31-12-2025
प्रभात: मराठी मुरली
ओम
शान्ति
बापदादा
मधुबन
“गोड
मुलांनो - मधुबन, होलीएस्ट ऑफ दि होली बाबांचे घर आहे, इथे तुम्ही कोणत्याही
पतिताला घेऊन येऊ शकत नाही”
प्रश्न:-
या ईश्वरीय
मिशनमध्ये जे पक्के निश्चय बुद्धी आहेत त्यांची लक्षणे काय असतील?
उत्तर:-
१) ते स्तुती-निंदा… सगळ्या गोष्टीत संयमाने वागतील, २) क्रोध करणार नाहीत, ३)
कोणालाही दैहिक दृष्टीने पाहणार नाहीत. आत्म्यालाच बघतील, आत्मा होऊनच बोलतील, ४)
पती-पत्नी सोबत राहत असताना देखील कमलपुष्प समान राहतील, ५) कोणत्याही प्रकारची
इच्छा बाळगणार नाहीत.
गीत:-
जले ना क्यों
परवाना…
ओम शांती।
रुहानी मुलांप्रती रुहानी बाबा समजावून सांगत आहेत अर्थात भगवान शिकवत आहेत रूहानी
स्टुडंट्सना. त्या शाळांमध्ये जी मुले शिकतात त्यांना काही रूहानी स्टुडंट म्हणणार
नाही. ते तर आहेतच आसुरी विकारी संप्रदायाचे. पहिले तुम्ही देखील आसुरी अर्थात रावण
संप्रदायाचे होता. आता राम-राज्यामध्ये जाण्यासाठी ५ विकाररुपी रावणावर विजय
प्राप्त करण्याचा पुरुषार्थ करत आहात. जे हे नॉलेज प्राप्त करत नाहीत त्यांना
समजावून सांगावे लागते - तुम्ही रावण राज्यामध्ये आहात. ते स्वतः तसे समजत नाहीत.
तुम्ही तुमच्या मित्र-नातलग इत्यादींना सांगता - आम्ही बेहदच्या बाबांकडून शिकत
आहोत, तर असे नाही की ते विश्वास ठेवतात. कितीही पिता म्हणा किंवा भगवान म्हणा तरीही
विश्वास ठेवत नाहीत. जे नवीन आहेत त्यांना इथे येण्याचा आदेश नाही. पत्राशिवाय किंवा
परवानगीशिवाय कोणीही येऊ शकत नाही. परंतु कुठे-कुठे काहीजण येतात, हे देखील
कायद्याचे उल्लंघन आहे. प्रत्येकाची संपूर्ण माहिती, नाव इत्यादी लिहून देऊन
विचारावे लागते की, यांना पाठवायचे का? मग बाबा सांगतात - ‘भले पाठवून द्या’. जर
आसुरी पतित दुनियेचे स्टुडंट असतील तर बाबा सांगतील - ते शिक्षण तर विकारी पतित
शिकवतात, हे ईश्वर शिकवतात. त्या शिक्षणाद्वारे पाई-पैशाचा दर्जा मिळतो. भले कोणी
खूप मोठी परीक्षा पास करतात, मग किती काळ कमाई करतील, विनाश तर समोर उभा आहे.
नैसर्गिक आपत्ती देखील सर्व येणार आहेत. हे देखील तुम्ही समजता, जे समजत नाहीत
त्यांना हे ज्ञान बाहेर व्हीजिटिंग रूममध्ये बसवून समजावून सांगायचे आहे. हे आहे
ईश्वरीय शिक्षण, यामध्ये निश्चय बुद्धीच विजयन्ती होतील अर्थात विश्वावर राज्य
करतील. जे रावण संप्रदायवाले आहेत ते तर हे जाणतही नाहीत. यामध्ये खूप सावधगिरी
बाळगली पाहिजे. परवानगी शिवाय कोणीही आत येऊ शकत नाही. हे काही हिंडण्या-फिरण्याचे
ठिकाण नाहीये. काही कालावधी नंतर कायदे कडक होतील कारण हे आहे होलीएस्ट ऑफ दि होली.
शिवबाबांना इंद्र देखील म्हटले जाते ना. ही इंद्रसभा आहे. ९ रत्न अंगठीमध्ये देखील
घालतात ना. त्या रत्नांमध्ये नीलम देखील असतो, पन्ना, माणिक देखील असतो. ही सर्व
नावे ठेवलेली आहेत. परींची देखील नावे आहेत ना. तुम्ही पऱ्या उडणारे आत्मे आहात.
तुमचेच वर्णन आहे. परंतु मनुष्य या गोष्टींना अजिबात समजत नाहीत.
अंगठीमध्ये देखील
जेव्हा रत्न घालतात, तर त्यामध्ये पुखराज, नीलम, पोवळे… अशी रत्ने देखील असतात.
कोणाची किंमत हजार रुपये तर कोणाची किंमत १०-२० रुपये. मुलांमध्ये देखील नंबरवार
आहेत. कोणी तर शिकून मालक बनतात. कोणी मग शिकून दास-दासी बनतात. राजधानी स्थापन होत
आहे ना. तर बाबा बसून शिकवत आहेत. इंद्र देखील त्यांनाच म्हटले जाते. ही ज्ञान वर्षा
आहे. ज्ञान तर बाबांव्यतिरिक्त इतर कोणीही देऊ शकत नाही. तुमचे एम ऑब्जेक्टच हे आहे.
जर विश्वास बसला की, ईश्वर शिकवत आहेत तर मग ते शिक्षण सोडणारच नाहीत. जे
पत्थर-बुद्धीच असतील, त्यांना कधी तीर लागणार नाही (त्यांच्या हृदयाला हे ज्ञान
भिडणार नाही). ज्ञानामध्ये येऊन मग चालता-चालता कोसळतात (अधोगती होते). ५ विकार
अर्ध्या कल्पाचे शत्रू आहेत. माया देह-अभिमानामध्ये आणून थप्पड मारते मग आश्चर्यवत्
सुनन्ती, कथन्ती, भागन्ती होतात ही माया अतिशय वाईट आहे, एकाच थप्पडने खाली पाडते.
समजतात आम्ही पुन्हा कधीही घसरणार नाही तरीही माया थप्पड लगावते. इथे पती-पत्नी
दोघांनाही पवित्र बनविले जाते. ते तर ईश्वराशिवाय कोणीही बनवू शकत नाही. हे आहे
ईश्वरीय मिशन.
बाबांना खिवैया (नावाडी)
देखील म्हटले जाते, तुम्ही आहात नौका. नावाडी येतात सर्वांची नौका पार करण्यासाठी.
म्हणतात देखील सत्याची नाव हलेल-डुलेल परंतु बुडणार नाही. किती अनेकानेक मठ-पंथ
आहेत. ज्ञान आणि भक्तीचे जणू युद्ध चालते. कधी भक्तीचा विजय होईल, अखेरीला
ज्ञानाचाच विजय होणार. भक्तीकडे बघा किती मोठ-मोठे योद्धे आहेत. ज्ञानमार्गाकडे
देखील किती मोठ-मोठे योद्धे आहेत. अर्जुन, भीम इत्यादी नावे ठेवली आहेत. या तर सर्व
कथा बसून बनवल्या आहेत. गायन तर तुमचेच आहे. हीरो-हीरोईनचा पार्ट आता तुमचा बजावला
जात आहे. यावेळीच युद्ध चालते. तुमच्यामध्ये देखील असे बरेच आहेत जे या गोष्टींना
अजिबात समजत नाहीत. जे चांगले-चांगले असतील त्यांनाच तीर लागेल. थर्ड-क्लासवाले तर
बसूही शकणार नाहीत. दिवसेंदिवस नियम खूप कडक होत जातील. पत्थर-बुद्धी जे काहीच समजत
नाहीत त्यांनी इथे बसणे देखील नियमबाह्य आहे.
हा हॉल होलीएस्ट ऑफ
होली आहे. पोपला होली (पवित्र) म्हटले जाते. हे बाबा तर आहेत होलीएस्ट ऑफ होली (परम
पवित्र). बाबा म्हणतात - या सर्वांचे मलाच कल्याण करायचे आहे. या सर्वांचा विनाश
होणार आहे, परंतु हे देखील काही सर्वजण थोडेच समजतात. भले ऐकतात परंतु एका कानाने
ऐकून दुसऱ्या कानाने सोडून देतात. ना स्वतः काही धारणा करत, ना इतरांकडून करवून घेत.
असे मुके-बहिरे देखील पुष्कळ आहेत. बाबा म्हणतात हिअर नो ईव्हील… ते तर माकडाचे
चित्र दाखवतात. परंतु हे तर मनुष्यासाठी म्हटले जाते. मनुष्य तर यावेळी माकडा
पेक्षाही वाईट आहेत. नारदाची कथा देखील तयार करून ठेवली आहे. त्याला म्हटले - ‘तू
तुझे तोंड तर बघ - आतमध्ये ५ विकार तर नाही आहेत?’ जसा साक्षात्कार होतो. हनुमानाचा
देखील साक्षात्कार होतो ना. बाबा म्हणतात - कल्प-कल्प असे होते. सतयुगामध्ये अशा
कोणत्याही गोष्टी नसतात. ही जुनी दुनियाच नष्ट होणार आहे. जे पक्के निश्चय-बुद्धी
आहेत, ते समजतात कल्पापूर्वी देखील आपण असे राज्य केले होते. बाबा म्हणतात - मुलांनो,
आता दैवी गुण धारण करा. कोणतेही नियमबाह्य काम करू नका. निंदा-स्तुति सर्व
गोष्टींमध्ये धैर्यता धारण करा. क्रोध असता कामा नये. तुम्ही किती उच्च स्टुडंट
आहात, भगवान बाबा शिकवत आहेत. ते डायरेक्ट शिकवत आहेत तरी देखील कितीतरी मुले
विसरून जातात कारण साधारण तन आहे ना. बाबा म्हणतात - देहधारीला पाहिल्याने तुम्ही
हे ज्ञान तितकेसे आत्मसात करू शकणार नाही. आत्म्याला बघा. आत्मा इथे भृकुटीच्या
मध्यभागी राहते. आत्मा ऐकून मान हलवते. नेहमी आत्म्याशी बोला - ‘तू आत्मा या शरीर
रुपी तख्तावर बसली आहेस. तू तमोप्रधान होतीस, आता सतोप्रधान बन’. स्वतःला आत्मा
समजून बाबांची आठवण केल्याने देहाचे भान निघून जाईल. अर्ध्या कल्पापासून देह-अभिमान
राहिलेला आहे. यावेळी सर्व देह-अभिमानी आहेत.
आता बाबा म्हणतात -
देही-अभिमानी बना. आत्माच सर्व काही धारण करते. खाते-पिते सर्व काही आत्माच करते.
बाबांना तर अभोक्ता म्हटले जाते. ते आहेत निराकार. हे शरीरधारी सर्व काही करतात. ते
काहीच खात-पीत नाहीत. अभोक्ता आहेत. तर यांची मग ते लोक कॉपी करत बसतात. लोकांची
किती फसवणूक करतात. तुमच्या बुद्धीमध्ये आता सर्व ज्ञान आहे, कल्पापूर्वी ज्यांना
समजले होते, त्यांनाच ते समजेल. बाबा म्हणतात - मीच कल्प-कल्प येऊन तुम्हाला शिकवतो
आणि साक्षी होऊन बघतो. नंबरवार पुरुषार्था नुसार जे शिकले होते तेच शिकतील. वेळ
लागतो. म्हणतात - कलियुग अजून ४० हजार वर्ष बाकी आहे. तर घोर अंधारामध्ये आहेत ना.
याला अज्ञान अंध:कार म्हटले जाते. भक्तीमार्ग आणि ज्ञानमार्गामध्ये रात्रं-दिवसाचा
फरक आहे या देखील समजून घेण्याच्या गोष्टी आहेत. मुलांनी खूप आनंदामध्ये बुडून
राहिले पाहिजे. सर्व काही आहे, कोणतीही इच्छा नाही. जाणतात कल्पापूर्वी प्रमाणे
आमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात म्हणून पोट भरलेले राहते. ज्यांना ज्ञान नाही,
त्यांचे असे थोडेच पोट भरलेले राहील. म्हटले जाते - ‘खुशी जैसी खुराक नहीं’.
जन्म-जन्मांतरासाठी राजाई मिळते. दास-दासी बनणाऱ्यांना इतका आनंद होणार नाही. पूर्ण
महावीर बनायचे आहे. माया हलवू शकणार नाही.
बाबा म्हणतात - या
डोळ्यांची खूप काळजी घ्यायची आहे. क्रिमिनल दृष्टी (विकारी नजर) जाऊ नये. पत्नीला
पाहून विचलित होतात. अरे, तुम्ही तर भाऊ-बहीण, कुमार-कुमारी आहात ना. मग
कर्मेंद्रिया चंचल का होतात! मोठ-मोठ्या लखपती, करोडपतींना देखील माया संपवून टाकते.
गरिबांना देखील माया एकदम मारून टाकते. मग म्हणतात - ‘बाबा, मी हरलो’. अरे, १०
वर्षानंतर सुद्धा हार खाल्लीस. आता तर पाताळात जाऊन पडलास. आतून समजतात की याची
अवस्था कशी आहे. काहीजण तर खूप चांगली सेवा करतात. कन्यांनी देखील भीष्म पितामह
इत्यादींना बाण मारले आहेत ना. गीतेमध्ये थोडे-फार आहे. हे तर आहे भगवानुवाच. जर
श्रीकृष्ण भगवानाने गीता ऐकवली तर मग असे का म्हणतात की, मी जो आहे, जसा आहे, कोणी
विरळाच मला जाणतो. श्रीकृष्ण इथे असता तर माहित नाही काय केले असते. श्रीकृष्णाचे
शरीर तर असतेच सतयुगामध्ये. हे जाणत नाहीत की श्रीकृष्णाच्या अनेक जन्मांच्या अंतिम
शरीरामध्ये मी प्रवेश करतो. श्रीकृष्णाच्या मागे तर लगेच सगळे पळतील. पोप इत्यादी
येतात तर किती गर्दी गोळा होते. मनुष्य हे थोडेच समजतात की यावेळी सर्व पतित
तमोप्रधान आहेत. म्हणतात देखील हे पतित-पावन या परंतु समजत नाहीत की आपण पतित आहोत.
मुलांना बाबा किती चांगल्या प्रकारे समजावून सांगतात. बाबांची बुद्धी तर सर्व
सेंटरवरील अनन्य मुलांकडे जाते. जेव्हा जास्त अनन्य मुले इथे येतात तर मग इथे बघतो,
नाहीतर बाहेरच्या (सेंटरवरील) मुलांची आठवण करावी लागते. त्यांच्यासमोर ज्ञान डान्स
करतो. मेजॉरिटी ज्ञानी तू आत्मा असतात तर मजा सुद्धा येते. नाही तर मुलींवर किती
अत्याचार होतात. कल्प-कल्प सहन करावे लागते. ज्ञानामध्ये आल्याने मग भक्ती सुद्धा
सुटते. समजा घरामध्ये देवघर आहे, पती-पत्नी दोघेही भक्ती करतात, पत्नीला ज्ञानाची
गोडी लागते आणि मग भक्ती सोडते तर किती हंगामा होतो. विकारामध्ये सुद्धा गेली नाही,
स्तोत्र इत्यादी सुद्धा वाचली नाहीत मग भांडण तर होईलच ना. यामध्ये विघ्न खूप पडतात,
इतर सतसंगामध्ये जाण्यासाठी अडवत नाहीत. इथे आहे पवित्रतेची गोष्ट. पुरुष जेव्हा
संसारामध्ये राहू शकत नाहीत तर जंगलात निघून जातात, स्त्रीया कुठे जातील. ते
स्त्रीसाठी समजतात स्त्री नरकाचे द्वार आहे. बाबा म्हणतात - ही तर स्वर्गाचे द्वार
आहे. तुम्ही मुली आता स्वर्ग स्थापन करत आहात. या अगोदर नरकाचे द्वार होता. आता
स्वर्गाची स्थापना होत आहे. सतयुग आहे स्वर्गाचे द्वार, कलियुग आहे नरकाचे द्वार.
ही समजून घेण्याची गोष्ट आहे. तुम्ही मुले देखील नंबरवार पुरुषार्था अनुसार समजता.
भले पवित्र तर राहतात. बाकी ज्ञानाची धारणा नंबरवार होते. तुम्ही तर तिथून निघून इथे
येऊन बसला आहात, परंतु आता तर सांगितले जाते गृहस्थ व्यवहारामध्ये राहायचे आहे.
त्यांना तर त्रास होतो. इथे राहणाऱ्यांना तर काहीच त्रास नाही. तर बाबा म्हणतात -
कमलपुष्प समान गृहस्थ व्यवहारामध्ये जीवन जगत असताना पवित्र रहा. ही देखील या अंतिम
जन्माची गोष्ट आहे. गृहस्थ व्यवहारामध्ये राहत असताना स्वतःला आत्मा समजा. आत्माच
ऐकते, आत्माच अशी बनली आहे. आत्माच जन्म-जन्मांतर वेगवेगळे ड्रेस घालत आली आहे.
आम्हा आत्म्यांना आता परत घरी जायचे आहे. बाबांशी योग लावायचा आहे. मूळ गोष्ट आहे
ही. बाबा म्हणतात - मी आत्म्यांशी बोलतो. आत्मा भृकुटीच्या मध्यभागी राहते. या
ऑर्गन्स द्वारा ऐकते. यामध्ये (शरीरामध्ये) आत्मा नसती तर शरीर मुडदा झाला असता.
बाबा येऊन किती वंडरफुल ज्ञान देतात. या गोष्टी तर परमात्म्याशिवाय इतर कोणीही सांगू
शकणार नाही. संन्याशी इत्यादी कोणी आत्म्याला थोडेच पाहतात. ते तर आत्म्याला
परमात्मा समजतात. दुसरे मग म्हणतात आत्म्यामध्ये लेप-छेप लागत नाही. शरीराला
धुण्यासाठी गंगेमध्ये जातात. हे समजत नाहीत की आत्माच पतित बनते. आत्माच सर्व काही
करते. बाबा समजावून सांगत राहतात, असे समजू नका की, मी अमका आहे, हा अमका आहे… नाही,
सर्व आत्मे आहेत. जाती-पातीचा कोणताही भेद असता कामा नये. स्वतःला आत्मा समजा.
गव्हर्मेंट कोणत्या धर्माला मानत नाही. हे सर्व धर्म तर देहाचे आहेत. परंतु सर्व
आत्म्यांचे पिता तर एकच आहेत. पाहायचे देखील आत्म्यालाच आहे. सर्व आत्म्यांचा
स्वधर्म शांत आहे. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) जी गोष्ट
काही उपयोगाची नाही, त्याला एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून द्यायचे आहे.
हिअर नो इव्हील… बाबा जी शिकवण देतात त्याला धारण करायचे आहे.
२) कोणत्याही हदच्या
इच्छा ठेवायच्या नाहीत. दृष्टीची खूप काळजी घ्यायची आहे. क्रिमिनल दृष्टी (विकारी
दृष्टी) जाऊ नये. कोणतीही कर्मेंद्रिये चंचल होऊ नयेत. आनंदाने भरपूर रहायचे आहे.
वरदान:-
मायेच्या
खेळाला साक्षी होऊन बघणारे सदा निर्भय, मायाजीत भव
जसजशी तुम्हा
मुलांच्या स्टेजमध्ये (स्थितीमध्ये) अजून प्रगती होत जात आहे, तर आता मायेचा वार
होता कामा नये , माया नमस्कार करण्यासाठी यावी वार करण्यासाठी नाही. आणि माया जरी
आली तरी त्याला खेळ समजून पहा. असा अनुभव व्हावा जसे साक्षी होऊन हदचा ड्रामा बघत
आहोत. मायेचे कोणतेही विकराळ रूप असेल तुम्ही त्याला खेळणे आणि खेळ समजून पहाल तर
खूप मजा येईल, आणि मग त्याला घाबरणार नाही. जी मुले नेहमी खेळाडू बनून साक्षी होऊन
मायेचा खेळ पाहतात ते सदैव निर्भय किंवा मायाजीत बनतात.
बोधवाक्य:-
असा स्नेहाचा
सागर बना जेणेकरून क्रोध जवळ सुद्धा येऊ शकणार नाही.
अव्यक्त इशारे:- आता
संपन्न अथवा कर्मातीत बनण्याचा ध्यास धरा.
कर्मातीत
अर्थात कर्माच्या अधीन नाही, कर्माच्या परतंत्र नाही (अधीन नाही). स्वतंत्र होऊन
कर्मेंद्रियांद्वारे कर्म करवून घ्या. जे गायन आहे की, करत असताना अकर्ता,
संपर्क-संबंधामध्ये राहून कर्मातीत, अशी स्टेज (स्थिती) असते का? कोणतीही आसक्ती
नसावी आणि सेवा देखील मोह वश असू नये परंतु निमित्त भावाने व्हावी; यामुळे सहजच
कर्मातीत बनाल.