (ते ज्ञान बोलत नाहीत); मी ज्ञानाची गोष्टच करत नाहीये, बोलण्याविषयी विचारत आहे. विष्णू, लक्ष्मी-नारायण बोलतात का? शंकर बोलत नाहीत - ते ठीक आहे. बाकीचे तिघे का बोलणार नाहीत? विष्णूची दोन रूपे लक्ष्मी-नारायण आहेत तर जरूर बोलतील ना. मनुष्य शिवबाबांसाठी समजत असतील की, ते निराकार कसे काय बोलतील. तुम्ही मुले जाणता शिवबाबा देखील यांच्यामध्ये (ब्रह्मा बाबांमध्ये) येऊन बोलतात. ब्रह्माला देखील बोलायचे असते. ॲडॉप्टेड आहेत ना. संन्यासी लोक देखील आपले नाव संन्यास घेतल्यानंतर बदलतात. तुम्ही देखील संन्यास केला आहे, तर तुमचे नाव बदलले पाहिजे. सुरुवातीला तुम्हाला बाबांनी वेगळी नावे दिली. परंतु पाहिले की नावे ठेवून देखील मरून जातात (सोडून जातात) - आश्चर्यवत सुनन्ती, कथन्ती, भागन्ती होतात, त्यामुळे किती जणांची किती नावे ठेवावी हा तर प्रश्नच आहे. आजकाल तर माया देखील अत्यंत शक्तिशाली आहे. बुद्धी म्हणते जेव्हा लक्ष्मी-नारायणाचे राज्य होते तेव्हा त्याला विष्णू पुरी म्हटले जात होते. हे एम ऑब्जेक्ट बुद्धीमध्ये आहे. विष्णूची दोन रूपे लक्ष्मी-नारायण राज्य करतात तर बोलत का नसतील! बाबा इकडची गोष्ट करत नाहीत. मनुष्य तर म्हणतील निराकार कसे काय बोलतील. त्यांना हे माहीतच नाहीये की निराकार कसे येतात. त्यांना पतित-पावन म्हणतात. ते ज्ञानाचा सागर देखील आहेत, चैतन्य देखील आहेत, प्रेमाचा सागर देखील आहेत. आता प्रेम प्रेरणेने करू शकत नाही, ते (शिवबाबा) देखील यांच्यामध्ये (ब्रह्मा बाबांमध्ये) प्रवेश करून मुलांवर प्रेम करू शकतात ना, तेव्हाच तर म्हणतात की, आम्ही परमपिता परमात्म्याचे दत्तक पुत्र बनतो. बस्स, ‘बाबा, तुम्हीं से खाऊं, तुम्हीं से सुनूँ…’ बुद्धी त्या बाजूला निघून जाते. श्रीकृष्ण काही बुद्धीमध्ये येत नाही. तर बाबा बसून मुलांना समजावून सांगत आहेत. तुमच्यासारखा सौभाग्यशाली कोणीही नाही. तुम्ही जाणता आपण किती श्रेष्ठ पार्टधारी आहोत. हा खेळ आहे ना. यापूर्वी तर तुम्ही काहीच जाणत नव्हता. आता बाबांनी प्रवेश केला आहे तर ड्रामा प्लॅन अनुसार त्यांच्याद्वारे ऐकत आहात.

बाबा म्हणतात - गोड-गोड मुलांनो, तुम्ही जाणता बाबा निराकार आहेत. ते आम्हा आत्म्यांचे पिता आहेत. या गोष्टी कोणतीही शास्त्रे इत्यादींमध्ये लिहिलेल्या नाहीत. आता तुमची बुद्धी विशाल झाली आहे. स्टुडंट जेव्हा अभ्यास करतात, तेव्हा सारा इतिहास-भूगोल त्यांच्या बुद्धीमध्ये येतो. परंतु हे कोणाच्याच बुद्धीमध्ये येत नाही की, बाबा कुठे आहेत! यथार्थ रीतीने तुम्ही मुलेच समजता आणि प्रॅक्टिकल मध्ये तो आनंद आहे. बाबा परमधाम मधून येतात, आम्हाला शिकवतात. संपूर्ण दिवस आपसात हीच रूह-रिहान केली पाहिजे. या ज्ञानाशिवाय बाकी सर्व आहेत सत्यानाश करणाऱ्या गोष्टी. शरीर निर्वाह अर्थ तुम्हाला धंदा इत्यादी देखील करायचा आहे आणि त्याच सोबत ही रूहानी सेवा देखील करायची आहे.

तुम्ही जाणता - खरोखर हा भारत स्वर्ग होता. या लक्ष्मी-नारायणाचे राज्य होते. जी काही देवतांची चित्रे आहेत, त्यांचे यथार्थ ज्ञान बुद्धीमध्ये आले आहे. नंबरवन लक्ष्मी-नारायणाचे चित्र घ्या, विचार करा - बरोबर हे भारतामध्ये राज्य करत होते तेव्हा एकच धर्म होता. रात्र संपून दिवस सुरू झाला अर्थात कलियुग संपून सतयुग सुरू झाले. कलियुग आहे - रात्र. सतयुग आहे - सकाळ. विचार सागर मंथन करायचे आहे की यांनी हे राज्य कसे मिळवले. जसे म्हटले जाते - समुद्रामध्ये दगड टाकाल तर तरंग उठतील. तर तुम्ही देखील दगड मारा, मनुष्यांना समजावून सांगा. असा विचार करा, भारतामध्ये देवी-देवतांचे राज्य होते ना, ज्यांनी नंतर मग भक्तिमार्गामध्ये मंदिरे बनवली आहेत, ज्यांना नंतर मग लुटले आहे. कालचीच गोष्ट आहे. आता भक्तिमार्ग आहे तर जरूर त्याच्या आधी ज्ञानमार्ग असेल. या सर्व गोष्टी आता तुमच्या बुद्धीमध्ये आहेत. बाबा देखील येऊन आपली जीवन कहाणी सांगतात. तुम्हाला हे का आठवत नाही? बाबा येऊन आम्हाला हे संपूर्ण नॉलेज ऐकवत आहेत, समज देखील पाहिजे ना. कोणालाही हीच गोष्ट सांगा. हे चित्र आहे एम ऑब्जेक्ट. हे लक्ष्मी-नारायण तर सर्वात मोठे किंग-क्वीन झाले आहेत. भारत स्वर्ग होता ना. कालचीच गोष्ट आहे. मग यांनी हे राजसिंहासन कसे काय गमावले. आपली मुले देखील जरी हे सगळे ऐकतात परंतु कधी बुद्धीमध्ये टपकत नाही. बुद्धीमध्ये आठवत देखील नाही. जर आठवत असेल तर इतरांना देखील समजावून सांगू शकता. आहे तर खूप सोपे. तुम्ही इथे येता लक्ष्मी-नारायणासारखे बनण्यासाठी. समजावून सांगितले आहे - ही तर ५ हजार वर्षांची गोष्ट आहे; यापेक्षा लाँग-लाँग ॲगो (फार-फार वर्षांपूर्वी) इतके जुने काही असत नाही. सर्वात प्राचीन कथा ही भारताची आहे. वास्तविक खरी-खरी कहाणी ही असली पाहिजे. हीच सर्वात मोठी कहाणी आहे. यांचे राज्य होते, आता ते राज्य राहिलेले नाही. जरा सुद्धा कोणाला ठाऊक नाही. तुमच्या बुद्धीमध्ये नंबरवार टपकते. बाबा म्हणतात - माझी आठवण करा. ती देखील नीटसे कोणी आठवण करत नाहीत. बाबा बिंदू आहेत, आपणही बिंदू आहोत, हे देखील कोणाच्या बुद्धीमध्ये टिकत नाही. काहीजणांच्या बुद्धीमध्ये तर चांगल्या प्रकारे टपकत असते. एखाद्याला बसून समजावून सांगताना तर ४-५ तास देखील लागतात. या अतिशय वंडरफुल गोष्टी आहेत. जसे सत्यनारायणाची कथा बसून ऐकतात ना. २-३ तास बसून ऐकतात, ज्यामध्ये रुची असते. या ठिकाणी देखील असेच आहे, ज्याला खूप आवड असेल त्याला दुसरे काहीच सुचणार नाही. असे वाटेल बस्स, या गोष्टीच समजून घेण्यात खूप मजा वाटत आहे. या गोष्टी चांगल्या वाटतात. त्यांना असे वाटते की, बस्स याच सेवेमध्ये व्यस्त व्हावे, बाकी धंदा इत्यादी सगळे सोडून द्यावे. परंतु असेच तर कोणाला बसून राहायचे नाहीये. तर तुम्ही मुले ही सत्यनारायणाची कहाणी ऐकत आहात. आता तुमच्या बुद्धीमध्ये किती सुंदर गोष्टी रमण करत आहेत. आम्ही हे वक्खर (ज्ञान रुपी सामग्री) सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी एव्हररेडी आहोत. वक्खर (ही सर्व सामग्री) नेहमी तयार असली पाहिजे. हे चित्र देखील तुम्ही दाखवून कोणालाही समजावून सांगू शकता की, या लक्ष्मी-नारायणाला हे राज्य कसे मिळाले. किती वर्षांपूर्वी हे विश्वाचे मालक होते. त्यावेळी सृष्टीवर किती लोकसंख्या होती आणि आता किती आहे. कोणता ना कोणता दगड टाकला पाहिजे जेणेकरून विचार सागर मंथन चालेल. आपल्या या कुळातील असेल तर लगेच तरंग उमटेल. आपल्या कुळातील नसेल तर काहीच समजणार नाही, निघून जाईल. ही नाडी ओळखण्याची गोष्ट आहे. तुम्हाला या गोड-गोड ज्ञानाव्यतिरिक्त इतर काहीही बोलायचे नाहीये. जर ज्ञानाशिवाय इतर काहीही बोलत असाल तर समजा की ते ईविल आहे, त्यामध्ये काहीही सार नाहीये. आपल्याकडे अशी बरीच मुले आहेत ज्यांना ऐकण्याचा खूपच छंद असतो. बाबा समजावून सांगतात - ईविल गोष्ट तर कधीही ऐकता कामा नये. कल्याणाच्या गोष्टीच ऐका. नाहीतर फुकटचा आपला सत्यानाश करून घ्याल. बाबा तर येऊन तुम्हाला ज्ञानच ऐकवतात. सृष्टीच्या आदि-मध्य-अंताचे रहस्य समजावून सांगतात. म्हणतात - ज्ञान सोडून दुसरी कोणतीही गोष्ट करू नका, यामध्ये खूप वेळ वाया घालवता. ‘अमका असा आहे, तो असे करतो…’ या गोष्टींना ईविल म्हटले जाते. दुनियेची गोष्ट वेगळी आहे, तुमचा तर एक-एक सेकंद अत्यंत मौल्यवान आहे. तुम्ही कधीही अशा गोष्टी ऐकू नका, करू नका. त्यापेक्षा तर तुम्ही निराकार बाबांची आठवण करा तर तुमची खूप कमाई तरी होईल. जिकडे-तिकडे जाऊन बाबांचा परिचय द्या. हीच रूहानी सेवा करत राहा.

खरे-खरे महावीर तुम्हीच आहात. बस्स, संपूर्ण दिवस हेच विचार घोळत राहिले पाहिजेत - कोणीतरी असेल ज्याला हा मार्ग सांगावा. बाबा म्हणतात - मज अल्फची आठवण करा तर बे (बादशाही) मिळेल. किती सोपे आहे. अशा प्रकारे जाऊन सेवा केली पाहिजे. मुलांनी सेवेवर खूप लक्ष दिले पाहिजे. आपले आणि इतरांचे कल्याण केले पाहिजे. बाबा देखील तुम्हा मुलांना समजावून सांगण्यासाठीच आले आहेत ना. तुम्ही मुले देखील शिकण्यासाठी आणि शिकविण्यासाठी आला आहात. वेळ वाया घालवण्यासाठी किंवा फक्त चपात्या बनवण्यासाठी तर आलेले नाही आहात. संपूर्ण दिवस बुद्धीमध्ये सेवेचाच विषय चालला पाहिजे. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) ज्या गोष्टी आपल्या कामाच्या नाहीत त्या ऐकण्यामध्ये किंवा बोलण्यामध्ये आपला वेळ वाया घालवायचा नाही. शक्य होईल तितके पूर्णपणे अभ्यासावर लक्ष केंद्रित करायचे आहे.

२) सदैव आनंदामध्ये आणि उत्साहामध्ये राहायचे आहे की आम्हाला शिकवणारा कोण आहे. पुरुषार्थ करणे कधीही सोडायचे नाही. मुखावाटे ज्ञान-रत्नेच निघाली पाहिजेत.

वरदान:-
बुद्धिवान बनून तीन प्रकारची सेवा एकाच वेळी करणारे सफलतामूर्त भव

वर्तमान समयानुसार मनसा, वाचा आणि कर्मणा तिन्ही प्रकारची सेवा एकत्र हवी. वाणी आणि कर्मासोबत मनसा शुभ संकल्प अथवा श्रेष्ठ वृत्ती द्वारे सेवा करत राहा तर फळ फलीभूत होईल. कारण वाणीमध्ये शक्ती तेव्हाच येते जेव्हा मनसा शक्तिशाली असते; नाहीतर फक्त बोलणाऱ्याची स्थिती पंडिता सारखी होते, कारण ते पोपटासारखे फक्त वाचून रिपिट करत असतात. ज्ञानी अर्थात बुद्धिमान, तिन्ही प्रकारची सेवा एकत्र करतात आणि सफलतेचे वरदान प्राप्त करतात.

बोधवाक्य:-
आपल्या प्रत्येक शब्दातून, कर्मातून आणि दृष्टीतून प्रत्येक आत्म्याला शांती, शक्ती आणि आनंदाचा अनुभव करविणे हीच महान आत्म्यांची महानता आहे.

हे अव्यक्त इशारे - परोपकाराच्या भावनेने संपन्न बनून अपकारीवर देखील उपकार करा.

जसे होमिओपॅथी औषधाच्या छोट्या-छोट्या गोळ्या किती मोठ्या रोगाला नष्ट करून टाकतात, तसे तुम्ही मास्टर सर्वशक्तिमान आपल्या वृत्ती आणि दृष्टीद्वारे कोणाच्याही कठीण संस्काराच्या रोगाला नष्ट करू शकता. जसे ते औषध असे म्हणत नाही की, ‘रोगाला कसे नष्ट करावे’, तसेच तुम्ही परोपकारी आत्मे मास्टर ज्ञानसूर्य बनून सर्व आत्म्यांच्या पतित संकल्पांना अथवा वृत्तींना भस्म करण्याची सेवा करा, अपकारीवर देखील उपकार करा.